Pune: लग्नानंतर ८ दिवसांतच जेल कर्मचाऱ्याने स्वत:वर झाडली गोळी; प्रेयसीसह सहा जणांविरुद्ध गुन्हा

By विवेक भुसे | Published: July 26, 2023 04:36 PM2023-07-26T16:36:43+5:302023-07-26T16:37:26+5:30

येरवडा पोलिसांनी त्याच्या प्रेयसीसह सहा जणांवर गुन्हा दाखल केला आहे...

Within 8 days of the marriage, a prison employee shot himself; Crime against six people including girlfriend | Pune: लग्नानंतर ८ दिवसांतच जेल कर्मचाऱ्याने स्वत:वर झाडली गोळी; प्रेयसीसह सहा जणांविरुद्ध गुन्हा

Pune: लग्नानंतर ८ दिवसांतच जेल कर्मचाऱ्याने स्वत:वर झाडली गोळी; प्रेयसीसह सहा जणांविरुद्ध गुन्हा

googlenewsNext

पुणे : लग्न झाल्यानंतर पुन्हा ड्युटीवर हजर राहिल्यानंतर आठ दिवसात स्वत:वर गोळी झाडून घेऊन आत्महत्या केलेला जेल कर्मचारी अमोल मुरलीधर माने (वय २८) याच्या मृत्यूमागील कारण समोर आले आहे. प्रेमसंबंधातून त्याने ही आत्महत्या केली होती. याप्रकरणी येरवडा पोलिसांनी त्याच्या प्रेयसीसह सहा जणांवर गुन्हा दाखल केला आहे.

पल्लवी दिनकर धुमाळ (रा. जेल वसाहत) दिनकर रंगोबा धुमाळ (वय ५७, रा. विजय पार्क, विद्यानगर), प्रतीक दिनकर धुमाळ, रोहिदास मुरलीधर निगडे (वय ५२), सोहम निगडे, रोहित साहू लॅबवाला, अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. याबाबत पोलिस उपनिरीक्षक भगवान सदाशिव गुरव यांनी येरवडा पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. हा प्रकार येरवडा कारागृहात २७ फेब्रुवारी रोजी पहाटे साडेचार वाजता घडला होता.

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अमोल माने आणि पल्लवी धुमाळ यांचे प्रेमसंबंध होते. पल्लवी हिने लग्नास नकार दिला होता. दरम्यान इतरांनी अमोल याच्या रूमवर जाऊन येथून निघून जा, तुला सस्पेंड करीन, नोकरीवरून काढीन, अशी धमकी देऊन शिवीगाळ करून मानसिक त्रास देत होते. तसेच पोलिसात तक्रार दिल्यास तू एकटाच येथे राहत आहेस, मारून टाकेन, अशी धमकी देत होते.

त्यानंतर अमोल माने याने दुसऱ्या मुलीसोबत लग्न झाले. लग्नासाठी तो आपल्या गावी नगरला गेला होता. जानेवारी महिन्यात त्याचे लग्न झाले. सुटी संपल्यानंतर तो परत आला. तेव्हा आरोपींनी अमोल यास तू लग्न कसे काय केले. तुझी बदनामी करतो, खोटा गुन्हा दाखल करतो, असे बोलून मारहाण केली. त्यातून त्याच्यावर दडपण आले होते. २७ फेब्रुवारी रोजी तो गार्ड ड्युटीवर असताना त्याने स्वत: जवळच्या एसएलआरमधून स्वत:वर गोळी झाडून घेऊन आत्महत्या केली. आत्महत्येपूर्वी त्याने व्हॉट्सॲप मेसेज केला होता. त्यावरून मानसिक त्रास देऊन आत्महत्येस प्रवृत्त केल्यामुळे सहा जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिस निरीक्षक कांचन जाधव तपास करीत आहेत.

Web Title: Within 8 days of the marriage, a prison employee shot himself; Crime against six people including girlfriend

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.