म्हातोबा टेकडीवरील वन्यजीवांचे रक्षण करणार कोण? सापाला दगडाने ठेचून मारले; नागरिकांच्या येण्या-जाण्याच्या वेळांत वन विभागाकडून सतत गस्त हवी!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 18, 2021 04:11 AM2021-01-18T04:11:10+5:302021-01-18T04:11:10+5:30

टेकडीवर काही पक्षी आणि सरपटणारे वन्यजीव मोठ्या प्रमाणात आहेत. त्यांचे संरक्षण करणे वन विभागाचे काम आहे. त्यासाठी सकाळ-संध्याकाळ नागरिकांच्या ...

Who will protect the wildlife on Mhatoba Hill? The snake was stoned to death; The Forest Department needs constant patrols during the coming and going of citizens! | म्हातोबा टेकडीवरील वन्यजीवांचे रक्षण करणार कोण? सापाला दगडाने ठेचून मारले; नागरिकांच्या येण्या-जाण्याच्या वेळांत वन विभागाकडून सतत गस्त हवी!

म्हातोबा टेकडीवरील वन्यजीवांचे रक्षण करणार कोण? सापाला दगडाने ठेचून मारले; नागरिकांच्या येण्या-जाण्याच्या वेळांत वन विभागाकडून सतत गस्त हवी!

Next

टेकडीवर काही पक्षी आणि सरपटणारे वन्यजीव मोठ्या प्रमाणात आहेत. त्यांचे संरक्षण करणे वन विभागाचे काम आहे. त्यासाठी सकाळ-संध्याकाळ नागरिकांच्या फिरण्याच्या वेळांत वनरक्षकांची गस्त असायला हवी. मात्रं प्रत्यक्षात टेकडीवर वनरक्षक गस्त घालताना दिसून येत नाहीत. परिणामी दारूडे लोक टेकड्यांवर बसून अनेक ठिकाणी काचेच्या बाटल्या फोडतात. ज्यामुळे सरपटणारे वन्यजीव मोठ्या प्रमाणात जखमी होतात.

तसेच या मद्यपींकडून नागरिकांना त्रास होण्याची घटनाही नुकतीच म्हातोबा टेकडीवर उघडकीस आली आहे. वनविभागाच्या म्हातोबा टेकडी परिसरात म्हणजेच भांबुर्डे वनपरिक्षेत्रात एका तरुणीला दारूड्यांकडून छेडण्याचा प्रकार झाला. वनक्षेत्रात दारू पिणे, कचरा करणे हा गुन्हा असल्यामुळे संबंधित तरुणीने ताबडतोब वन विभागाचा टोल क्रमांक 1926 वर फोन केला परंतु, सदर नंबर बंद येत असल्यामुळे संबंधित तरूणीने वन विभागाच्या 020 -2566 8000 या लँडलाईन नंबरवर फोन करून घटनेची सविस्तर माहिती दिली. त्यावर टीम पाठवतो असे उत्तर मिळाले पण वनविभागाकडून कोणीही आले नाही. त्यामुळे घडलेल्या प्रकाराबाबत संबंधित तरुणीने कोथरूड पोलीस ठाण्याशी संपर्क साधला. पोलिसांनी मात्रं घटनेचे गांभीर्य ओळखून ताबडतोब सहकार्य करत वनविभागाच्या हद्दीतून काही जणांना ताब्यात घेतले.

—————————-

काही दिवसांपूर्वी टेकडीवर फिरत असताना भरपूर दारू प्यालेले दोन तरुण दोन्ही हात पसरवत अचानक समोर आले. नशेत ते काहीही बोलत होते. त्याबाबत मी वन विभागाला फोन केला. पण टेकडीवर वन्यजीव मारणे, झाडे तोडणे, वणवा लावणे, दारू पिणे, कचरा करणे, जोरात गाणी वाजवणे, नायलॉन मांज्याने पतंग उडवणे यासारख्या घटना टेकड्यांवर फिरायला येणारे नागरिक दररोज पाहत असतात. परंतु याबाबत नेमका कुणाशी व कसा संपर्क करावा, हे माहीत नसल्याने अनेक गुन्हे दुर्लक्षित राहतात. याची दखल घेवून वनविभागाकडून एखादा जागृती फलक बसवण्यात यावा.

- नियमित फिरायला येणारी तरुणी, म्हातोबा टेकडी

———————————-

Web Title: Who will protect the wildlife on Mhatoba Hill? The snake was stoned to death; The Forest Department needs constant patrols during the coming and going of citizens!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.