स्वारगेट स्थानकात बेकायदा पार्किंग बंद होणार?
By Admin | Updated: July 3, 2016 04:16 IST2016-07-03T04:16:01+5:302016-07-03T04:16:01+5:30
सुरक्षिततेच्या कारणास्तव स्वारगेट बस स्थानकाच्या आरक्षण केंद्राच्या समोरील जागेत होणारे पार्किंग बंद करण्यात येणार आहे, तर या पार्किंगच्या ठिकाणाहून पादचाऱ्यांना स्थानकात जाण्यासाठी

स्वारगेट स्थानकात बेकायदा पार्किंग बंद होणार?
पुणे : सुरक्षिततेच्या कारणास्तव स्वारगेट बस स्थानकाच्या आरक्षण केंद्राच्या समोरील जागेत होणारे पार्किंग बंद करण्यात येणार आहे, तर या पार्किंगच्या ठिकाणाहून पादचाऱ्यांना स्थानकात जाण्यासाठी आणखी एक नवीन गेट उपलब्ध करून दिले जाणार असल्याची माहिती एसटी प्रशासनाकडून देण्यात आली. दरम्यान, शंकरशेठ रस्त्यावरील एक पादचारी गेट परिसरातील एजंटच्या त्रासामुळे बंद करण्यात आल्याचेही प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले.
या भागातील सर्व पार्किंग बंद करण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे. सुरक्षेच्या कारणाबरोबरच स्वारगेट डेपोतील पार्सल विभागाच्या जवळ पे अँड पार्किंग सुरू असल्याने हे पार्किंग बंद करण्यात येणार असल्याचेही सांगण्यात आले.
एसटीचे पश्चिम महाराष्ट्रातील स्वारगेट हे प्रमुख बस स्थानक आहे. राज्यभरातील विविध ठिकाणी या आगारातून सुमारे तीन ते साडेतीन हजार गाड्या रोज ये-जा करीत असतात. त्यामुळे या स्थानकावर नेहमीच प्रवाशांची वर्दळ असते. स्थानकात स्वारगेट चौकाच्या दिशेस असलेल्या आरक्षण केंद्राच्यासमोर मोठी रिकामी जागा आहे.