पुणे : ‘येऊन येऊन येणार कोण’ असा जल्लोष, विजेत्या नाटकांचे उत्कृष्ट सादरीकरण, अभिनेते सचिन पिळगांवकर आणि महेश कोठारे यांच्या कारकिर्दीच्या दृश्यफिती, रेडियन आर्टच्या कलाविष्कारातून साकारलेली पिळगांवकर आणि कोठारे या दिग्गजांची व्यक्तिचित्रे, बक्षिसांची खैरात आणि भगवे फेटे बांधलेल्या विजेत्यांचा सत्कार अशा जल्लोषात महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनी बालगंधर्व रंगमंदिर सोमवारी रात्री दणाणून सोडले होते.निमित्त होते, फिरोदिया करंडकच्या यंदाच्या पुरस्कार वितरण समारंभाचे. याप्रसंगी अभिनेते सचिन पिळगांवकर आणि महेश कोठारे, उद्योगपती अरुण फिरोदिया, शशांक परांजपे, अतिरिक्त विभागीय आयुक्त श्याम देशपांडे, फिरोदियाचे संस्थापक सूर्यकांत कुलकर्णी, अंतिम फेरीचे परीक्षक राहुल रानडे उपस्थित होते.पिळगांवकर म्हणाले, ‘‘एकांकिकेत ज्याप्रमाणे एकाच मुद्द्यावर लक्ष केंद्रित करून ते सफल करायचा प्रयत्न करतात त्याप्रमाणेच स्वत:च्या आयुष्यातदेखील एका गोष्टीवर दुसरी गोष्ट लादू नका. तसेच जे काम कराल ते मनापासून करा. कारण एखादा हरला तरच दुसरा जिंकू शकतो आणि कोणाच्या तरी हरण्यावरच कोणाचं तरी जिंकणं अवलंबून असतं.’’ कोठारे म्हणाले, ‘‘एकांकिकेमध्ये एका वेळी अनेक कामं करायला मिळतात आणि स्वत:मधील कलागुणांना साकारायची संधी मिळते. त्याप्रमाणे भविष्यातदेखील स्वत:चे बहुआयामी व्यक्तिमत्त्व साकारायचा प्रयत्न करा.’’ (प्रतिनिधी)फिरोदिया करंडक स्पर्धेचा निकाल ४प्रथम : विश्वकर्मा इन्स्टिट्यूट आॅफ टेक्नॉलॉजी४द्वितीय : फर्ग्युसन महाविद्यालय४तृतीय : महाराष्ट्र इन्स्टिट्यूट आॅफ टेक्नॉलॉजी
येऊन येऊन येणार कोण?
By admin | Updated: March 25, 2015 00:37 IST