शहरं
Join us  
Trending Stories
1
मराठी मुलीच्या वडिलांना, काकांना दहशतवाद्यांनी नाव विचारून डोळ्यांदेखत गोळ्या घातल्या- एकनाथ शिंदे
2
"तुला मारणार नाही, जा आणि मोदींना सांग"; पतीची डोळ्यांसमोर हत्या केल्यानंतर दहशतवाद्यांनी पत्नीला धमकावलं
3
महाराष्ट्रातल्या दोन पर्यटकांचा पहलगाम हल्ल्यात मृत्यू; पर्यटक जखमी असल्याची CM फडणवीसांची माहिती
4
जम्मू-काश्मीरमध्ये मोठा दहशतवादी हल्ला; नाव विचारुन झाडल्या गोळ्या, 27 जणांच्या मृत्यूची भीती
5
"सरकारला धन्यवाद, पण पुन्हा एकदा सांगतो..."; हिंदी सक्तीच्या माघारीनंतर राज ठाकरेंचे ट्विट
6
दररोज फक्त ₹7 ची बचत करा अन् दरमहा ₹5000 मिळवा; जाणून घ्या सरकारी योजनेचे फायदे...
7
पहलगाममध्ये टीआरएफने घडवला नरसंहार; दहशतवादी संघटनेने पत्र जारी करुन सांगितले कारण
8
'दोषींना सोडणार नाही, कठोर शिक्षा...', पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर PM मोदींची तीव्र प्रतिक्रिया
9
‘यूपीएससी’त प्रज्ञाचक्षू विद्यार्थ्यांमध्ये मनू गर्ग देशात अव्वल
10
बजाजच्या या शेअरनं दिला 22000% हून अधिकचा परतावा, गुंतवणूकदारांना केलं मालामाल; आता...!
11
पहलगाम हल्ल्यानंतर पंतप्रधान मोदींचा गृहमंत्र्यांना फोन; अमित शाहांना जम्मू-काश्मीरला जाण्याची सूचना
12
'हा' अमित मिश्रा वेगळा... कौटुंबिक हिंसाचाराचे आरोप झालेला क्रिकेटर नेमका कोण? जाणून घ्या...
13
"...तर भविष्यात भयानक परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता होती"; 'वक्फ'बाबत किरण रिजिजूंचे वक्तव्य
14
फक्त मराठीच अनिवार्य, हिंदी सक्तीवर सरकारचे एक पाऊल मागे; नवीन आदेश काढणार
15
तुम्हाला वारंवार तहान लागते, पाणी प्यायल्यावरही घसा कोरडा होतो? 'या' गंभीर आजारांचे संकेत
16
मत्स्य व्यवसायाला कृषी क्षेत्रासारखाच दर्जा; मंत्रिमंडळ बैठकीत अनेक महत्त्वपूर्ण निर्णय
17
बँकेने गुन्हा दाखल केल्याने त्याची सटकली, साथीदारांना सोबत घेत अख्खी बँकच पेटवली
18
UPSC पास झाल्यानंतर उमेदवारांना पहिला पगार कधी आणि किती मिळतो? पाहा...
19
"मुस्लीम राजेशाही असो अथवा लोकशाही, वक्फ सर्वत्र...;" सौदीत पोहोचलेल्या PM मोदींवर ओवेसींचा निशाणा
20
Jammu and Kashmir : दहशतवाद्यांनी पर्यटकांना आधी विचारला 'हा' प्रश्न अन् सुरू केला गोळीबार, नेमकं काय घडलं?

पुणे शहरातील सहा मीटर रस्त्यांचे लवकरच रूंदीकरण होणार : हेमंत रासने 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 29, 2020 21:09 IST

शहरामध्ये अनेक ठिकाणी कमी रुंदीच्या रस्त्यांवर टीडीआर वापरता येत नसल्यामुळे या ठिकाणच्या बांधकामांचा प्रश्न निर्माण

पुणे : शहराच्या विकासाला चालना देण्यासाठी ६ व ९ मीटर रस्त्यांचे कलम २१० अंतर्गत रुंदीकरण करण्यात येणार आहे. यासाठी हरकती- सूचना मागविण्यास प्रशासकीय प्रक्रिया पूर्ण झाल्यावर महापालिका आयुक्तांनी मान्यता दिली असल्याची माहिती स्थायी समितीचे अध्यक्ष हेमंत रासने यांनी दिली. 

शहरामध्ये अनेक ठिकाणी कमी रुंदीच्या रस्त्यांवर टीडीआर वापरता येत नसल्यामुळे, या ठिकाणच्या बांधकामांचा प्रश्न निर्माण झाला आहे. त्याचबरोबर शहरातील पेठा आणि मध्यवर्ती भागातील रस्ते कमी रुंदीचे असल्यामुळे इमारतींच्या पुनर्विकासाचा प्रश्न सुध्दा प्रलंबित होता. परंतु, आता शहरातील ६ मीटर रुंदीचे ३२३ रस्ते ९ मिटर रूंद करण्यासाठी हरकती व सूचना मागवण्यात येणार आहेत. महापालिका आयुक्त विक्रम कुमार यांनी यास परवानगी दिल्यामुळे सदर रस्त्यांचा मार्ग मोकळा झाला आहे. दरम्यान स्थायी समितीने ३२३ रस्त्यांसह शहरातील सर्वच छोट्या रस्त्यांच्या रुंदीकरणास यापूर्वीच संमती दिली आहे. 

पुणे शहराच्या नियोजनबध्द विकास होण्यासाठी ६ व ९ मीटर रस्त्यांचे रुंदीकरण २१० अंतर्गत करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. राज्य शासनाने सुध्दा सुधारित बांधकाम नियमावलीमध्ये याला सहमती दर्शवली आहे. या निर्णयामुळे शहरातील रखडलेला विकास, बांधकाम प्रकल्प यांना चालना मिळेल व पेठांमधील जुन्या वाड्यांचा प्रश्न यामुळे सुटण्यास मदत होईल. त्यातून शहराचा सर्वांगिण विकास होईल असा विश्वास हेमंत रासने यांनी व्यक्त केला आहे.      ---------------------------------

टॅग्स :PuneपुणेPune Municipal Corporationपुणे महानगरपालिका