शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

Pune unlock पुणेकरांना मिळणार का दिलासा? ०.१६% टक्क्यांनी पॉझिटिव्हिटी जास्त असल्याने अडचण

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 5, 2021 15:17 IST

महापालिका आज जाहीर करणार नियमावली

नव्या अनलॉक चा नियमावलीमध्ये पुणे शहराला पूर्ण दिलासा मिळणार की अंशतः आहे आज स्पष्ट होणार आहे. पाच टक्क्यांच्या खाली पॉझिटिव्हिटी जाणारी शहर जरी दुसऱ्या कॅटेगरीमध्ये टाकली गेली असली तरी पुणे शहराचा पॉझिटिव्हिटी रेट हा त्यापेक्षा किंचित जास्त म्हणजे पाच पॉईंट सोळा टक्के आहे आणि त्यामुळे पुणे शहराला कितपत दिलासा मिळणार ते पाहावे लागणार आहे.

राज्य सरकार तर्फे अनलॉक च्या प्रक्रियेची नवी नियमावली काल जाहीर करण्यात आली. यामध्ये पॉझिटिव्हिटी पाच टक्‍क्‍यांहून कमी असणारी आणि 25 टक्‍क्‍यांपेक्षा ऑक्सिजन बेड कमी भरलेले असणारी शहरे ही पहिल्या लेव्हलमध्ये टाकण्यात आली आहेत. तर पाच टक्क्यांपेक्षा कमी पॉझिटिव्हिटी 25 ते 40 टक्के ऑक्सिजन बेड भरलेले असणारी शहरे ही दुसऱ्या टप्प्यात टाकण्यात आलेली आहेत. तिसऱ्या लेव्हल मध्ये एक ते दहा टक्के या दरम्यान पॉझिटिव्हिटी असणारी शहरे आहेत. पुणे शहरामध्ये पॉझिटिव्हिटी रेट हा पाच पॉईंट सोळा टक्के आहे तर 22 टक्के ऑक्सीजन बेड भरलेले आहेत. जर दुसऱ्या लेव्हल मध्ये पुणे शहराचा समावेश झाला तर दुकान उघडे राहण्याची वेळ पूर्वीप्रमाणे राहील तर मॉल आणि मल्टिप्लेक्स त्याचबरोबर रेस्टॉरंट हे 50 टक्के क्षमतेने सुरू होऊ शकतील. प्रायव्हेट ऑफिस देखील सुरू होऊ शकेल क्रीडा संकुल यांना ही परवानगी देण्यात येईल तर लग्नाला पन्नास टक्के लोकांना हजेरी लावता येईल. मात्र वरची टक्केवारी लक्षात घेता तिसर्‍या गटात समावेश झाला तर मात्र चार वाजेपर्यंत दुकान उघडायला परवानगी मिळणार आहे. मॉल मल्टिप्लेक्स हे पूर्णपणे बंद राहणार आहेत तर रस्त्यावरील फक्त पन्नास टक्के क्षमतेने चार वाजेपर्यंत सुरू ठेवायला परवानगी मिळेल. क्रीडा संकुले आणि उद्याने ही सकाळी पाच ते नऊ दरम्यानच उघडी राहतील तर प्रायव्हेट ऑफिसेस चार वाजेपर्यंत सुरू ठेवायला परवानगी मिळणार आहे यामध्येसुद्धा 50 टक्के क्षमतेने ते ऑफीस सुरू ठेवावे लागतील. स्पोर्ट्स ऍक्टिव्हिटी ना ते नऊ सकाळी आणि सहा ते नऊ संध्याकाळी या दरम्यानच आणि तेही खुल्या वातावरणातल्या किल्ला प्रकारांना परवानगी मिळणार आहे. कोणत्याही कार्यक्रमांना फक्त पन्नास टक्के क्षमतेने लोकांना हजेरी लावावी लागणार आहे आणि तेही चार वाजेच्या आत आयोजित करावे लागतील. लग्नाला देखील 50 लोकांनाच परवानगी असेल तर अंत्यसंस्काराला फक्त 20 लोकांना परवानगी राहील. महापालिकेतील सर्वसाधारण सभा या मात्र 50 टक्के क्षमतेने घेता येतील. बांधकामावर तीसुद्धा चार वाजेपर्यंत जायला परवानगी मिळेल. शहरात पाच वाजेपर्यंत जमावबंदी असेल तर त्यानंतर संचारबंदी लागू करण्यात येईल. सलून जिम ब्युटी पार्लर हे चार वाजेपर्यंत 50% क्षमतेने आणि फक्त अपॉइंटमेंट घेऊनच सुरू राहतील. जिल्ह्याबाहेर पवार प्रवासाला परवानगी राहील.

पुणे महापालिका आज यासंदर्भात नियमावली जाहीर करणार आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शुक्रवारी घेतलेल्या बैठकीमध्ये ही नियमावली सोमवार पासून लागू करण्यात येईल अशी माहितीही दिली आहे. आता पुणेकरांचा आयुष्य पूर्ववत होतं का वरचे पॉईंट 0.16% हे त्याच्या आड येतात हे पहावे लागेल.

टॅग्स :Coronavirus Unlockलॉकडाऊन अनलॉकCoronaVirus Positive Newsकोरोना सकारात्मक बातम्याcorona virusकोरोना वायरस बातम्याMaharashtraमहाराष्ट्रPune Municipal Corporationपुणे महानगरपालिका