महायुतीत कोणाला जागा सुटणार?
By Admin | Updated: August 21, 2014 00:38 IST2014-08-21T00:38:44+5:302014-08-21T00:38:44+5:30
एका बाजूला उच्चभ्रू सोसायटी, तर दुसरीकडे कासेवाडी, मंगळवार पेठ, ताडीवाला रोड असा झोपडपट्टीने व्यापलेल्या या विधानसभा मतदारसंघ नेहमीच काँग्रेसच्या बाजूने कौल देत आला आह़े

महायुतीत कोणाला जागा सुटणार?
पुणो : एका बाजूला उच्चभ्रू सोसायटी, तर दुसरीकडे कासेवाडी, मंगळवार पेठ, ताडीवाला रोड असा झोपडपट्टीने व्यापलेल्या या विधानसभा मतदारसंघ नेहमीच काँग्रेसच्या बाजूने कौल देत आला आह़े या उलट शिवसेना- भारतीय जनता पार्टी युतीला अजूनही या मतदारसंघात घट्ट पाय रोवता आले नाही़ शिवसेनेच्या वाटय़ाला आलेल्या या जागेसाठी त्यांना नेहमीच उमेदवार आयात करावा लागला आह़े त्या पाश्र्वभूमीवर रिपब्लिकन पक्षाने कॅन्टोन्मेंटवर दावा केल्याने काँग्रेसला टक्कर देण्यासाठी महायुतीत ही जागा कोणाला सुटणार, याविषयी सध्या प्रमुख चर्चा या मतदारसंघात सुरू आह़े
कॅन्टोन्मेंट मतदारसंघाने 1999 चा अपवाद वगळता गेल्या 2क् वर्षात कायमच काँग्रेस उमेदवाराला निवडून दिले आह़े पुनर्रचनेनंतर यातील हडपसरचा भाग वगळला गेल्यानंतरही 2क्क्9 मध्ये रमेश बागवे यांनी शिवसेनेचे सदानंद शेट्टी यांचा 37 हजार मतांनी पराभव केला होता़ बागवे यांना 61 हजार 854 मते, तर सदानंद शेट्टी यांना 26 हजार 931 आणि रिपब्लिकन पक्षाचे रोहिदास गायकवाड यांना 5 हजार 5 मते मिळाली होती़ या निवडणुकीनंतर काही महिन्यांनंतर शेट्टी यांनी पुन्हा काँग्रेसमध्ये प्रवेश केला आह़े
लोकसभा निवडणुकीत अनिल शिरोळे यांना या मतदारसंघात 63 हजार 79क् मते मिळाली होती, तर विश्वजित कदम यांना 59 हजार 859 मते मिळाली होती़ मनसेचे दीपक पायगुडे यांना 12 हजार 712 मते मिळाली होती़ शिरोळे यांना या मतदारसंघात आघाडी मिळाली असली, तरी ती अन्य विधानसभा मतदारसंघापेक्षा कमी आह़े त्यामुळे मोदी लाटेचा प्रभाव विधानसभेर्पयत ओसरला, तर आपल्याला चांगली संधी मिळू शकते, अशी काँग्रेसमधील इच्छुकांचे गणित आह़े
ही जागा शिवसेनेकडे असली तरी त्यांना या भागात अजूनही संघटना मजबूत करणो शक्य झाले नाही़ गेल्या वेळी सदानंद शेट्टी यांना उमेदवारी देण्यात आली होती़ यंदाही त्यांच्याकडे तुल्यबळ उमेदवार नाही. त्यामुळे ही जागा महायुतीत रिपब्लिकन पक्षासाठी सोडण्यात येण्याची शक्यता आह़े आरपीआयकडून परशुराम वाडेकर हे प्रमुख इच्छुक आहेत़ त्यांचीच निवड होणार असल्याची सध्या चर्चा आह़े
मनसेचे या मतदारसंघात 5 नगरसेवक आहेत़ प्रभाग 4क् मध्ये झालेल्या निवडणुकीत काँग्रेसने ही जागा मनसेकडून खेचून घेतली आह़े मनसेकडून अजय तायडे, अतुल जाधव, अविनाश साळवे हे प्रमुख इच्छुक आहेत़ तिहेरी लढतीत काँग्रेसला सर्वाधिक संधी असल्याची सध्या चर्चा आह़े (प्रतिनिधी)
प्रभागातील 13 नगरसेवक आघाडीचे
4या मतदारसंघात महापालिकेचे 1क् प्रभागांतील 2क् नगरसेवकांपैकी 13 नगरसेवक आघाडीचे आहेत़ याशिवाय पुणो कॅटोंन्मेंट बोर्डातही काँग्रेसचे बहुमत आह़े
4विद्यमान आमदार बागवे यांच्यासह बाळासाहेब बोराडे, मुकेश धिवार, भीमराव पाटोळे, मदारी अक्रम अली, सय्यद फारुक यासीन, जलसा भगवान वैराट हे इच्छुक आहेत़ त्यात बागवेंची दावेदारी मजबूत मानली जात़े मात्र, बागवे यांना मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेस कार्यकत्र्याचा विरोध आह़े