शहरं
Join us  
Trending Stories
1
Rohini Acharya: "मी राजकारण सोडतेय आणि कुटुंबासोबतचे संबंधही तोडत आहे", लालू प्रसाद यादवांच्या मुलीच्या पोस्टने खळबळ
2
चीन-पाकिस्तानशी 'इलेक्ट्रोमॅग्नेटिक युद्ध'?; मुंबईनजीक GPS साठी भारताकडून NOTAM जारी, अर्थ काय?
3
घरात दोन बायका असतानाही तिसरीशी लग्न; चौथी आणायच्या तयारीत होता नवरदेव, पण चांगलाच फसला!
4
IND vs SA 1st Test Day 2 Stumps : जड्डूसह कुलदीप-अक्षरचा जलवा! तिसरा दिवस ठरणार निकालाचा?
5
“काँग्रेस-मनसे एकमेकांचा दर्जा ठरवायला लागले तर आपण लांबून हसलेले बरे”; भाजपा नेत्यांचा टोला
6
सोम प्रदोष २०२५: सोम प्रदोषाने आठवड्याची सुरुवात होणार; 'या' ८ राशींना शिवकृपेचे संकेत मिळणार
7
थरारक! विवाहित प्रेयसीची हत्या, मृतदेहाचे तुकडे केले; शीर अन् अवयव बसच्या चाकाखाली चिरडले, मग..
8
कोण आहे डॉ. मुजफ्फर? ज्याला पकडण्यासाठी सीबीआय घेतेय इंटरपोलची मदत! अफगाणिस्तानाशी आहे कनेक्शन
9
"बिहारमध्ये भाजपचा जो स्ट्राइक रेट आला, तसा तर आमचा 1984 मध्येही नव्हता"; काँग्रेसला अजूनही निकालावर विश्वास बसेना 
10
"मला नितीश कुमार मुख्यमंत्री व्हावेत असे वाटते...", बिहारच्या सीएम पदावर चिराग पासवान यांनी स्पष्टच सांगितले
11
बिहारमध्ये सर्वाधिक जागा जिंकूनही भाजपाची वाढली डोकेदुखी; मंत्रिपदाचा फॉर्म्युला बदलावा लागणार?
12
“तुम्ही चांगल्या योजना आणल्या नाहीत, जो जीता वहीं सिकंदर”; CM फडणवीसांचे शरद पवारांना उत्तर
13
इंदुरीकर महाराजांच्या लेकीच्या साखरपुड्यात किती लोक आले होते? जावयानेच सांगितला खरा आकडा
14
Gold prices today: ३३५१ रुपयांनी स्वस्त झालं सोनं, चांदीच्या किमतीतही मोठी घसरण; खरेदीदारांनी टाकला सुटकेचा नि:श्वास
15
Elections 2026: आता दक्षिणेत स्वारी! भाजपसाठी 'या' तीन राज्यात सत्तेचं स्वप्न पूर्ण होणार का?
16
IPL 2026 Trades Players Full List : जड्डू-संजूशिवाय 'या' ६ खेळाडूंसाठी झाली कोट्यावधींची डील
17
Union Bank मध्ये जमा करा ₹२,००,०००; मिळेल ₹८५,०४९ चं गॅरंटीड फिक्स व्याज, कोणती आहे स्कीम?
18
Shubman Gill Injury Update : शुभमन गिलनं मैदान सोडलं! पंत झाला कॅप्टन, नेमकं काय घडलं?
19
अमेरिकेत महागाईनं हाहाकार! ट्रम्प यांनी अनेक वस्तूंवरील टॅरिफ केलं कमी, स्वस्त होणार 'या' गोष्टी
20
बिहार निवडणुकीत विरोधात काम, माजी केंद्रीय मंत्री पक्षातून निलंबित; भाजपाची मोठी कारवाई
Daily Top 2Weekly Top 5

सुभेदारांचीच परीक्षा : सुळेंना फक्त बारामतीच तारणार का?

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 23, 2019 01:04 IST

2014 साली भारतीय जनता पक्ष- शिवसेना पुरस्कृत राष्ट्रीय समाज पक्षाचे उमेदवार महादेव जानकर बारामती विधानसभा मतदारसंघातून तब्बल ९०,६२८ मतांनी पिछाडीवर गेल्याने सुळे यांचा विजय सोपा झाला.

- अविनाश थोरातपुणे - बारामती लोकसभा मतदारसंघातील २०१४ ची निवडणूक ऐतिहासिक ठरली. प्रथमच दौंड, खडकवासला आणि पुरंदर मतदारसंघात राष्ट्रवादी कॉँग्रेस मागे पडली. राष्ट्रवादी कॉँग्रेसच्या उमेदवार सुप्रिया सुळे यांनी बारामती, इंदापूर आणि भोर विधानसभा मतदारसंघात घेतलेल्या आघाडीनेच त्यांना तारले. भारतीय जनता पक्ष- शिवसेना पुरस्कृत राष्ट्रीय समाज पक्षाचे उमेदवार महादेव जानकर बारामती विधानसभा मतदारसंघातून तब्बल ९०,६२८ मतांनी पिछाडीवर गेल्याने सुळे यांचा विजय सोपा झाला.गेल्या लोकसभा निवडणुकीत सुप्रिया सुळे यांना ५,२२,५६२ मते मिळाली. जानकर यांनी ४,५१,८४३ मते घेतली. सुळे यांचा ६९,७१९ मतांनी विजय झाला. आम आदमी पक्षाचे सुरेश खोपडे यांना २६,३९६ मते मिळविली होती. बहुजन समाज पक्षाचे काळूराम चौधरी यांनी २४,९०८ मते मिळविली होती.बारामतीची आघाडीच ठरली निर्णायक बारामती विधानसभा मतदारसंघानेच सुप्रिया सुळे यांचा विजय सोपा केला. सुळे यांना १,४२,६२८ मते मिळाली होती. जानकर यांनी ५२,००० मते घेतली. बारामतीचे आमदार तत्कालिन उपमुख्यमंत्री अजित पवार होते. याशिवाय शरद पवार, अजित पवार यांच्यासह संपूर्ण पवार कुटुंबीय ठाण मांडून होते. तरीही या मतदारसंघातील अनेक गावांत राष्टÑवादी कॉँग्रेसपेक्षा रासपने जास्त मते मिळविली होती. बारामतीचे मूळ रहिवासी असलेल्या खोपडे यांनी ३,२३९ मते मिळविली.इंदापूर मतदारसंघात आघाडी धर्माचे पालनइंदापूर विधानसभा मतदारसंघात कॉँग्रेसचे तत्कालिन सहकार मंत्री हर्षवर्धन पाटील आमदार होते. याशिवाय या मतदारसंघात राष्टÑवादी कॉग्रेसचेही चांगले जाळे होते. सुरूवातीला कॉँग्रेस- राष्टÑवादीत मनोमिन होते का? याबाबत शंका होती. मात्र, इंदापूरने सुळे यांना साथ दिली. त्यांना ८७,१८५ मते मिळाली. जानकर यांनी ६५,४९२ मते मिळविली. इंदापूरमधून सुळे यांना २१, ६९३ मतांची आघाडी मिळविली.भोर- वेल्हा-मुळशीनेही सावरलेभोर-वेल्हा-मुळशी मतदारसंघातही कॉँग्रेसचे आमदार संग्राम थोपटे आमदार होते. पवार- थोपटे वादाच्या पार्श्वभूमीवर भोरमधील राष्ट्रवादीच्या कामगिरीबाबत उत्सुकता होती. मात्र, भोर मतदारसंघानेही सुप्रिया सुळे यांना १६,८८५ मतांची आघाडी दिली. सुळे यांना ९०,९१५ तर जानकर यांना ७४,०४० मते मिळाली.दौंडने दिला राष्ट्रवादीला झटकादौंड विधानसभा मतदारसंघ ऐकेकाळचा राष्ट्रवादी कॉँग्रेसचा बालेकिल्ला. मात्र, येथील कुल-थोरात गटांच्या वादात पक्षीय धृ्रवीकरण झाले. राहुल कुल यांनी त्यावेळी राष्ट्रीय समाज पक्षामध्ये थेट प्रवेश केला नव्हता. मात्र, जानकर यांच्यासोबत होते. त्यामुळे राष्ट्रवादी कॉँग्रेसला दौंडमध्ये प्रथमच झटका बसला. सुप्रिया सुळे दौंड विधानसभा मतदारसंघातून २५,५४८ मतांनी पिछाडीवर राहिल्या. महादेव जानकर यांना ८२,८३७ तर सुप्रिया सुळे यांना ५७,२८९ मते मिळाली.यंदाच्या निवडणुकीत पुलाखालून बरेच पाणी वाहून गेले आहे. महादेव जानकर पुन्हा बारामतीतून लढणार का? हा प्रश्न आहे. त्यामुळे भारतीय जनतापक्ष- शिवसेना आघाडीचा कोण उमेदवार येणार, याबाबत उत्सुकता आहे. एखादी ‘सेलिब्रिटी’ येथून लढविण्याचा भाजपाचा विचार असल्याचीही चर्चा आहे. हे झाले तर निवडणूक चुरशीची होईल. या पार्श्वभूमीवर विधानसभा मतदारसंघातील दोन्ही पक्षांच्या सुभेदारांची जबाबदारी वाढली आहे. पुढच्या वेळी होणाऱ्या विधानसभा निवडणुकांतील समीकरणेही या निवडणुकीतून जुळली जाणार आहेत.पुरंदरमध्येही राष्ट्रवादी मागेपुरंदर विधानसभा मतदारसंघात पुणे शहराचा बराचसा भाग जोडला आहे. या ठिकाणी राष्ट्रवादीला मोठा फटका बसला. त्याचबरोबर तालुक्यातील राजकारणात पक्षाचे कार्यकर्ते विखुरले गेले होते. एकेकाळी राष्ट्रवादी कॉँग्रेसमध्ये असणारे विजय शिवतारे यांनी शिवसेनेत प्रवेश केला होता. कॉँग्रेसचे संजय जगताप यांचेही राष्ट्रवादीकाँग्रेसशी फारसे मधुर संबंध नव्हते. त्यामुळे पुरंदरमधूनही सुप्रिया सुळे ५,६६६ मतांनी मागे पडल्या. सुळे यांना ७२,४३१ मते मिळाली. जानकर यांनी ७८,०९७ मते मिळवून आघाडी घेतली.खडकवासल्यात इतिहास घडला असता...पणखडकवासला विधानसभा मतदारसंघात बहुतांश शहरातील भाग येतो. या मतदारसंघात सुुप्रिया सुळे यांना प्रयत्नांची शिकस्त करावी लागली. तरीही खडकवासल्याने जानकर यांना तब्बल २८,१२७ मतांची आघाडी दिली. जानकर यांना ९८,७२९ मते मिळाली. सुळे यांना ७०,६०२ मते मिळाली होती. जानकर यांनी राष्ट्रीय समाज पक्षाच्या चिन्हावर न लढता भारतीय जनता पक्षाचे कमळ हे चिन्ह घेतले असते तर कदाचित खडकवाल्याने इतिहास घडविला असता, अशीही चर्चा त्यावेळी रंगली होती.

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकBaramatiबारामती