शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
4
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
5
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
6
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
7
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
8
राहुल गांधी एकाकी?, LPG मुद्द्यावर काँग्रेसमध्ये फूट पडल्याचं चित्र; नेते करताहेत PM मोदींचे कौतुक
9
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
10
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
11
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
12
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
13
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
14
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
15
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
16
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
17
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
18
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
19
VIDEO: सूर्याचा 'रहमान डकैत' स्टाईल FA9LA डान्स; Dhurandhar ची क्रेझ क्रिकेटच्या मैदानातही
20
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
Daily Top 2Weekly Top 5

पुण्यात खंडपीठ होण्याकरिता राहणार प्रयत्नशील : नवनिर्वाचित अध्यक्ष अ‍ॅड. सतीश मुळीक

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 8, 2020 15:08 IST

मुंबई उच्च न्यायालयाचे पुण्यात खंडपीठ व्हावे ही अनेक वर्षांपासूनची मागणी आहे.

ठळक मुद्देआगामी काळात वकील संरक्षण कायदा होण्याकरिता कार्यरत राहणार

पुणे : पक्षकारांची वाढणारी संख्या, शहराचा होणारा कायापालट तसेच सर्वसामान्य नागरिकांना त्वरीत न्याय मिळावा यासाठी मुंबई उच्च न्यायालयाचे पुण्यात खंडपीठ व्हावे ही अनेक वर्षांपासूनची मागणी आहे. मात्र तो प्रश्न अद्याप प्रलंबित आहे. हा प्रश्न मार्गी लागण्याकरिता त्याचा पाठपुरावा करण्यासाठी सतत प्रयत्नशील राहणार असल्याचे आश्वासन पुणे बार असोशिएशनचे नवनिर्वाचीत अध्यक्ष अ‍ॅड.सतीश मुळीक यांनी दिले. याबरोबरच आगामी काळात वकील संरक्षण कायदा होण्याकरिता कार्यरत राहणार असल्याचे त्यांनी सांगितले. अ‍ॅड. मुळीक यांनी अ‍ॅड. श्रीकांत आगस्ते यांच्याकडून अध्यक्ष पदाचा कार्यभार शुक्रवारी स्वीकारला. याप्रसंगी बार कौन्सील ऑ फ महाराष्ट्र व गोवाचे सदस्य अ‍ॅड. हर्षद निंबाळकर,अ‍ॅड. राजेंद्र उमाप, निवडणुकीचे मुख्य निवडणूक अधिकारी आणि पुणे बार असोसिएशनचे माजी अध्यक्ष अ‍ॅड. गिरीश शेडगे उपस्थित होते. उपाध्यक्ष अ‍ॅड. योगेश तुपे, अ‍ॅड. सचिन हिंगणेकर यांनी मागील उपाध्यक्ष अनुक्रमे अ‍ॅड. रुपेश कलाटे, अ‍ॅड. रवि लाढाणे, सचिव अ‍ॅड. घनश्याम दराडे, अ‍ॅड. विकास बाबर यांनी मागील सचिव अनुक्रमे अ‍ॅड. केदार शिंदे, अ‍ॅड. मनिष मगर, खजिनदार अ‍ॅड. भाग्यश्री गुजर-मुळे यांनी अ‍ॅड. सचिनकुमार गेलडा, हिशेब तपासणीस अ‍ॅड. ओंकार चव्हाण यांनी अ‍ॅड. नागेश जेधे यांच्याकडून पदाचा कार्यभार स्वीकारला. अ‍ॅड. महेश भांडे, अ‍ॅड. आनंद धोत्रे, अ‍ॅड. विराज करचे-पाटील, अ‍ॅड. आकाश मुसळे, अ‍ॅड. प्रिती पंडित, अ‍ॅड. सचिन पोटे, अ‍ॅड. अक्षय रतनगिरी, अ‍ॅड. अमोल तनपुरे, अ‍ॅड. अमित यादव व अ‍ॅड. सुषमा यादव यांनी कार्यकारिणी सदस्य पदाचा पदभार स्वीकारला. अ‍ॅड. मुळीक म्हणाले, निवडणुकीसाठी दरवर्षी पावती घेऊन सभासदत्व देण्याची पध्दत बंद करणार आहे. न्यायालयातील कँटीनमधील स्वच्छता, खाद्य पदार्थांचा दर्जा तपासण्यासाठी एफडीएच्या अधिकाºयांना बोलावून तपासणी करणार आहे. ज्युनिअर वकिलांना कोट ठेवण्यासाठी लॉकर्स उभारणी या कामांवर भर देणार आहे. अ‍ॅड. आगस्ते यांनी एक वर्षाच्या कालावधीत पुणे बार असोसिशनने केलेल्या कार्याचा आढावा घेतला. अ‍ॅड. केदार शिंदे यांनी सूत्रसंचालन केले. तर, प्रशांत वाटविसावे यांनी आभार मानले. 

टॅग्स :PuneपुणेCourtन्यायालयadvocateवकिल