शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
होर्मुजच्या समुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
3
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
4
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
5
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
6
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
7
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
8
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
9
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
10
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
11
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
12
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
13
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
14
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
15
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
16
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
17
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
18
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
19
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
Daily Top 2Weekly Top 5

कुत्र्याची पिले व ढेकणांनी त्रस्त पत्नी पुन्हा आली सासरी

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 11, 2018 04:12 IST

पोटगीसाठी केला होता अर्ज; पतीने केला होता फ्लॅट व बुलेटसाठी शारीरिक छळ

पुणे : पतीला कुत्र्यांची अती आवड. त्यामुळे कुत्र्याची पिले रात्रंदिवस घरातच असायची. मात्र, त्यांचे केस जेवणात व पाण्यात जात; तसेच त्यांनी घरात केलेली घाण काढावी लागे. यातच घरात ढेकणांचा सुळसुळाट. वरून सासरच्या व्यक्तींनी प्रशस्त फ्लॅट घेऊन द्यावा, फिरायला बुलेट द्यावी, अशी मागणी करीत संयश घेऊन छळ झालेली पत्नी तडजोडीअंती अखेर पुन्हा नांदायला जाण्यास तयार झाली आहे.वडील व चुलत्यांना अपशब्द वापरल्याने प्रत्युत्तर दिले म्हणून पतीने केलेली मारहाण, पत्नीवर सतत विवाहबाह्य संबंध असल्याचा संशय घेणे, खर्चायला पैस न देणे, रात्री उरलेले अन्न खायला देणे, अशा त्रासाला कंटाळून पत्नीने आॅक्टोबर २०१७मध्ये केलेला पोटगी मिळण्याचा आणि कौटुंबिक हिंसाचाराचा दावा अखेर तिने मागे घेतला आहे. शनिवारी झालेल्या लोकन्यायालयात दोघांचे समुपदेशन करण्यात आल्यानंतर तब्बल तीन वर्षे स्वतंत्र राहिलेले हे जोडपे आता पुन्हा नांदायला लागले आहे.सोनू व पूनम असे या पती-पत्नीचे नाव. पूनम ही घरीच असायची, तर सोनू हा तळेगाव येथे एका कॉलेजमध्ये चांगल्या पगाराच्या नोकरीवर होता. सोनू याने घरात कुत्र्याची पिले पाळली होती. रात्रंदिवस ती घरातच असायची. त्यामुळे घरात नेहमी अस्वच्छता व आजारपण असे. कुत्र्यांचे केस पाण्यात व जेवण्यात जात. तसेच त्यांनी घरात केलेली घाण पूनम यांना काढावी लागे. या बाबी पूनम यांना आवडायच्या नाहीत.घरात असलेल्या ढेकणांनीदेखील त्या त्रस्त झाल्या होत्या. त्याव्यतिरिक्त विविध कारणांवरून त्यांचा शारीरिक व मानसिक छळ करण्यात येत होता. त्यामुळे पूनम यांनी अ‍ॅड. संतोष काशिद यांच्यामार्फेत खडकी न्यायालयात २०१७मध्ये पोटगीचा दावा दाखल केला होता.दरमहा २५ हजार रुपये पोटगी आणि अर्जाचा खर्च व त्रासापोटी १५ लाख रुपये मिळावेत, अशीमागणी दाव्यात करण्यात आली होती.सुखात नांदविण्याचे वचन...तब्बल तीन वर्षे स्वतंत्र राहिल्यानंतर शनिवारी (दि. ८ डिसेंबर) झालेल्या लोकअदालतीमध्ये हा दावा ठेवण्यात आला होता, त्या वेळी दोघांचे समुपदेशन करण्यात आले. सोनू याला आयुष्याचे महत्त्व पटवून देत दोघांनी सुखाने नांदावे, असे सांगण्यात आले. कुत्र्यांना यापुढे घराच्या बाहेर ठेवून पूनमला चांगल्या प्रकारे वागविण्याचे त्याने वचन दिले. सोनू यांच्या वतीने अ‍ॅड. सोमीनाथ सोनवणे आणि अ‍ॅड. सुनील क्षीरसागर यांनी कामकाज पाहिले.

टॅग्स :Divorceघटस्फोटCourtन्यायालय