शहरं
Join us  
Trending Stories
1
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
2
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
3
"बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून... "; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
4
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
5
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
6
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
7
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
8
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
9
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
10
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
11
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
12
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
13
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
14
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
15
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
16
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
17
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
18
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
19
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
Daily Top 2Weekly Top 5

...तर शेतकरी कंपन्याही बंद पडतील - सुभाष देशमुख

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 7, 2018 02:57 IST

शेतकरी उत्पादन कंपन्यांनी केवळ कमिशन एजंट म्हणून काम न करता शेतकऱ्यांचे दूत म्हणून काम करावे. अन्यथा त्यांना केवळ नाफेड व राज्य सरकारच्या कुबड्या घेवूनच काम करावे लागेल. खरेदी-विक्री संघाप्रमाणे या कंपन्याही बंद पडतील, अशी आशंका सहकार व पणन मंत्री सुभाष देशमुख यांनी आज (दि.६) येथे बोलताना व्यक्त केली.

इंदापूर - शेतकरी उत्पादन कंपन्यांनी केवळ कमिशन एजंट म्हणून काम न करता शेतकऱ्यांचे दूत म्हणून काम करावे. अन्यथा त्यांना केवळ नाफेड व राज्य सरकारच्या कुबड्या घेवूनच काम करावे लागेल. खरेदी-विक्री संघाप्रमाणे या कंपन्याही बंद पडतील, अशी आशंका सहकार व पणन मंत्री सुभाष देशमुख यांनी आज (दि.६) येथे बोलताना व्यक्त केली.महाएफपीसी व नाफेड यांच्या तर्फे भीमाव्हॅली शेतकरी उत्पादक कंपनीमार्फत कांदा खरेदी २०१८ चा उद्घाटन समारंभ त्यांच्या हस्ते पार पडला. त्यावेळी ते बोलत होते. महाएफपीसीचे व्यवस्थापकीय संचालक योगेश थोरात कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते. इंदापूर कृषी उत्पन्न बाजार बाजार समितीचे सभापती अप्पासाहेब जगदाळे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. कृषी उत्पन्न बाजार समितीच्या शेतमाल निर्यात सुविधा केंद्राच्या आवारात हा कार्यक्रम पार पडला.आपल्या भाषणात देशमुख म्हणाले की, काही कंपन्या केवळ शेतकºयांचे शोषण करण्याचा प्रयत्न करत आहेत. ज्या विश्वासाने शेतकरी उत्पादन कंपन्या काढल्या गेल्या त्या विश्वासाला तडा जातो आहे. आपण मध्यस्थ आहोत याची काळजी घ्यावी, असे सांगून ते म्हणाले की, चांगली भूमिका घेतली तर शेतकºयांची वाट लागणार नाही. चुकीची भूमिका घेतली तर शेतकरी अडचणीत येणार आहेत. कर रूपाने सरकारला भरलेला आपला पैसा मातीत जाण्याची शक्यता आहे. यावेळी अप्पासाहेब जगदाळे, योगेश थोरात यांचीभाषणे झाली.परवाना रद्द करावाबाजार समित्यांनी शेतकºयांकडून कमिशन कापून घेवू नये, असा आदेश शासनाने काढला आहे. तरी देखील वेगळ्या पद्धतीने कमिशन कापण्याचा प्रकार बाजार समित्यांकडून होत असल्याच्या तक्रारी येत आहेत. अशा कमिशन एजंटांवर कठोर कारवाई करावी. त्याचा परवाना रद्द करावा, अशी सूचना देशमुख यांनी दिली.भाव वाढू द्या;खिशाला परवडत नसेल तर कांदा खावू नका!कांद्याचे भाव थोडा जरी वाढला तरी कांदा खाताना डोळ्यात पाणी येवू लागले, असे पत्रकार लिहितात. वर्षभर कांदा नाही खाल्ला तर काय होईल शरीराचं, काही नाही.जैन समाज तर कांदाच खात नाही. जे कांदा खावून रडतात ना त्यांची आर्थिक परिस्थिती सुधारत नाही. त्यांना सल्ला द्या कांद्याचा भाव वाढू द्या; खिशाला परवडत नसेल तर कांदा खावू नका.शेतकºयाला चांगला भाव मिळत असेल तर मिळू द्या,असा सल्ला सहकार मंत्री देशमुख यांनी दिला.

टॅग्स :Subhash Deshmukhसुभाष देशमुखMaharashtraमहाराष्ट्रPuneपुणे