शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

भोंगा आंदोलनात मुलांना अटक झाल्यावर संयोजक सोडवणार का? पुण्यात समाजमाध्यमांवर 'मनसे' ला घेरले

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 22, 2022 17:13 IST

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने तुमचे भोंगे काढा नाही तर आम्हीही लावू असे आंदोलन जाहीर केल्यापासून वेगवेगळे राजकीय पक्ष तसेच संस्था, संघटनांकडून त्यांना समाजमाध्यमांवर ट्रोल केले जात आहे

पुणे : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने तुमचे भोंगे काढा नाही तर आम्हीही लावू असे आंदोलन जाहीर केल्यापासून वेगवेगळे राजकीय पक्ष तसेच संस्था, संघटनांकडून त्यांना समाजमाध्यमांवर ट्रोल केले जात आहे. यांची मुले स्टडीत आणि तुमची जातील कस्टडीत यासारखे प्रश्न आंदोलन संयोजकांना विचारा असे आवाहन केले जात आहे.

मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी भोंगे उतरवण्यासाठी ३ मे ही मुदत दिली आहे. त्याशिवाय त्यांनी अक्षय तृतीयेच्या मुहुर्तावर देवळांमध्ये महाआरती करण्याचेही जाहीर केले आहे. पुण्यात राज यांनी हनुमान जयंतीला खालकर मारूती चौकात केलेली महाआरतीही प्रसिद्ध झाली आहे. त्यावरूनच काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस हे राजकीय पक्ष तसेच अन्य काही सामाजिक संस्था संघटनांनी समाजमाध्यमांचा वापर करत या आंदोलनासंदर्भात काही प्रश्न उपस्थित करण्यास सुरूवात केली आहे. जाहीर कार्यक्रमांमधील भाषणातही भोंगा आंदोलनाचा संदर्भ देत बोलले जात आहे.

त्यात प्रामुख्याने तूमचा मुलगा आंदोलनात भाग घेणार आहे का, मग हे प्रश्न आंदोलन संयोजकांना जरूर विचारा असे आवाहन थेट आईवडिलांनाच करण्यात आले आहे.  पोलिसांनी अटक केल्यावर जामिनासाठी काय सोय केली आहे. कोर्टात वकीलाचा खर्च कोण करणार? त्याची तरतूद केली आहे का? अटक झाल्याने जर मुलांच्या नोकर्‍या गेल्या तर? अटकेच्या काळात घरच्या लोकांना आर्थिक मदत देणार का? संयोजक आंदोलनातील मुलांना भविष्यात पासपोर्ट व नोकरीसाठी पोलिसांकडून चारित्ऱ्यप्रमाणपत्र मिळवून देणार का? अशा प्रश्नांचा यात समावेश आहे. याशिवाय पक्षाध्यक्ष, त्यांचे कुटुंबीयही या आंदोलनात रस्त्यावर उतरणार आहेत का असाही प्रश्न  समाजमाध्यमांवर विचारला जात आहे.  सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील एका कार्यक्रमात बोलताना अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष श्रीपाल सबनीस यांनी सध्या सर्वत्र भोग्यांचे राजकारण सुरू असले तरी तुमचाआमचा भोंगा हा डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या मार्गावर चालणारा सत्याचा भोंगा आहे असे वक्तव्य केले. फेसबूक तसेच व्हाटस ॲपवर पोस्ट तसेच व्यंगचित्रांच्या माध्यमातून मनसेच्या या आंदोलनाला सध्या ट्रोल केले जात आहे. मनसेकडून अद्याप कुठेही याला प्रत्यूत्तर दिलेले दिसत नाही.

टॅग्स :MNSमनसेMuslimमुस्लीमPoliticsराजकारणRaj Thackerayराज ठाकरे