शहरं
Join us  
Trending Stories
1
'आयात' विरुद्ध 'निष्ठावंत' भाजपात वाढला संघर्ष; मूळ कार्यकर्ते अस्वस्थ, बंडखोरी वाढणार
2
Dollar vs Rupee: RBI च्या मोठ्या निर्णयानं परिस्थिती बदलली, ९१ पार गेलेला रुपया ८९ पर्यंत आला, नक्की काय केलं?
3
मतदारांना पैसे वाटप, EVM मध्ये छेडछाड अन् बोगस मतदार; सत्ताधाऱ्यांनी काढले एकमेकांचे वाभाडे
4
कोमात आयुष्य की शांतपणे मृत्यू? १३ जानेवारीला सुप्रीम कोर्ट हरीशच्या जीवनावर निकाल सुनावणार
5
तुफान राडा! असं काय झालं की सुरक्षा रक्षकांनी ५० लाखांची मर्सिडीज फोडली; व्हायरल व्हिडीओतील घटना काय?
6
₹८१ वरुन ₹३ च्या खाली आलेला 'हा' शेअर; आता अचानक मोठी तेजी, कंपनीला मिळाली गूड न्यूज
7
"वडिलांप्रमाणेच मलाही पुरस्कार आवडतात...", सर्वोत्कृष्ट पदार्पणाचा अवॉर्ड मिळाल्यानंतर आर्यन खानची प्रतिक्रिया
8
एपस्टीन फाईल्समधून ट्रम्प यांचं नाव गायब; माजी राष्ट्रपती बिल क्लिंटन यांचे अनेक फोटो समोर
9
"पहिल्यांदाच लेकाला सोडून शहराबाहेर आलोय..." विकी कौशलची भावुक प्रतिक्रिया
10
संजूची डोळ्यांचं पारणं फेडणारी फटकेबाजी! थेट कॉमेंट्री बॉक्समधून शास्त्रींचा आगरकर-गंभीर जोडीला सवाल (VIDEO)
11
२०४७ चं स्वप्न आणि कटू सत्य, आकडेवारी भारतासोबत नाही; RBI च्या माजी गव्हर्नरांनी उपस्थित केले प्रश्न
12
राजधानी एक्स्प्रेसचा भयंकर अपघात, धडकेत अनेक हत्तींचा मृत्यू, रेल्वे इंजिनसह डब्बे घसरले
13
भाईंदरमध्ये ७ जणांना जखमी करणारा बिबट्या आठ तासांनी जेरबंद; घरात शिरून धुमाकूळ; पकडल्यानंतर जीव भांड्यात
14
कोकाटेंची शिक्षा कायम, अटक टळली! उच्च न्यायालय म्हणाले, प्रथमदर्शनी पुरावे उपलब्ध, दोषसिद्धीला स्थगिती देता येणार नाही
15
"त्यांची समजूत घालायला २ वर्ष लागली...", सोनाक्षी-जहीरच्या नात्याबद्दल पूनम सिन्हांचा खुलासा
16
Daily Horoscope: आजचे राशीभविष्य, २० डिसेंबर २०२५: सरकारकडून फायदा, मोठे आर्थिक लाभ होतील
17
ठाण्यात 'क्लब'मध्ये आग; १२०० लग्न वऱ्हाडी बचावले; तासाभरात आगीवर नियंत्रण
18
निवृत्त कृषी शास्त्रज्ञाला १.३९ कोटींचा गंडा; तर हायकोर्टाच्या अधिकाऱ्यास केले डिजिटल अरेस्ट
19
गेली २७ वर्षे झाली तो चालतोच आहे! एका ध्येयवेड्या सैनिकाची अचाट पृथ्वी प्रदक्षिणा
20
'सनबर्न'मध्ये मद्यसेवनास परवानगी कशी? उच्च न्यायालयाचा राज्य सरकारला सवाल
Daily Top 2Weekly Top 5

Winter Session Maharashtra : थंडीत आणखी वाढ होणार..! पुणेकरांना गुलाबी थंडीचा अनुभव

By श्रीकिशन काळे | Updated: December 10, 2024 15:46 IST

सध्या उत्तरेकडील थंड वाऱ्यांचे प्रवाह चांगलेच वाढले आहेत. परिणामी राज्यामध्ये गारठा पुन्हा वाढत आहे.

पुणे : गेल्या दोन दिवसांपासून पुण्यामध्ये गुलाबी थंडीचा आनंद पुणेकरांना येत आहे. खूप कडाक्याची थंडी पडली नसल्याने पुणेकर सकाळी फिरायला जात आहेत. तसेच दिवसभर हवाहवासा गारवा वातावरणात आहे. या थंडीमध्ये आणखी वाढ होऊ शकते, असा इशारा हवामान खात्याने दिला. थंडीची लाट देखील येण्याचा धोका आहे.

सध्या उत्तरेकडील थंड वाऱ्यांचे प्रवाह चांगलेच वाढले आहेत. परिणामी राज्यामध्ये गारठा पुन्हा वाढत आहे. उत्तर महाराष्ट्रात पारा पुन्हा १० अंशांखाली गेला आहे. पश्चिमेकडून वाहणाऱ्या जोरदार वाऱ्यांमुळे देशाच्या उत्तरेकडील राज्यांमध्ये थंडीचा कडाका कायम आहे. सोमवारी (दि.९) पंजाबच्या ‘अमृतसर’ येथे देशाच्या सपाट भूभागावरील नीचांकी ५.२ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. तर राज्यात निफाड येथील गहू संशोधन केंद्रात राज्यातील नीचांकी ६.७ अंश सेल्सिअस किमान तापमानाची नोंद झाली.तसेच राज्यातील जळगाव, धुळे आणि नाशिक येथे तापमान १० अंशांच्या खाली गेले होते. पुण्यातील मंगळवारी सकाळी किमान तापमान १२ अंशावर नोंदवले गेले. दरम्यान, राज्यात अंशतः ढगाळ हवामान असून, स्वच्छ सूर्यप्रकाश जमिनीवर येत आहे. उन्हाचा चटका कमी-अधिक होत आहे. मंगळवारी (दि.१०) किमान तापमानात २ ते ३ अंशांची घट होत थंडी आणखी वाढणार असल्याचा अंदाज वर्तविण्यात आला.   

पुण्यातील किमान तापमानहवेली : १०.८शिवाजीनगर : १२.३बारामती : १४.३एनडीए : १४.६कोरेगाव पार्क : १६.८लोणावळा : १७.६वडगावशेरी : १७.८मगरपट्टा : १८.८

उत्तर, मध्य, पश्चिम भारत (महाराष्ट्रासह) अधिक थंडीमध्ये गारठण्याची शक्यता आहे. तर दक्षिण भारत (विशेषतः तामिळनाडू, तटीय आंध्र प्रदेश, रायलसीमा) येथे अतिवृष्टीचा अनुभव होण्याची शक्यता आहे. राजस्थान, पंजाब, हरियाणा, मध्य प्रदेश येथे थंडीच्या लाटेमुळे यलो अलर्ट जारी केला आहे. उत्तर-मध्य महाराष्ट्रातील काही भागांमध्ये १२ डिसेंबरपर्यंत सौम्य थंडीच्या लाटेची शक्यता आहे. बंगालच्या उपसागरातून दक्षिणेच्या मार्गे येणाऱ्या सध्याच्या प्रणालीचा पावसावर फारसा प्रभाव दिसणार नाही. महाराष्ट्राच्या दक्षिणेकडील जिल्ह्यांमध्ये १२-१४ डिसेंबर दरम्यान अंशतः ढगाळ वातावरण आणि हलक्या पावसाची शक्यता आहे. १३ डिसेंबरपासून रात्रीच्या तापमानात वाढ होण्याची शक्यता आहे . - डॉ. अनुपम कश्यपी, ज्येष्ठ हवामानतज्ज्ञ

टॅग्स :PuneपुणेMaharashtraमहाराष्ट्रpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडWinter Session Maharashtraविधानसभा हिवाळी अधिवेशन