शहरं
Join us  
Trending Stories
1
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
2
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
3
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
4
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
5
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
6
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
7
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
8
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
9
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
10
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
11
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
12
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
13
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
14
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
15
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
16
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
17
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
18
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
19
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
20
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
Daily Top 2Weekly Top 5

विंग कमांडर स्वच्छतेच्या ' मिशन 'वर  

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 1, 2019 17:50 IST

देशात पाच वर्षांपूर्वी स्वच्छता मोहीम सुरू....

ठळक मुद्दे विविध संघटना एकत्र:  दर रविवारी स्वच्छता मोहीमदेशात पाच वर्षांपूर्वी स्वच्छता मोहीम सुरू

पुणे :राष्ट्रपिता महात्मा गांधी यांनी स्वच्छतेवर भर दिला. त्यामुळे सध्या देशात स्वच्छता मोहीम वेगाने सुरू आहे. हा स्वच्छतेचा वसा विंग कमांडरने घेतला असून, त्यांनी हे मिशन म्हणून हाती घेतले आहे. 'स्वच्छ पुणे स्वच्छ भारत' या संकल्पेनूतन विंग कमांडर पुनीत शर्मा यांनी चार वर्षांपूर्वी स्वच्छता मोहीम सुरू केली. त्यामध्ये आता शहरातील विविध संस्था सहभागी झाल्या आहेत. त्यामुळे हे अभियान अधिक मोठ्या प्रमाणावर बदल घडवण्यासाठी सज्ज झाले आहे.देशात पाच वर्षांपूर्वी स्वच्छता मोहीम सुरू करण्यात आली. तेव्हा पुनीत शर्मा यांनी 'स्वच्छ पुणे स्वच्छ भारत' हे अभियान सुरू केले. त्याला येत्या  २ ऑक्टोबर २०१९ रोजी पाच वर्षे पूर्ण होत आहेत. या वर्धापनदिनानिमित्त विविध उपक्रम हाती घेण्यात आले आहेत. त्यामध्ये फ्लॅशमॉब मार्फत जनजागृती, महा कॅनव्हास पेंटिंग इव्हेंट, मुठा नदीच्या काठावर अनेक ठिकाणी महास्वच्छता अभियान, बसस्थानक, रेल्वे स्थानके येथे महा जनजागृती अभियान,सर्व सोसायटी व स्थानिकांनाही यात सहभागी करून घेण्यात येणार आहे. आतापर्यंत अभियानातंर्गत दर रविवारी शहरात स्वच्छता मोहीम राबविण्यात येत आहे. हा उपक्रम आजतागायत सुरूच आहे. त्यात खंड पडलेला नाही. रेल्वे स्थानक, कवडी पाट, सिंहगड, टेकड्या आदी ठिकाणांवर ही मोहीम घेण्यात येते. त्यामध्ये अनेक तरूण-तरूणी आणि ज्येष्ठ देखील सहभागी होत आहेत. पाचव्या वर्धापनदिनानिमित्त तर अनेक संस्था सोबतीला आल्या आहेत. त्यामुळे अभियानाची ताकद वाढली आहे.

स्वच्छता अभियानाला पाच वर्षे पूर्ण होत आहेत. तसेच या पाच वर्षांत अनेकजण सहभागी झाले आणि स्वच्छतादूत बनले आहेत. आम्ही आता सर्व शैक्षणिक संस्थांना, सेवाभावी संस्थांना, सामाजिक संस्था, बायकर्स आणि सायकलिंग ग्रुप्स यांना यात सहभागी होण्यासाठी आवाहन आहे. त्यांनी देखील सकारात्मक प्रतिसाद दिला आहे.-  विंग कमांडर पुनीत शर्मा, स्वच्छ भारत स्वच्छ पुणे

या ठिकाणी बुधवारी स्वच्छता मोहीमगांधी जयंतीनिमित्त उद्या (दि.२) शहरात अनेक ठिकाणी स्वच्छता मोहीम राबविण्यात येणार आहे. त्यामध्ये विठ्ठलवाडी, बाबा भिडे पूल, सिध्देश्वर घाट, बंड गार्डन, कोरेगाव पार्क, मुंढवा, राजीव गांधी पूल औंध, रामवाडी, पवना आदी ठिकाणांचा समावेश आहे.

 

टॅग्स :PuneपुणेSwachh Bharat Abhiyanस्वच्छ भारत अभियानIndian Armyभारतीय जवान