खराडी-शिवणे रस्ता कोणी रोखला?
By Admin | Updated: February 14, 2017 02:24 IST2017-02-14T02:24:34+5:302017-02-14T02:24:34+5:30
विधानसभा निवडणूक होऊन अडीच वर्षे झाली. मात्र, आमदारांनी एकही रुपयाचा निधी आपल्या खराडी-चंदननगरसाठी का नाही दिला?

खराडी-शिवणे रस्ता कोणी रोखला?
पुणे : विधानसभा निवडणूक होऊन अडीच वर्षे झाली. मात्र, आमदारांनी एकही रुपयाचा निधी आपल्या खराडी-चंदननगरसाठी का नाही दिला? मतदारसंघात दोन वर्षांत समस्यांचा डोंगर उभा राहिला असून खराडी ते शिवणे रस्ता वडगावशेरीत कुणी रखडवला? तो रस्ता पूर्ण झाला तर नगर रस्त्याची होणारी कोंडी कमी होईल, अशी टीका माजी आमदार बापूसाहेब पठारे यांनी केली.
आज राष्ट्रवादी काँग्रेस व काँग्रेस आघाडीचे उमेदवार महेंद्र पठारे, संजिला पठारे, सुमन पठारे, अॅड. भैयासाहेब जाधव यांनी बोराटेवस्ती, विडी कामगार वसाहत, सुंदरबाई शाळा परिसरात पदयात्रा काढून मतदारांशी संवाद साधला. या वेळी सागर दरेकर,
सुनील बोराटे, कुंडलिक बोराटे,
निखिल बोराटे, सुरेश गायकवाड,
नीलेश बोराटे, समीर खामकर,
श्रीकांत चव्हाण, गणेश शेडे, विशाल गावडे, गोविंद माने, प्रशांत धोत्रे, अकबर मुल्ला, रवींद्र चिल्लाळ, नरेश पाचकंटी, तानाजी खारपुडे, महेश मिडगुले, सचिन बोराटे, सूरज बोराटे, राजू पाटोळे, आकाश बोराटे, शंकर मेरगू, आशा बोराटे, नंदा बोराटे, नम्रता बोराटे,
कांचन बोराटे, सिंधू दरेकर,
कल्पना जाधव, सुरेखा गावडे, अलका शेडे, स्नेहा बोराटे, कल्पना माने पदयात्रेत सहभागी झाल्या होत्या.
खराडी-चंदननगरमधील मुस्लिम बंधूंच्या विविध समस्यांवर बापूसाहेब पठारे यांनी चर्चा केली. या वेळी इम्तियाज शेख, सय्यद साहेब, असिफ शेख, खानसाहेब, फिरोज इस्माईल शेख, आयूब बेग, रशीद शेख, शेर अली, शेख, इमाम मुल्ला, कादरभाई शेख, बशीरभाई शेख, चाँद शेख, वसीम शेख, हबीबुल्ला शेख उपस्थित होते.