गळा आवळून पत्नीचा खून

By Admin | Updated: April 25, 2017 04:23 IST2017-04-25T04:23:08+5:302017-04-25T04:23:08+5:30

रागाच्या भरात दोरीने पत्नीचा गळा आवळून खून केल्याची घटना बाणेर येथील माऊली गार्डन येथे घडली. आरोपीला चतु:शृंगी पोलिसांनी अटक केली आहे.

Wife's murder on the throat | गळा आवळून पत्नीचा खून

गळा आवळून पत्नीचा खून

पुणे : रागाच्या भरात दोरीने पत्नीचा गळा आवळून खून केल्याची घटना बाणेर येथील माऊली गार्डन येथे घडली. आरोपीला चतु:शृंगी पोलिसांनी अटक केली आहे.
शोभा शेरबहाद्दूर थापा असे मृत महिलेचे नाव आहे. शेरबहाद्दूर जब्बरसिंग थापा (वय ४०, रा. उज्ज्वल शिरीन, बी बिल्डिंग टेरेसवरील रूम, माऊली गार्डन, बाणेर, मूळ रा. नेपाळ) याला अटक करण्यात आली आहे. मृत महिलेची भाची पूजा राठोड (वय २५, रा. खराबवाडी, चाकण, मूळ रा. मु. पो. किल्लारी, ता. औसा, जि. लातूर) हिने फिर्याद दिली आहे. आरोपीवर ३०२ कलमांतर्गत चतु:शृंगी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पूजा हिने दिलेल्या जबाबानुसार, नातेवाइकांच्या ओळखीने दहा वर्षांपूर्वी शोभा हिचे शेरबहाद्दूर थापा यांच्याशी लग्न झाले. तेव्हापासून मावशी बाणेरमधील उज्ज्वल शिरीन, बी बिल्डिंग टेरेसवरील रूम, माऊली गार्डन या ठिकाणी राहत आहे. मावशीला मूल-बाळ नव्हते. तिचे पती बिल्डिंगमध्ये वॉचमनचे काम करतात. दारू, गांजा पिऊन ते मावशीला वेळोवेळी मारहाण करायचे. तिने ही माहिती माहेरच्या लोकांना दिली होती. नातेवाइकांनी वेळोवेळी लातूरवरून येऊन काका शेरबहाद्दूर थापा यांना समजावून सांगितले होते. काका तासन्तास वेगवेगळ्या लोकांशी आणि बायकांशी गप्पा मारत असे. त्यावरूनदेखील दोघांमध्ये भांडणे होत होती. या प्रकरणाचा सहायक पोलीस निरीक्षक संदीप केंजळे तपास करीत आहेत.(प्रतिनिधी)

Web Title: Wife's murder on the throat