प्रश्नावरून मागे फिरणार नाही : शेट्टी
By Admin | Updated: November 12, 2014 23:09 IST2014-11-12T23:09:39+5:302014-11-12T23:09:39+5:30
सत्तेत असलो तरी शेतक:यांच्या प्रश्नावरून मागे फिरणार नाही. येणा:या सहकारी साखर कारखान्यांच्या निवडणूकांमध्ये स्वाभिमानी शेतकरी संघटना ऊसाला योग्य भाव देणा:याच्या पाठीशी राहणार आहे.

प्रश्नावरून मागे फिरणार नाही : शेट्टी
बारामती : ‘सत्तेत असलो तरी शेतक:यांच्या प्रश्नावरून मागे फिरणार नाही. येणा:या सहकारी साखर कारखान्यांच्या निवडणूकांमध्ये स्वाभिमानी शेतकरी संघटना ऊसाला योग्य भाव देणा:याच्या पाठीशी राहणार आहे. ऊसाला योग्य दर मिळवून देणो, हेच आमचे अंतिम ध्येय आहे. ’ असे मत स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांनी बारामती येथे व्यक्त केले.
बारामती येथे आयोजित ज्येष्ठ नेते आबाजी संभाजी देवकाते यांच्या अमृत महोत्सव कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी ज्येष्ठ नेते चंद्रराव तावरे यांना सहकारक्षेत्रतील भरिव योगदानाबद्दल सहकाररत्न हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. तसेच आबाजी देवकाते यांची ग्रंथ तुलाही यावेळी करण्यात आली.
‘आगामी काळात बारामती परिसरातील छत्रपती, सोमेश्वर, माळेगाव आदी कारखान्यांच्या निवडणूका होत आहेत. यामध्ये चंद्रराव तावरे यांची भूमिका महत्त्वाची आहे. नव्या सरकारकडून साखर कारखानदारी वाचवण्यासाठी, सहकार वाचवण्यासाठी सकरात्मक पाऊले उचलली जात आहेत. आमचीही ऊसाला दर मिळण्यासाठी पुर्वीसारखीच भूमिका घेतली जाईल. तसेच आबाजी देवकाते या सामान्य शेतक:याचा अमृतमहोत्सव म्हणजे सामान्य शेतक:याचा सन्मान आहे,’ असे त्यांनी सांगितले.
यावेळी सत्काराला उत्तर देताना चंद्रराव तावरे म्हणाले, ‘ शेतक:याच्या हितासाठी यापुढेही लढत राहणार आहे. नव्या सरकारकडून साखर कारखानदारीला खूप आपेक्षा आहेत. साखर कारखानदारीतील चुकीचे निर्णय बदलण्यासाठी भाजप सरकारकडून प्रयत्न केले जावेत,’ अशी आपेक्षाही त्यानी यावेळी व्यक्त केली.
यावेळी पृथ्वीराज जाचक, रंजन तावरे, हनुमंत सुळ, अविनाश गोफणो आदींची भाषणो झाली. यावेळी 1क्क् टनापेक्षा जास्त उत्पादन घेणा:या शेतक:यांचा सत्कार करण्यात आला. तसेच या ठिकाणी कृषी प्रदर्शनही भरवण्यात आले होते. यावेळी पृथ्वीराज जाचक यांना राज्य शासनाच्या ऊस दर नियंत्रक परिषदेवर अशासकीय सदस्य निवडीचे पत्र सदाभाऊ खोत यांच्या हस्ते देण्यात आले. वडिलांच्या अमृत महोत्सवानिमित्त कृषी प्रदर्शन, शेतक:यांचे सत्कार असा आगळा वेगळा कार्यक्रम घेतल्याबद्दल दीपक देवकाते, संजय देवकाते यांचे कौतुक करण्यात आले.
यावेळी बाळासाहेब गावडे, विश्वास देवकाते, सुनिल पोटे, सुनिल सस्ते, गुलाबराव देवकाते, अॅड. बी. जी. गावडे, दिलीप खैरे, राजेंद्र ढवाण, दादा झांबरे, गोविंदराव पाटील, बाळासाहेब कोळेकर, किशोर मासाळ, अविनाश मोटे, दशरथ राऊत, विश्वनाथ गावडे उपस्थित होते.