शहरं
Join us  
Trending Stories
1
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
2
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा
3
राज्यात दोन-तीन भागात गुन्हेगारी वाढतेय, त्यात पुणे येतं; याला जबाबदार कोण? - सुप्रिया सुळे
4
राजा रघुवंशीच्या भावाच्या पत्नीने केला सनसनाटी दावा, म्हणाली, "माझ्या मुलाचा बाप…’’
5
Viral Video: नाशकात दुचाकीवरून आलेल्या सोनसाखळी चोराला महिलेनं दाखवला इंगा!
6
IND vs ENG ...तर भारतीय गोलंदाजाला ठोसा मारला असता; आकाशदीपसंदर्भात काय म्हणाला पाँटिंग?
7
"...तर तुम्हालाही अटक होईल"; राज ठाकरेंनी दिलेल्या आव्हानावर CM फडणवीस स्पष्टच बोलले
8
संजय बांगरची 'ट्रान्सजेंडर' मुलगी अनाया बांगर हिची धडाकेबाज फटकेबाजी, पाहा फलंदाजीचा VIDEO
9
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन
10
"शाहरुखपेक्षा विकी कौशलने सॅम बहादूरमध्ये चांगलं काम केलं होतं", राष्ट्रीय पुरस्कारावर लेखिकेची पोस्ट
11
Yavat Violence: "बाहेरून आलेले लोक तिथे..." यवत हिंसाचाऱ्याच्या घटनेवर सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया
12
SIP चे दिवस गेले? आता लाँच होणार SIF; 'या' कंपनीला SEBI कडून मिळाली मंजुरी
13
Ritual: एखाद्या व्यक्तीच्या निधनानंतर घरात तीन दिवस का केला जात नाही स्वयंपाक? वाचा शास्त्र!
14
झुनझुनवालांनी 'या' कंपनीचे सर्व शेअर्स विकले, ३ वर्षात १११% रिटर्न; Zerodha च्या निखिल कामथांचीही आहे गुंतवणूक
15
"१५-२० वर्ष इथे राहूनही मराठी येत नसेल तर लाज वाटली पाहिजे...", श्रुती मराठे स्षष्टच बोलली
16
'ही' आहे अखेरची तारीख; इन्कम टॅक्स रिटर्न फाईल केलं नाही तर लागेल मोठा दंड, पाहा डिटेल्स
17
"...अन् कुंदन डोळे उघडतो", 'रांझणा'चा AI व्हिडिओ पाहिलात का? थिएटरमध्ये शिट्ट्यांचा कडकडाट
18
ब्रह्मोस क्षेपणास्त्र मिळाल्याने चीनचा 'हा' शत्रू झाला खूश! करतोय अमेरिकेला धक्का देण्याची तयारी
19
कोकणातील प्रसिद्ध Red Soil Stories युट्युब चॅनेलच्या शिरीष गवस यांचं आकस्मिक निधन 
20
मानवी हाडे, लाल ब्लाऊजचा तुकडा अन् ATM कार्ड...; जमिनीत गाडलेल्या शेकडो मृतदेहाचे रहस्य उलगडणार

वेदांतावरून रडताय, हे चार प्रकल्प कोणी रोखले? निर्मला सीतारमण यांनी पुण्यात ठाकरे, पवारांना सुनावले

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 24, 2022 21:05 IST

पुणे, बारामतीच्या दौऱ्यावर आलेल्या अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी विरोधकांना चांगलेच सुनावले आहे.   

पुणे : पुण्यातील तळेगावमधे येणारा वेदांता-फॉक्सकॉन प्रकल्प गुजरातला गेला. यावरून आज युवा सेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी तळेगावमध्ये आंदोलन केले. यानंतर पुणे, बारामतीच्या दौऱ्यावर आलेल्या अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी विरोधकांना चांगलेच सुनावले आहे.   

आता विरोधक वेदांता प्रकल्प बाहेर गेल्याने रडत बसले आहेत. पण त्यांनी आधी चार मोठे प्रकल्प देशात येऊ का दिले नाहीत याचे उत्तर द्यावे असे ठणकावले. तसेच याला महाविकास आघाडी सरकार जबाबदार असल्याचा आरोप त्यांनी केला. पुण्यातील विधानभवनातील पत्रकार परिषेत त्य़ा बोलत होत्या. या परिषदेला चंद्रशेखर बावनकुळे, चंद्रकांत पाटील, योगेश टिळेकर, जगदीश मुळीक, बापू मानकर, माधुरी मिसाळ, राम शिंदे उपस्थित होते. 

नाणार सारखा प्रकल्प येऊ दिला नाही. आशियामध्ये सर्वात मोठी ऑईल रिफायनरी ठरला असता. त्याला कोणी थांबवले? आरे मेट्रो कारशेड सारख्या प्रकल्पाला कोणी थांबवले होते. मुंबई ते अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्पाला कोणी थांबवले होते? असा सवाल सीतारमण यांनी केला. याचबरोबर हे प्रकल्प जर झाले असते तर त्याचे श्रेय पंतप्रधान नरेंद्र मोदींना गेले असते, म्हणून हे प्रकल्प रोखण्यात आल्याचा आरोप सीतारामण यांनी केला. आज राज्यातून एक प्रकल्प गेला तर विरोधक आरडाओरडा करत आहेत. पण देशातील मुख्य चार प्रकल्प कोणी येऊ दिले नाहीत? याला उत्तर महाविकास आघाडीने द्यावे त्यानंतरच आम्हाला प्रश्न विचारावेत असेही सीतारामण यांनी सुनावले. 

सहकार क्षेत्रात राजकीय पोळी शेकणाऱ्या नेत्याने सहकारसाठी वेगळे मंत्रालय बनविण्यासाठी प्रयत्नही केला नाही. ते आता मोदींनी बनविले. राज्यात मोठ्या प्रमाणात सहकार क्षेत्र विस्तारलेले आहे, असेही सीतारामण म्हणाल्या. सध्या देशात डॉलरच्या तुलनेत रुपयाच्या दरांमध्ये घट झालीय यावर बोलताना निर्मला म्हणाल्या की "आमच्या चलनावर चांगली पकड आहे. बाकीच्या देशांच्या चलनाच्या तुलनेत रुपयाने डॉलरच्या तुलनेत चांगली पकड घेतली आहे. अर्थमंत्रालय या गोष्टीवर लक्ष ठेवून आहे."

टॅग्स :Nirmala Sitaramanनिर्मला सीतारामनFoxconn Vedanta Dealवेदांता-फॉक्सकॉन डीलSharad Pawarशरद पवारUddhav Thackerayउद्धव ठाकरे