कामगारांच्या मुलांसाठी निर्णय घेणार : सोमाणी
By Admin | Updated: June 17, 2015 22:47 IST2015-06-17T22:47:50+5:302015-06-17T22:47:50+5:30
बारामती नगर परिषद पतसंस्थेचे कार्य कामगारांच्या हितासाठी आहे. सभासदांच्या उन्नतीसाठी पतसंस्था चांगले कार्य करीत आहे.

कामगारांच्या मुलांसाठी निर्णय घेणार : सोमाणी
बारामती : बारामती नगर परिषद पतसंस्थेचे कार्य कामगारांच्या हितासाठी आहे. सभासदांच्या उन्नतीसाठी पतसंस्था चांगले कार्य करीत आहे. नगर परिषदेच्या वतीने कामगारांच्या हितासाठी विमा उतरविणे, घरबांधणी, मुलांच्या उच्च शिक्षणासाठी मदत आदी महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात येणार आहे, असे या वेळी नगराध्यक्ष सुभाष सोमाणी यांनी सांगितले़
वसंतराव पवार नाट्यगृह येथे नगर परिषद कामगार पतसंस्थेची वार्षिक सर्वसाधारण सभा पार पडली. या वेळी सभासदांच्या पाल्यांचा दहावी-बारावीमध्ये पास झाल्याबद्दल व गुणवंत कामगार, निवृत्त कामगारांचा सत्कार करण्यात आला.
या वेळी नगर परिषदेचे मुख्याधिकारी दीपक झिंझाड, पतसंस्थेचे चेअरमन भालचंद्र ढमे, संचालक राजेंद्र सोनवणे, विविध कांबळे, देविदास साळुंके, सचिन शहा, नीलेश अहिवळे, अतुल बनकर, अनिल शिंदे, मेहबूब शेख, राजू सुपेकर, प्रतिभा सोनवणे, राधा लालबिगे, सचिव सुनील धुमाळ, अनिल गोंजारी उपस्थित होते़ सचिव सुनील धुमाळ यांनी अहवालवाचन केले़ अनिल सावळे पाटील यांनी सूत्रसंचालन, तर देविदास साळुंके यांनी आभार मानले.
(प्रतिनिधी)