रिक्षाचालकाकडून पैसे वसूल करणारे कोण?

By Admin | Updated: December 22, 2015 23:53 IST2015-12-22T23:53:27+5:302015-12-22T23:53:27+5:30

वेळ दुपारी साडेबाराची. ठिकाण पुणे-नाशिक महामार्गावरील केंद्रीय विहार बसथांबा. झाडाच्या आडोशाला थांबून प्रत्येक रिक्षा अडविणारे दोन इसम

Who is recovering from the autorickshaw driver? | रिक्षाचालकाकडून पैसे वसूल करणारे कोण?

रिक्षाचालकाकडून पैसे वसूल करणारे कोण?

इंद्रायणीनगर : वेळ दुपारी साडेबाराची. ठिकाण पुणे-नाशिक महामार्गावरील केंद्रीय विहार बसथांबा. झाडाच्या आडोशाला थांबून प्रत्येक रिक्षा अडविणारे दोन इसम. रिक्षा थांबवून चालकांकडून आर्थिक देवाणघेवाण. दोन्ही इसम साध्या वेषात. काळा चष्मा लावून पांढरा शर्ट व काळी पॅन्ट परिधान केलेला, धष्टपुष्ट; तर दुसरी व्यक्ती सडपातळ, टी शर्ट घातलेली. अचानक अवतरलेल्या या दोन व्यक्तींबद्दल दिवसभर नागरिकांमध्ये चांगलीच चर्चा रंगली होती.
अनेक तर्क-वितर्क लावून प्रत्येक जण समाधान करून घेत होता. नेहमी गच्च भरून जाणाऱ्या रिक्षा अचानक मोकळ्याच धावत होत्या.
रस्त्यावर उभे असलेले प्रवासीसुद्धा घेत नव्हते. अधिकाऱ्याच्या रुबाबात वावरणारा तो इसम मात्र रोडच्या कडेला उभे राहून पैसे गोळा करीत होता, तर प्रत्यक्ष आर्थिक व्यवहारासाठी मात्र दुसऱ्या व्यक्तीचा वापर करण्यात येत होता. पैसे घेणारे ते दोन इसम कोण, हे जाणून घेण्याची नागरिकांची उत्सुकता वाढली आहे. (वार्ताहर)

Web Title: Who is recovering from the autorickshaw driver?