शहरं
Join us  
Trending Stories
1
युतीबाबत एक पाऊल पुढे! शिवतीर्थावर उद्धव-राज यांच्यात अडीच तास चर्चा, बंधुऐक्याची ‘फ्रेम’ ठरली 
2
डोनाल्ड ट्रम्प यांच्या निकटवर्तीयाची गोळ्या झाडून हत्या, विद्यापीठातील कार्यक्रमादरम्यान झाला गोळीबार  
3
आजचे राशीभविष्य- ११ सप्टेंबर २०२५: आजचा दिवस लाभदायी, नियोजित कामे पूर्ण होतील!
4
Maratha Reservation: हैदराबाद गॅझेटियर अधिसूचनेला मुंबई उच्च न्यायालयात आव्हान; काय आहे याचिकेत?
5
सोने-चांदीने गुंतवणूकदार मालामाल, गेल्या एका वर्षात मिळाले सोन्यातून ४४ तर चांदीतून ४५ टक्के रिटर्न
6
अग्रलेख: राधाकृष्णन आता देशाचे! नव्या उपराष्ट्रपतींनी हे लक्षात ठेवायला हवेच
7
विम्याचा हप्ता दहा वर्षांत दुप्पट! कंपन्यांकडून ग्राहकांची लूट; भीती दाखवून प्रीमियमवाढ
8
‘कोहिनूर’ची ‘बहीण’ ११७ वर्षांनी दिसणार! या बहिणीचं नाव आहे ‘दरिया-ए-नूर’ 
9
Maratha Reservation: राज्यात आजपर्यंत दिलेल्या कुणबी प्रमाणपत्रांची श्वेतपत्रिका काढावी; ओबीसी मंत्रिमंडळ उपसमितीची भूमिका
10
विशेष लेख: एका परिवर्तनशील, सहृदय नेतृत्वाचा अमृतमहोत्सव
11
नेपाळमध्ये देशभरात संचारबंदी लागू; महाराष्ट्रातील १०० पर्यटकांसह शेकडो प्रवासी अडकले 
12
भारत-अमेरिका यांच्यात चर्चेची दारे खुली होणार; पंतप्रधान मोदी म्हणाले, "ट्रम्प यांच्याशी..."
13
नेपाळनंतर फ्रान्समध्येही जनतेचा उद्रेक; २५० निदर्शकांना अटक 
14
Asia Cup 2025 : बुमराहच्या परफेक्ट यॉर्करशिवाय ही गोष्ट ठरली लक्षवेधी; कारण ६ वर्षांनी असं घडलं
15
सुशीला कार्की होणार नेपाळच्या पंतप्रधान; बालेंद्र शाहांचा पाठिंबा, आंदोलकांना केले आवाहन...
16
नागपुरातील कडबी चौकाजवळ भर रस्त्यावर व्यापाऱ्यावर गोळीबार, ५० लाखांची लूट
17
IND vs UAE : अभिषेकनं षटकारासह उघडलं खातं! गिलनं खणखणीत चौकार मारत पॉवरप्लेमध्ये संपवली मॅच
18
रुमाल पडला; तो क्रीजमध्ये यायला विसरला! सूंजचा डायरेक्ट थ्रो; पण Out बॅटरला सूर्यानं दिलं Not Out
19
'तुमचा वापर केला जातोय...', नेपाळमधील सत्तापालटानंतर केपी शर्मा ओलींची पहिली प्रतिक्रिया
20
महाराष्ट्राचे नवे राज्यपाल कोण? सीपी राधाकृष्णन राजीनामा देणार; १२ सप्टेंबरला उपराष्ट्रपतीपदाची शपथ घेण्याची शक्यता

करार न करताच महापालिका वापरतेय जलसंपदाची तब्बल ४२ गुंठे जमीन

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 10, 2020 14:43 IST

खडकवासला जॅकवेल यंत्रणा : जागेची मान्यता रद्द करण्याची महापालिकेला बजावली नोटीस

ठळक मुद्देभुईभाडेपट्टा गृहीत धरून ७७ लाख ८९ हजार २८ रुपयांची थकबाकी भरण्याची नोटीसयोजना कार्यान्वित झाल्यानंतर महापालिकेस कालव्यातून पाणी मागणी करता येणार नसल्याची अट

विशाल शिर्के- पुणे : खडकवासला येथे महानगरपालिकेने स्वत:ची जलउपसा यंत्रणा उभारली आहे. मात्र, गेल्या १६ ते १७ वर्षांपासून महापालिका जागा वापराचा करार न करताच जलसंपदा विभागाची तब्बल ४२ गुंठे जागा वापरत आहे. या प्रकरणी जलसंपदा विभागाने कडक भूमिका घेतली असून, आपली जागेची मान्यता रद्द का करू नये असे पत्र महापालिकेला पाठविले आहे. त्याचबरोबर भुईभाडेपट्टा गृहीत धरून ७७ लाख ८९ हजार २८ रुपयांची थकबाकी भरण्याची नोटीसही बजावली आहे.   खडकवासला धरणाजवळ जॅकवेल व पंप हाऊस बांधण्यास २००३ साली जलसंपदा विभागाने महापालिकेस परवानगी दिली. त्यासाठी खडकवासला पाटबंधारे विभागाने ४२ गुंठे जमीन महापालिकेस देण्याचे मान्य केले. खडकवासला येथील जॅकवेल ते वारजे येथील जल शुद्धीकरण प्रकल्पांतर्गत १ हजार ५२४ मिलीमीटर व्यासाची एमएस पाइपलाईन टाकण्यासही परवानगी देण्यात आली. त्यासाठी वार्षिक १ लाख ८२ हजार ७०० रुपये भाडे आकारण्यात येईल, असे जलसंपदाने सांगितले. त्या शिवाय दरवर्षी १० टक्के भाडेवाड देखील आकारण्यात येईल, या अटीवर प्रकल्पास मान्यता दिली. भाडेपट्ट्याची ११ मे २०२० अखेरीस ७५ लाख ६२ हजार ८८२८ रुपयांची थकबाकी होते. तसेच, पाईपलाईन टाकण्यासाठी अंदाजे एक एकर जागेचा वापर झाला आहे. त्याचे २ लाख २६ हजार २०० असे ७७ लाख ८९ हजार २८ रुपये भरणे आवश्यक असल्याचे जलसंपदा विभागाने महापालिकेस कळविले आहे. ही योजना कार्यान्वित झाल्यानंतर महापालिकेस कालव्यातून पाणी मागणी करता येणार नसल्याची त्यात अट होती. योजना पूर्ण झाल्यानंतर पश्चिम भागाचा पाणी पुरवठा करण्यासाठी बंद नळातून पर्वतीपर्यंत पाणी आणण्यात आले. जलसंपदा विभागाने या जागेच्या वापरास मान्यता दिल्यानंतर महापालिकेने प्रकल्प कार्यान्वित केला. मात्र, त्या बाबतचा करारच आजतागायत केला नाही. मुठा कालवे पाटबंधारे विभागाने ५ डिसेंबर २०१९ रोजी महापालिकेला पत्र पाठवून आपण करार केला नसल्याची पुन्हा, जाणीव करून दिली आहे. वेळेवेळी कळवूनही भाडेकरार केला नसून, भुईभाडेपट्टा देखील भरला नाही. त्यामुळे २००३-०४ पासून दरवर्षी दहा टक्के वाढीने भाडे भरण्यास बजावले आहे. आपण कराराची पूर्तता न केल्यास आणि थकीत भाडे न भरल्यास आपली जागेची परवानगी रद्द करण्याची शिफारस वरिष्ठ कार्यालयाला करण्यात येईल, असा इशाराही पत्रात दिला आहे.  .........जॅकवेल व पंपहाऊसचे भाडे पोचले आठ लाखांवरमहानगरपालिकेने जागा वापराची मान्यता देताना १ लाख ८२ हजार ७०० रुपयांचे वार्षिक भाडे ठरविले होते. त्यात दरवर्षी दहा टक्के वाढीची अटही टाकली होती. त्यानुसार १२ मे २०१९ ते ११ मे २०२० या कालावधीतील वार्षिक भाडे ८ लाख ३६ हजार २८४ रुपये होणार आहे. .............महापालिका करतेय जमिनीचा अनधिकृत वापर : जराडजनाई शिरसाई योजनेला समन्यायी पद्धतीने पाणी मिळावे या साठी जलसंपदा विभागाचे मुख्य अभियंता तथा प्राथमिक विवाद निवारण अधिकाºयांकडे याचिका दाखल केला होती. त्याच्या सुनावणीमधे खडकवासला पाटबंधारे विभागाने पाणी उपसा यंत्रणा महापालिकेच्या ताब्यात असल्याने पालिकेचा पाणीवापर नियंत्रित करता येत नसल्याचे उत्तर दिले होते. मात्र, महापालिकेबरोबर जलसंपदाचा करारच झाला नसेल तर ही संपूर्ण यंत्रणा जलसंपदाची ठरते. उलट या जागेचा महापालिका अनधिकृत वापर करीत असल्याचे दिसून येते. आता जलसंपदाने महापालिकेवर कारवाई करून समन्यायी पद्धतीने पाणीवाटप करावे, अशी मागणी बारामतीमधील शेतकरी विठ्ठल जराड यांनी केली आहे. 

टॅग्स :PuneपुणेPune Municipal Corporationपुणे महानगरपालिकाWaterपाणी