मेट्रोचा भुर्दंड कशासाठी?
By Admin | Updated: March 9, 2015 00:51 IST2015-03-09T00:51:21+5:302015-03-09T00:51:21+5:30
गेल्या काही वर्षांपासून पुणे मेट्रोचा प्रवास महापालिका, राज्य शासन आणि केंद्र शासन असा सुरू आहे. एकाच मेट्रोला महापालिकेने तीन वेळा,

मेट्रोचा भुर्दंड कशासाठी?
पुणे : गेल्या काही वर्षांपासून पुणे मेट्रोचा प्रवास महापालिका, राज्य शासन आणि केंद्र शासन असा सुरू आहे. एकाच मेट्रोला महापालिकेने तीन वेळा, राज्याने दोनवेळा आणि केंद्राने एकवेळा तत्त्वत: मान्यता दिली. दोन वेळा अर्थसंकल्पीय तरतूद करण्यात आली. तरीही भाजपाच्या लोकप्रतिनिधींचे मेट्रोच्या मार्गावर एकमत होत नाही.
पुणे मेट्रोची चर्चा २००६ पासून सुरू झाली. त्या वेळी केंद्र व राज्यात काँग्रेस आघाडीचे सरकार होते. दिल्ली मेट्रो रेल कार्पोरेशनने (डीएमआरसी) पुणे व पिंपरी-चिंचवड शहराचे सर्वेक्षण करून, अहवाल २००९ मध्ये महापालिकेला सादर केला. ‘डीएमआरसी’च्या अहवालात केवळ पुणे शहरातून जाणारा ‘वनाज ते रामवाडी’ हा मार्ग जमिनीवरून आणि ‘पिंपरी-चिंचवड ते स्वारगेट’ हा मार्ग काही ठिकाणी भुयारी व काही ठिकाणी जमिनीवरून प्रस्तावित केला आहे; मात्र पुणे महापालिकेने जुलै २०१० मध्ये केवळ ‘वनाज ते रामवाडी’ या एकाच मार्गाला मान्यता देऊन प्रस्ताव पाठविला होता. (प्रतिनिधी)