शहरं
Join us  
Trending Stories
1
"मी हळूहळू राजकारणातून निवृत्त होणार..."; शरद पवारांच्या निष्ठावंत नेत्याने केला खुलासा
2
'अंबानगरीची हिरवी ओळख' देशात अमरावती शहराची हवा 'या' कारणांमुळे ठरली शुद्ध !
3
मुंबई, पुणेच नाही...! छोट्या शहरांतही विवाहबाह्य संबंध वाढू लागले, ही पाच कारणे हादरवून टाकतील...
4
“नाशिकने आम्हाला नाकारले ते चांगले केले, पण...”; मनसे नेते बाळा नांदगावकर नेमके काय म्हणाले?
5
BEL-बजाज फायनान्ससह 'या' शेअर्समध्ये तेजी! पण, टाटांच्या कंपनीचा स्टॉक आपटला, कुठे किती वाढ?
6
मोठी बातमी! 'ती' खुर्ची कुणासाठी राखीव? राज्यातील जिल्हा परिषद अध्यक्षपदाचे आरक्षण जाहीर; जाणून घ्या...
7
सिंह दरबार जाळून टाकला, आता कुठे बसणार नेपाळच्या नव्या पंतप्रधान? Gen-Z शोधताहेत नवी जागा!
8
बॉयकॉट, बॉयकॉट, बॉयकॉट...! भारत-पाकिस्तान सामन्याकडे चाहत्यांची पाठ; तिकीटे खपेनात...
9
२४-२२ कॅरेट सोडा, १८ कॅरेट सोन्याला सर्वाधिक मागणी! दागिन्यांसाठी सर्वोत्तम का मानले जाते?
10
नेपाळच्या लष्कर प्रमुखांनी भारतात प्रशिक्षण घेतले, देशाला एकसंघ ठेवण्याची आता त्यांच्यावर जबाबदारी
11
“PM मोदींच्या ७५ व्या वाढदिवसानिमित्त ७५ ST बसस्थानकावर मोफत वाचनालय सुरू करणार”: सरनाईक
12
पृथ्वीवर ९ दिवस फिरत होत्या अज्ञात लहरी...; ग्रीनलँडची २०२३ ची ती घटना अन्...
13
भारतात पारडे पालटले! इन्स्टाने रील्समध्ये युट्यूबला मागे टाकले; मेटाने काय ट्रेडिंग असते ते जाहीर केले
14
२१ लाख लोक रस्त्यावर, आतापर्यंत ९०० जणांचा मृत्यू! पाकिस्तानात पुराचं थैमान 
15
वेफर्स अन् भुजिया बनवणारी कंपनीत हिस्सेदारीसाठी चुरस; पेप्सिको, आयटीसीसह अनेक कंपन्या शर्यतीत
16
शेअर बाजारातील नुकसानीपासून वाचण्याचा सॉलिड फंडा, नितीन कामथ यांनी सांगितली भन्नाट ट्रिक
17
"भविष्यात मुख्यमंत्री होण्याची माझ्याकडे ऑफर", असं कोण म्हणालं? वाचा
18
पितृपक्ष २०२५: ५ रुपयांत मिळणाऱ्या ५ वस्तू पितरांना अर्पण करा; पूर्वज आयुष्यभर आशीर्वाद देतील
19
"ही तर फक्त सुरूवात..." नाशिकमध्ये उद्धवसेना-मनसे संयुक्त जनआक्रोश मोर्चा; भाजपाला दिलं आव्हान
20
'भारताच्या वाढीमुळे घाबरले, म्हणून शुल्क लादला', ट्रम्प टॅरिफवर मोहन भागवतांचे सूचक विधान

सुरक्षिततेची भावना निर्माण करणार  : संदीप पाटील

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 30, 2018 22:07 IST

नक्षलग्रस्त गडचिरोलीला पोस्टिंग मागून घेणारे पोलीस अधिकारी म्हणून संदीप पाटील यांची ख्याती आहे़.

ठळक मुद्देशंभरांहून अधिक गुंडांना तडीपार करणारे पोलीस अधिकारी म्हणून ओळखपुण्यात रुजू झाल्यानंतर पाटील यांचे ‘बुके नको बुक द्या’ असे आवाहन

पुणे : पुणे जिल्ह्यातील जनतेत सुरक्षिततेची भावना निर्माण करण्याचे काम केले जाणार आहे. औद्योगिक वसाहतील खंडणीखोरी, गुंडगिरी खपवून घेतली जाणार नाही़. अगदी ग्रामपंचायत सदस्यापासून सर्व जण आपल्याला भेटू शकतात, असे नवनियुक्त पोलीस अधिक्षक संदीप पाटील यांनी सोमवारी पत्रकारांशी बोलताना स्पष्ट केले. पुणे ग्रामीण पोलीस दलाचे अधिक्षक सुवेझ हक यांच्या जागी सातारा जिल्ह्याचे पोलीस अधिक्षक संदीप पाटील यांची नेमणूक करण्यात आली. पाटील यांनी हक यांच्याकडून रविवारी अधिक्षकपदाची सूत्रे स्विकारली. पत्रकारांशी बोलताना पाटील म्हणाले, पुणे जिल्ह्याचा विस्तार मोठा आहे. तेथील नागरिकांच्या समस्या जाणून घेणार आहे. नागरिकांमध्ये विश्वासाचे वातावरण निर्माण करणे हे पोलिसांचे काम आहे. त्यादृष्टीने पोलिसांनी प्रयत्न केले पाहिजेत, अशा सूचना देण्यात आल्या आहेत. पुणे जिल्हयातील औद्योगिक वसाहतीत गुंडगिरी, खंडणीखोरीचे प्रकार खपवून घेतले जाणार नाहीत. अशा प्रकारच्या तक्रारी आल्यास कठोर कारवाई करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. औद्योगिक वसाहतीतील उद्योजकांमध्ये सुरक्षिततेचे वातावरण निर्माण करण्यासाठी प्रयत्न केले जाणार आहेत. आपल्याला भेटण्यासाठी परवानगीची जरुरी असणार नाही़. अगदी ग्रामपंचायत सदस्यांपासून सर्व लोकप्रतिनिधी तसेच नागरिक आपल्याला भेटू शकतात, असे त्यांनी सांगितले़ गुन्हेगारी, खासगी सावकारी, खंडणीखोर, गुंडगिरी करणाऱ्या शंभरांहून अधिक गुंडांना तडीपार करणारे आणि मोका अंतर्गत कारवाई करणारे पोलीस अधिक्षक म्हणून सातारकरांमध्ये पाटील यांनी आपली ओळख निर्माण केली़.  पाटील यांनी जून २०१६ मध्ये सातारा जिल्ह्याचा कार्यभार स्वीकारला होता. त्या अगोदर ते संवेदनशील असणाऱ्या गडचिरोलीचे पोलीस अधीक्षक म्हणून कार्यरत होते. गडचिरोलीतून साताऱ्यात हजर होत असताना त्यांनी ‘बुके नको, बुक आणा’ असे सातारकरांना आवाहन केले होते.  जिल्हावासियांनीही त्यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत पुस्तक भेट देऊन त्यांचे स्वागत केले होते. जमा झालेली ही सर्व पुस्तके त्यांनी गडचिरोली येथील नागरिकांना पाठवून एक नवा पायंडा घातला. अशा प्रकारे त्यांनी पुस्तकप्रेमी म्हणून आपली ओळख निर्माण केली होती.नक्षलग्रस्त असलेल्या गडचिरोलीची पोस्टिंग मागून घेणारे पोलीस अधिकारी म्हणून संदीप पाटील यांची ख्याती आहे़. पाटील हे गडचिरोलीत जिल्ह्यात पोलीस अधीक्षक म्हणून काम करत होते. मूळचे पोलिसी काम करत असतानाच या भागात ग्रंथालये सुरू केली. इथल्या भागातल्या विद्यार्थ्यांची बौद्धिक भूक भागावी, जगात इतरत्र काय सुरू आहे, याची माहिती त्यांना व्हावी आणि परिणामी हे युवक नक्षलवादापासून दूर राहावेत हा त्यामागचा उद्देश होता. त्यांच्या या उपक्रमाला लोकांना भरपूर प्रतिसाद दिला आहे़ पुण्यात रुजू झाल्यानंतरही त्यांनी ‘बुके नको बुक द्या’ असे आवाहन केले आहे़ 

टॅग्स :PuneपुणेPoliceपोलिसSuvez Haqसुवेज हक