शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
मोजतबा खामेनेई कोमात, ना युद्धाची माहिती, ना..., अमेरिका-इस्राइलला ठावठिकाणाही कळला?
3
रेल्वे रुळावर गॅस सिलेंडर ठेवून प्रवाशांचा काळ बनणार होते 'ते' दहशतवादी; एटीएसचा मोठा खुलासा!
4
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
5
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
6
घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
7
Baramati bypoll Election: बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
8
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
9
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
10
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
11
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
12
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
13
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
14
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपडेट? पटापट चेक करा
15
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
16
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
17
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
18
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
19
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
20
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
Daily Top 2Weekly Top 5

पुणे विद्यापीठाच्या परीक्षेच्या गोंधळावर पडदा पडणार? परीक्षा मंडळाची मंगळवारी बैठक 

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 8, 2021 19:47 IST

विद्यापीठाने परीक्षेबाबत अद्याप कोणताही निर्णय जाहीर केला नसल्याने विद्यार्थ्यांमध्ये संभ्रमाचे वातावरण आहे...

ठळक मुद्देयेत्या 10 मार्च रोजी विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषदेची बैठक होणार परीक्षेसंदर्भातील सर्व धोरणात्मक बाबींवर अंतिम निर्णय होणार

पुणे : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या परीक्षा मंडळाची बैठक ( बीओई ) येत्या मंगळवारी (दि.9) आयोजित करण्यात आली असून त्यात 15 मार्चपासून परीक्षा घेणार की पुढे ढकलणार याबाबत निर्णय घेतला जाणार आहे. त्याचप्रमाणे विद्यापीठाच्या कंपनीकडूनच ऑनलाईन परीक्षा घेण्याबाबतचा प्रस्ताव या बैठकीत मांडला जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे पुढील दोन दिवसात परीक्षेसंदर्भातील गोंधळावर पडदा पडेल, असे सूत्रांकडून सांगितले जात आहे.

पुणे विद्यापीठाशी संलग्न तीनही जिल्ह्यातील महाविद्यालयांमधील सुमारे साडेसहा लाख विद्यार्थ्यांच्या परीक्षा 15 मार्च आणि 30 मार्चपासून सुरू करण्याचा निर्णय विद्यापीठाच्या डिसेंबर महिन्यात घेण्यात आलेल्या परीक्षा मंडळाच्या बैठकीत घेण्यात आला होता. मात्र, परीक्षेचे काम जुन्याच एजन्सीला देणे नियमाला धरून नसल्याची माहिती समोर आली. त्यामुळे येत्या 15 मार्चपासून विद्यापीठाच्या परीक्षा सुरू करणे शक्य नसल्याचे स्पष्ट झाले.परंतु,विद्यापीठाने अद्याप याबाबत कोणताही निर्णय जाहीर केला नाही.त्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये संभ्रमाचे वातावरण आहे.

विद्यापीठाने परीक्षेबाबतचा संभ्रम दूर करावा, अशी मागणी विद्यार्थी संघटनांकडून केली जात आहे. तसेच परीक्षेसंदर्भातील निर्णय परीक्षा मंडळाच्या बैठकीतच घेतले जातात. त्यामुळे परीक्षेसाठी एजन्सी निवडणे आणि परीक्षेच्या तारखा निश्चित करण्यासाठी विद्यापीठाने येत्या मंगळवारी ‘बीओई ’आयोजित केली आहे. तसेच येत्या 10 मार्च रोजी विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषदेची बैठक होणार आहे. त्यात परीक्षेसंदर्भातील सर्व धोरणात्मक बाबींवर अंतिम निर्णय होणार आहेत.परिणामी पुढील दोन दिवसात परीक्षेतील गोंधळावर पडदा पडेल,अशी शक्यता व्यक्त केली जात आहे.

टॅग्स :PuneपुणेPune universityपुणे विद्यापीठexamपरीक्षाStudentविद्यार्थीcollegeमहाविद्यालय