शहरं
Join us  
Trending Stories
1
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
2
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
3
गूढ कायम.. खरं, खोट्याचा होईना उलगडा; डॉ. वळसंगकरांच्या आत्महत्येला दहा दिवस ओलांडले
4
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार
5
१९ चाळींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण निर्णय
6
‘लिव्ह इन’, उत्तराखंड आणि समान नागरी संहिता
7
बुलेट ट्रेन २०२८ अखेरीस मुंबईतून धावणार सुसाट, नवी मुंबई विमानतळ गेम चेंजर ; मुख्यमंत्री फडणवीस
8
मुलांचा ताबा देताना धर्म विचारात घेतला जाऊ शकत नाही : हायकोर्ट
9
कान टोचले, बरे झाले ! केंद्राने विशेष पत्रक काढून माध्यमांना काही मार्गदर्शक सूचना दिल्या
10
पाण्यासाठी भारत-पाक युद्ध पेटण्याची वेळ येऊन ठेपली ?
11
मोठमोठे रस्ते बांधत आहात, इकडे लाेकांचा जीव जाताेय; जखमींवर कॅशलेस उपचारांवरून सर्वाेच्च न्यायालयाने केंद्राला फटकारले
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!

एका मिनिटांत हजारो वाहने जाणाऱ्या चांदणी चौकाची वाहतूक कोंडीतून मुक्तता होणार का?

By नितीश गोवंडे | Updated: September 15, 2022 13:50 IST

चांदणी चौकात उपाययाेजना अनेक, परिणाम मात्र शून्यच

पुणे : वाहतूक काेंडीचा हाॅटस्पाॅट ठरलेला चांदणी चाैक. वेळ हाेती बुधवारी संध्याकाळी सहा ते आठ दरम्यानची. मागील काही दिवसांपासून अनेक उपाययाेजना करूनही वाहतूक कोंडी ‘जैसे थे’ हाेती. या पुलावरील वाहतूक १३ सप्टेंबरपासून वळवली तरी परिस्थितीत सुधारणा झाली नसल्याचे दिसून आले.

चांदणी चौकातील वाहतूक कोंडीत मुख्यमंत्री अडकले अन् प्रशासनाला खडबडून जाग आली. या चौकातून मुंबईहून साताऱ्याकडे, पौंड, बाणेर, बावधन, मुळशी, भुगाव, ताम्हिणीकडे जाण्याचा रस्ता आहे. याव्यतिरिक्त हिंजवडी येथे दररोज ये-जा करणाऱ्या चाकारमान्यांची संख्या देखील मोठी आहे. त्यामुळे या चौकातील दररोजची वाहतूक कोंडी ही प्रत्येकालाच त्रासदायक ठरली होती. यातून मार्ग काढण्यासाठी चांदणी चौकातील एनडीए-पाषाण पुलाजवळ बॉटलनेक असल्याने तो पूल पाडण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे.

हे आहे चित्र

- एनडीए-पाषाण पूल पाडणार असल्याने पुण्याहून पाषाण, बावधनकडे जाणाऱ्यांना दोन किमी पेक्षा अधिक वळसा घालून जावे लागत आहे.- मुंबईहून येणारी वाहतूक आणि मुळशीकडून येणारी वाहतूक एकत्र येत असल्याने मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होत आहे. वाहतूक शाखेचे कर्मचारीही अपुरे पडत असल्याचे दिसून आले.- मुंबईहून चांदणी चौकात येत असताना मुळशीहून आलेल्या पुलाखाली वाहनांची गर्दी होत आहे. त्यातच पुण्याकडून बावधनकडे जाणारी वाहने पुलावरून वळण घेऊन येत असल्याने या कोंडीत मोठी भर पडत आहे.- एका मिनिटात साधारण १५०० वाहनांपेक्षा अधिक वाहने या परिसरातून जात असल्याने नवीन पूल उभारल्यावरही वाहतूक कोंडीतून पुणेकरांची मुक्तता होणार का, हा खरा प्रश्न आहे.

वाहनचालकांमध्ये संभ्रम

- पुण्याहून बावधनकडे कसे जावे यासाठी कोणताही दिशादर्शक फलक लावलेला नसल्याने, वाहनधारकांचे हाल.- रात्री चांदणी चौक परिसरातील रोडवर लाईट नसल्याने रिफ्लेक्शन लावण्याची गरज.- परिसरात पावसाचे पाणी साचत असल्याने वाहतूक कोंडीत मोठी भर.- मुंबईहून आलेल्या वाहनाला बावधनकडे वळता येत नसल्याने वाहनचालक संभ्रमात.

टॅग्स :chandni-chowk-pcचांदनी चौकPuneपुणेroad safetyरस्ते सुरक्षाbikeबाईकEknath Shindeएकनाथ शिंदे