शहरं
Join us  
Trending Stories
1
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
2
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
3
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
4
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
5
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
6
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
7
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
8
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
9
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
10
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
11
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
12
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
13
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
14
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
15
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
16
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
17
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
18
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
19
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
20
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
Daily Top 2Weekly Top 5

बेभान झाला वारा, वीज अन् पाऊस घेऊन आला

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 3, 2018 01:50 IST

शहरात मंगळवार सकाळपासून उकाडा जाणवत होता़ सायंकाळी आकाशात ढगांची गर्दी झाली़ त्याचबरोबर सोसाट्याचा वारा वाहू लागला़ सायंकाळी साडेसातनंतर

पुणे : दिवसभराच्या उकाड्यानंतर रात्री आलेल्या जोरदार पावसाने शहर व उपनगरात दाणादाण उडवली़ कोरेगाव पार्क, येरवडा भागात मोठ्या प्रमाणावर झाडपडीच्या घटना घडल्या असून अनेक ठिकाणी रस्त्यावर पाणी साचल्याने नागरिकांना वाहतूककोंडीचा सामना करावा लागला़ शहरात किमान १५ ठिकाणी झाडपडीच्या घटना घडल्या़ सुदैवाने त्यात कोणीही जखमी झाले नाही.

शहरात मंगळवार सकाळपासून उकाडा जाणवत होता़ सायंकाळी आकाशात ढगांची गर्दी झाली़ त्याचबरोबर सोसाट्याचा वारा वाहू लागला़ सायंकाळी साडेसातनंतर अचानक जोरदार पावसाची बरसात सुरू झाली़ शहरासह खडकवासला, धायरी, कोंढवा, येरवडा, कात्रज भागात सुमारे अर्धा तास सुरू असलेल्या पावसाने एकच दाणादाण उडवली़ कोरेगाव पार्क भागातील लेन नं़ ५, नॉर्थ मेन रोडवर ७ ते ८ ठिकाणी झाडपडीच्या घटना घडल्या़ त्यामुळे या दोन्ही रस्त्यांवरील वाहतूक ठप्प झाली़ शासकीय विश्रामगृहाजवळ एक मोठे झाड रस्त्यात पडल्याने तेथे वाहतूककोंडी झाली होती़कोरेगाव पार्कमधील नॉर्थ मेन रोडवर अनेक ठिकाणी एकाच वेळी झाडपडीच्या घटना घडल्या़ त्यात जोरदार पावसाने जागोजागी तळे साचले़ रस्त्याच्या कडेला पार्क केलेल्या गाड्यांवर झाडे पडल्याने त्यात काही गाड्यांचे नुकसान झाले़ रस्त्यावर पडलेल्या झाडांमुळे संपूर्ण वाहतूक ठप्प झाली़ त्यामुळे अनेक ठिकाणी अग्निशमन दलाच्या गाड्या पोहोचण्यात अडचण आली़ जेथे रस्त्यावर व गाड्यांवर झाडे पडली त्या ठिकाणी प्रथम जाऊन अग्निशमन दलाचे जवान ती झाडे हटविण्याचे काम करीत होते़कोरेगाव पार्क परिसरात जवळपास ७ ते ८ ठिकाणी झाडपडीच्या घटना घडल्या़ अनेक ठिकाणी रस्त्यावर पाणी साचले होते़ झाडे पडल्याने काही मोटारी व रिक्षांचे नुकसान झाले़ नॉर्थ मेन रोडवरील वाहतूक दुसऱ्या मार्गाने वळविली़ यावेळी परिसरातील तरुणाई मदतीला धावली़ त्यांनी रस्त्यावर आलेल्या झाडांच्या फांद्या बाजूला केल्या. झाडाच्या फांद्यांखाली दबलेली वाहने बाजूला केली व तासाभराने येथील वाहतूक सुरू झाली़

टॅग्स :PuneपुणेRainपाऊस