नैसर्गिक टेकडीला कृत्रिम साज हवाच कशाला! चतु:श्रृंगी टेकडीवरील वनविहाराला नागरिकांचा विरोध; नियोजन मंडळाच्या बैठकीत मिळालेली मंजुरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 05:15 IST2021-02-05T05:15:31+5:302021-02-05T05:15:31+5:30

पालकमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या जिल्हा नियोजन मंडळ बैठकीत आमदार सिध्दार्थ शिरोळे यांनी ही संकल्पना मांडली आहे. ...

Why a natural hill with artificial decoration! Citizens oppose forest trekking on Chaturshringi hill; Approval received at the meeting of the Planning Board | नैसर्गिक टेकडीला कृत्रिम साज हवाच कशाला! चतु:श्रृंगी टेकडीवरील वनविहाराला नागरिकांचा विरोध; नियोजन मंडळाच्या बैठकीत मिळालेली मंजुरी

नैसर्गिक टेकडीला कृत्रिम साज हवाच कशाला! चतु:श्रृंगी टेकडीवरील वनविहाराला नागरिकांचा विरोध; नियोजन मंडळाच्या बैठकीत मिळालेली मंजुरी

पालकमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या जिल्हा नियोजन मंडळ बैठकीत आमदार सिध्दार्थ शिरोळे यांनी ही संकल्पना मांडली आहे. पाचगांव येथील वनविहारच्या धर्तीवर या टेकड्यांचा विकास व्हावा आणि त्यासाठी निधी मिळावा, असा प्रस्ताव बैठकीत शिरोळे यांनी मांडला होता. वन राज्य मंत्री दत्तात्रय भरणे यांनी तत्त्वतः या प्रकल्पाला मंजुरी दिली असून लवकरच त्याकरिता निधी मंजूर करण्यात येईल, असे सांगितले.

याबाबत नुकतेच इकॅालॅाजीकल सोसायटीच्या स्वाती गोळे, पर्यावरणप्रेमी पुष्कर कुलकर्णी, सुषमा दाते, सुमित्रा काळे आदींनी शिरोळे यांची भेट घेतली. त्यांना कृत्रिम बांधकाम न करता नैसर्गिकपणा टिकवला पाहिजे, अशी विनंती केली. त्यावर शिरोळे यांनी ते मान्य केले असून,पुणे इकाॅलॅाजिकल सोसायटीला मास्टर प्लान तयार करण्यासाठी सांगितले आहे. त्यानुसार लवकरच सोसायटीकडून हा प्लान देण्यात येणार आहे.

==============

टेकडीवर बांधकाम केले तर तेथील नैसर्गिकपणा नष्ट होईल. अनेक ठिकाणी झाडे लावली जात आहेत. खरंतर माळरानाचे वेगळे महत्त्व असते. ते तसेच ठेवले पाहिजे. चालण्यासाठी रस्ता बनवणे किंवा बसण्यासाठी बाक हवेत, हे टेकडीवर नकोच आहे. टेकडी जशी आहे, तशीच ठेवून तिचे संवर्धन करायला हवे.

- पुष्कर कुलकर्णी, पर्यावरणप्रेमी, चतृ:श्रृंगी टेकडी

========================

टेकडीवर ‘विकास’ कशाला ?

टेकड्यांवर बांधकाम करून त्याचे सौंदर्यीकरण कशाला करायचे ? खरंतर शहरात सर्वत्र रस्ते, बसण्यासाठी बाके आहेत. टेकडीवर याची गरज नाही. तिथे गवतावर, दगडावर बसून तेथील आनंद घेतला पाहिजे. विकासाच्या नावावर टेकडीचा नैसर्गिकपणा घालवणे अयोग्य आहे. त्याला आमचा विरोधच आहे, असे पर्यावरणप्रेमींचे म्हणणे आहे.

==========================

Web Title: Why a natural hill with artificial decoration! Citizens oppose forest trekking on Chaturshringi hill; Approval received at the meeting of the Planning Board

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.