मिळणार मतदारांना व्हॉट्सअ‍ॅपवर स्लिप

By Admin | Updated: February 17, 2017 04:44 IST2017-02-17T04:44:36+5:302017-02-17T04:44:36+5:30

यंदाची निवडणूक ही खऱ्या अर्थाने ‘हायटेक’ ठरत आहे. स्लिप न मिळाल्यामुळे मतदान केंद्राकडे पाठ फिरविणाऱ्या मतदारराजाला

Will the voters get a slip on WhatsAppApps? | मिळणार मतदारांना व्हॉट्सअ‍ॅपवर स्लिप

मिळणार मतदारांना व्हॉट्सअ‍ॅपवर स्लिप

पुणे : यंदाची निवडणूक ही खऱ्या अर्थाने ‘हायटेक’ ठरत आहे. स्लिप न मिळाल्यामुळे मतदान केंद्राकडे पाठ फिरविणाऱ्या मतदारराजाला मतदानासाठी बाहेर काढण्याकरिता अनोखी क्लृप्ती पक्षाच्या कार्यकर्त्यांनी लढवली आहे.
व्हॉट्सअ‍ॅपवरच कुटुंबातील सर्व सदस्यांचा मतदान क्रमांक आणि केंद्र कुठे आहे, याचा तपशील पाठविण्याची यंत्रणा कार्यान्वित करण्यात आली आहे.
घरबसल्या ही माहिती मिळाल्यामुळे मतदारही सुखावले असून, मतदानाचा टक्का वाढविण्याच्या या ‘हटके’ प्रकाराची सर्वत्र चर्चा सुरू आहे. ‘टेक्नॉसॅव्ही’ मतदारांपर्यंत पोहोचण्यासाठी
पक्षांनी व्हॉट्सअ‍ॅपचा सहारा
घेतला आहे. (प्रतिनिधी)

Web Title: Will the voters get a slip on WhatsAppApps?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.