अपघातात पत्नी ठार, पती जखमी

By Admin | Updated: January 9, 2017 02:26 IST2017-01-09T02:26:12+5:302017-01-09T02:26:12+5:30

येथील उड्डाणपुलावर दुचाकीला पाठीमागून कंटेनरने धडक दिल्याने विमल बापू अडसूळ (वय ५०, रा, अरण्येश्वर, संतनगर, पुणे) यांच्या डोक्यावरून चाक गेल्याने

Wife killed and husband injured in accident | अपघातात पत्नी ठार, पती जखमी

अपघातात पत्नी ठार, पती जखमी

पाटस : येथील उड्डाणपुलावर दुचाकीला पाठीमागून कंटेनरने धडक दिल्याने विमल बापू अडसूळ (वय ५०, रा, अरण्येश्वर, संतनगर, पुणे) यांच्या डोक्यावरून चाक गेल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला तर त्यांचे पती बापू अडसूळ हे गंभीर जखमी झाले आहेत.
यानंतर भीतीपोटी कंटेनरचालक कैलास शेकडे (रा, म्हसोबावाडी, बीड) याने उड्डाणपुलावरून खाली उडी मारल्याने त्याचे दोन्ही पाय तुटले आहेत. दरम्यान, त्याची प्रकृती चिंताजनक आहे. दोन्ही जखमींवर वरवंड येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरू असल्याची माहिती सहायक फौजदार संतोष शिंदे यांनी दिली.
दुपारी तीनच्या सुमारास दुचाकीवरील दांपत्य येथील त्यांच्या नातेवाइकांकडून पुण्याला घरी निघाले होते.
त्यांना कंटेनरने (एम.एच ०४, सीपी २६९०) पाठीमागून धडक दिल्याने हा अपघात झाला. या वेळी पाटस टोलनाक्यावरील संपूर्ण यंत्रणेसह पोलीस आणि ग्रामस्थ मदतीला धावून आले. (वार्ताहर)

Web Title: Wife killed and husband injured in accident

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.