शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

Ramdas Athawale: राज्यात युती येणार की आघाडी? रामदास आठवलेंनी दिलं उत्तर 

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 14, 2024 17:55 IST

'महाविकास आघाडीवर जनतेचा विश्वास नसून राज्यात पुन्हा महायुतीच सत्तेत येणार' रामदास आठवलेंनी व्यक्त केला विश्वास 

पुणे : सध्या सत्तेमध्ये असणारे महायुतीच्या सरकारने जनहिताची कामे केली आहेत, त्यामुळे जनता त्यांच्या प्रेमात आहेत. महाविकास आघाडीवर राज्यातील जनतेचा विश्वास नाही, त्यामुळे निवडणुकीनंतर राज्यामध्ये पुन्हा महायुतीचेच सरकार सत्तेमध्ये येणार असल्याचा विश्वास केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी व्यक्त केला आहे.

छत्रपती शिवाजीनगर विधानसभा मतदार संघातील महायुतीचे उमेदवार सिद्धार्थ शिरोळे यांच्या प्रचारवेळी त्यांनी महाविकास आघाडीवर टीका केली. ते पुढे  म्हणाले,' सध्या सत्तेमध्ये असणारे महायुतीच्या सरकारने जनहिताची कामे केली आहेत, त्यामुळे जनता त्यांच्या प्रेमात आहेत. तर महाविकास आघाडीवर राज्यातील जनतेचा विश्वास नाही, त्यामुळे निवडणुकीनंतर राज्यामध्ये पुन्हा महायुतीचेच सरकार सत्तेमध्ये येणार आहे.

मोदी सरकारच्या कामाचे कौतूक करत आठवले पुढे म्हणाले,'केंद्रात सत्तेमध्ये असणारे सरकार नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली चांगले काम करत आहे. त्यामुळे राज्यामध्ये महायुतीला मोठा विजय मिळेल. देशामध्ये महाराष्ट्र राज्याचा लौकिक मोठा आहे, त्यामुळे या निवडणुकीकडे संपूर्ण देशाचे लक्ष आहे. सिद्धार्थ शिरोळे यांनी आमदार म्हणून केलेल्या कामाचे आठवले यांनी यावेळी कौतुक केले.

दरम्यान, 'पुण्यातील शिवाजीनगरचे नागरिक आहेत भोळे, इथे निवडून येणार आहेत सिद्धार्थ शिरोळे’ अशी चारोळी रामदास आठवले यांनी आपल्या अनोख्या शैलीत सादर केली.  

तत्पूर्वी, पुण्यातील शिवाजीनगर मतदार संघात काँग्रेस विरुद्ध भाजप अशी दुहेरी लढत होणार आहे. तसेच काँग्रेसचे बंडखाेर मनीष आनंद शिवाजी नगर रिंगणात उतरले आहे.  मागील निवडणुकीत भाजपाचे सिद्धार्थ शिरोळे यांना ५८,७२७ मते मिळाली तर, काँग्रेसचे उमेदवार दत्ता बहिरट यांना ५३,६०३ मते मिळाली. सिद्धार्थ शिरोळे यांचा ५,१२४ मतांनी विजय झाला होता.

टॅग्स :PuneपुणेRamdas Athawaleरामदास आठवलेmaharashtra assembly election 2024महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४Politicsराजकारण