शहरात होणार पाणीकपात
By Admin | Updated: October 28, 2015 01:28 IST2015-10-28T01:28:51+5:302015-10-28T01:28:51+5:30
यंदा समाधानकारक पाऊस न झाल्याने शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या पवना धरणातील पाणीसाठा अपुरा आहे. त्यामुळे पुण्यापाठोपाठ पिंपरी-चिंचवड शहरातही पाणीकपात केली जाणार असल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली.

शहरात होणार पाणीकपात
पिंपरी : यंदा समाधानकारक पाऊस न झाल्याने शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या पवना धरणातील पाणीसाठा अपुरा आहे. त्यामुळे पुण्यापाठोपाठ पिंपरी-चिंचवड शहरातही पाणीकपात केली जाणार असल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली.
पिंपरी-चिंचवड शहराला मावळातील पवना धरणातून पाणीपुरवठा होतो. गेल्या वर्षी हे धरण १५ आॅगस्टला शंभर टक्के भरले होते. मात्र, यंदा पुरेसा पाऊस न झाल्याने आॅक्टोबर महिना संपत आला, तरीही धरणातील पाणीसाठा ऐंशी टक्क्यांच्या वर गेला नाही. सध्या धरणात ७९. ७९ इतका साठा असून, ही बाब शहरासाठी चिंताजनक बनली आहे. हा पाणीसाठा अपुरा असल्याने उपलब्ध पाण्याचे योग्य नियोजन करावे लागणार आहे. प्रशासनाकडून पाणीकपातीचे नियोजन करण्यात आले आहे. कुठल्या भागात कोणत्या एका वेळेत पाणीपुरवठा सुरू ठेवायचा, याबाबतचे नियोजन पाणीपुरवठा विभागातील अधिकाऱ्यांकडून केले जात आहे.
यंदाप्रमाणे पुढील वर्षीदेखील पाऊस लांबल्यास अधिकच पाणीटंचाई जाणवू नये, याचाही विचार करावा लागणार आहे. यामुळे पुढील वर्षीच्या जुलै, आॅगस्टपर्यंत पाणी कसे पुरेल, या दृष्टीनेही नियोजन केले जात असल्याचे सूत्रांनी सांगितले. उपलब्ध पाण्याचा कंपन्यांनी आणि नागरिकांनी काटकसरीने वापर करावा,
असे आवाहन महापालिकेकडून केले जात आहे. (प्रतिनिधी)