शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

काेराेना विषाणूची तपासणी केवळ NIV संस्थेतच का हाेते ?

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 5, 2020 21:00 IST

कुठलाही साथीचा राेग उद्भवल्यास पुण्यातील एनआयव्ही या संस्थेचे महत्त्व वाढते.

पुणे : कुठलाही साथीचा राेग झाल्यानंतर एनआयव्ही अर्थात राष्ट्रीय विषाणू विज्ञान संस्थेचा उल्लेख हाेत असताे. स्वाईन फ्लूपासून या संस्थेचे महत्त्व अधिक अधाेरेखित झाले. प्राण्यांमार्फत हाेणाऱ्या साथिच्या राेगांवार संशाेधन करणारी एनआयव्ही ही भारतातील एकमेव संस्था आहे. 1952 साली पुण्यात या संस्थेची स्थापना करण्यात आली. 

काेराेना विषाणूने जगभरात धुमाकूळ घातला आहे. जगभरातील अनेक नागरिकांना या विषाणूची लागण झाली आहे. भारतात 29 जणांना या विषाणूची लागण झाल्याचे समाेर आले आहे. त्यामुळे सर्वत्र खबरदारी घेण्यात येत आहे. एखाद्या व्यक्तीला काेराेनाची लागण झाली आहे की नाही याची तपासणी एनआयव्ही संस्थेकडून करण्यात येते. देशभरातील संशयित रुग्णांच्या घशातील द्रवाचे नमुने एनआयव्हीकडे तपासणीसाठी पाठविले जातात. या आधी स्वाईन फ्लू तसेच निपाह विषाणूची लागण झाली आहे की नाही याची तपासणी सुद्धा एनआयव्हीकडूनच केली जात हाेती.  

एनआयव्ही संस्था काय करते एनआयव्ही ही विषाणूजन्य राेगांवर संशाेधन करणारी भारतातील एकमेव संस्था आहे. विषाणूजन्य राेगांवर लस शाेधून काढण्याचे काम या संस्थेद्वारे केले जाते. देशभरातील तज्ञ संशाेधक या संस्थेमध्ये संशाेधन करतात. एचआयव्ही एड्स या आजारावर देखील या संस्थेद्वारे माेठ्याप्रमाणावर संशाेधन करण्यात येत आहे. जागतिक आराेग्य संघटनेसाेबत देखील ही संस्था काम करते. या संस्थेकडून प्राण्यांमार्फत संसर्गजन्य राेग कसा हाेताे, त्याची कुठली लक्षणे शरिरावर दिसतात, त्यावर काय उपाय केले जाऊ शकतात यावर संशाेधन करण्यात येते. या संस्थेची माेठी प्रयाेगशाळा असून तेथे विविध प्रयाेग केले जातात. 

टॅग्स :corona virusकोरोनाPuneपुणेHealthआरोग्य