शहरं
Join us  
Trending Stories
1
आशिया चषक जिंकल्यावर मध्यरात्रीच बीसीसीआयची मोठी घोषणा; खजिना रिता केला..., पाकिस्तानींना काय मिळाले...
2
"राहुल गांधींच्या छातीत गोळ्या घालू", भाजप प्रवक्त्याचे टीव्हीवरील चर्चेत विधान, काँग्रेसचे अमित शाहांना पत्र
3
नेपाळचे माजी पंतप्रधान ओली यांना काठमांडू सोडण्यास मनाई, पासपोर्ट निलंबित, देखरेखीखाली ठेवले
4
पाकिस्तानचा कर्णधार दहशतवाद्यांना, मसूद अझहरला मॅच फी दान करणार; तशी घोषणाच केली...
5
भारतीय सैन्य अन् पहलगाम हल्ल्यातील पीडित कुटुंबांना सर्व मॅचची फी देणार; सूर्यकुमार यादवची घोषणा
6
या नालायकांबरोबर युती करणार नाही; शिंदेसेनेच्या आमदाराची अजितदादांच्या राष्ट्रवादीवर बोचरी टीका
7
शेअर बाजाराची मजबूत सुरुवात: सेन्सेक्स १३६ अंकांनी वधारला, निफ्टी २४,७०० च्या जवळ; हे स्टॉक्स तेजीत
8
"वडिलांची जागा मी कधीच घेऊ शकत नाही, पण..."; ठाकरेंच्या आमदाराने घेतले श्वेताचे पालकत्व 
9
Tata Capital IPO: गुंतवणूकीसाठी अवघे काही दिवस शिल्लक, टाटा कॅपिटलनं सेट केला प्राईज बँड; GMP पण सुस्साट, पाहा डिटेल्स
10
मुंब्रा अपघात काळ्या बॅगेमुळेच! तीन महिन्यांच्या चौकशी अहवालात कारण स्पष्ट
11
कोण आहेत मोहसिन नकवी? जे टीम इंडियाची ट्रॉफी घेऊन पळून गेले; 'ऑपरेशन सिंदूर'वेळी भारताविरोधात...
12
तुमची मुलगी म्हणेल Thank You! या ६ बेस्ट स्कीम्स देतील जबरदस्त नफा, ५ नंबरच्या स्कीमनं तर पक्कं होईल तिचं भविष्य सुरक्षित
13
संतापजनक! आधी मारहाण, नंतर शाळेच्या खिडकीला उलटे टांगले; ७ वर्षाच्या मुलावर क्रूरता
14
'४ वर्षांपूर्वीपासून...', सोनम वांगचुकच्या पाकिस्तान कनेक्शनवर त्याची पत्नी गीतांजली वांगचुक काय म्हणाल्या?
15
सोशल मीडियावरील ती पोस्ट! ...अन् टीम इंडियानं अख्ख्या जगासमोर घेतला पाक मंत्र्याचा बदला
16
IND vs Pak: "अभिषेक बच्चन चांगला खेळलास", भारताने आशिया कप जिंकल्यानंतर बिग बींचा शोएब अख्तरला टोला
17
IND vs PAK Asia Cup Final : पाकिस्तानने आशिया कप ट्रॉफीसह टीम इंडियाची पदके चोरली, बीसीसीआयचा मोठा आरोप
18
लेहमध्ये सलग पाचव्या दिवशी सर्वत्र संचारबंदी; सोनम वांगचुक यांची त्वरित सुटका करण्याची देशभरातून मागणी
19
"आता प्रायश्चित्त घेण्याची वेळ, दसरा मेळावा रद्द करून..."; भाजपाची उद्धव ठाकरेंवर खोचक टीका
20
भारताचा आशिया चषकावर विजयी 'तिलक'; पाकिस्तानला सलग तिसऱ्यांदा नमवले! कुलदीप, तिलक यांचे मोलाचे योगदान

सामान्यांना अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या कोंडीतून बाहेर काढणारा नवा जयप्रकाश कोण ?

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 25, 2025 14:21 IST

- डॉ. बाबा आढाव : देशाला आणीबाणीच्या खाईत ढकलणाऱ्या घटनेला आज (बुधवारी) पन्नास वर्षे पूर्ण

पुणे : आणीबाणीच्या काळात जयप्रकाश नारायण यांचा आधार होता. मात्र, आज सर्वसामान्यांची, अभिव्यक्ती स्वातंत्र्याची कोंडी होत आहे. देशाला या कोंडीतून बाहेर काढण्यासाठी नवा जयप्रकाश कोण होतोय? याची वाट पाहतोय. युद्धखोरीच्या वल्गनांमुळे देश नव्हे, तर संपूर्ण जगच युद्धाच्या छायेखाली आहे.अभिव्यक्तीसह सर्वच बाजूंनी होणाऱ्या कोंडीमुळे श्वास गुदमरतोय. सामान्यांचे केवळ मानसिकच नव्हे, तर सामाजिक जीवनमान घसरत चालले आहे. याकडे पाहण्यासाठी कोणी तयार नाही. देश एकीकडे विज्ञानाच्या वाटेवर असल्याचे सांगताना इतिहासातील कथा घेऊन दिशाभूल करणाऱ्या वल्गना गंभीर आहेत, अशी खंत ज्येष्ठ कामगार नेते डॉ. बाबा आढाव यांनी व्यक्त केली.

पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी २५ जून १९७५ मध्ये देशावर आणीबाणी लादली. या घटनेला आज बुधवारी (दि २५) पन्नास वर्षे पूर्ण होत आहेत. त्यानिमित्त आणीबाणीचे साक्षीदार ठरलेले डॉ. आढाव यांनी आणीबाणीच्या आठवणी ‘लोकमत’शी बोलताना उलगडल्या.

ते म्हणाले, आणीबाणीच्या काळात आम्ही आंदोलन करीत होतो. या आंदोलनाच्या निमित्ताने माझाही दोन महिन्यांनी तुरुंगात प्रवेश झाला. येरवड्यातील आतल्या बराकीत आम्हाला बंदिस्त करण्यात आले. इंदिरा गांधींनी आणीबाणी लादल्यानंतर देशभर मुस्कटदाबी सुरू होती.लोक त्याविरोधात उभे राहत होते, बोलत होते, निषेध करीत होते. सर्वांना जयप्रकाश नारायण यांचा आधार होता. आणीबाणीची आठवण करावी लागावी तीही प्रकर्षाने, हे खटकत आहे. पन्नास वर्षांपूर्वी देशाने जो अनुभव घेतला त्यापेक्षा अत्यंत वाईट अनुभव आज येत आहे. राज्यकर्त्यांची ही चाल असून मूलभूत प्रश्न डावलले जात आहेत. पुस्तकातील धडे बदलणे, भाषा वाद, शालेय अभ्यासक्रमात तीन भाषांचा समावेश यांसारख्या अनेक मुद्द्यांना महत्त्व दिले जात आहे. एकंदरीतच देशातील जीवनमान ढासळत चालले आहे.

 अलाहाबाद उच्च न्यायालयाने १२ जून १९७५ रोजी इंदिरा गांधी यांना निवडणुकीत सरकारी यंत्रणेचा गैरवापर केल्याप्रकरणी पुढील सहा वर्षांसाठी निवडणूक लढण्यास बंदी घातली. आत्ता नाही तर पुढे कधीच परत येता येणार नाही, अशी भीती त्यांना वाटत होती. दिल्लीत २५ जून १९७५ रोजी ‘सिंहासन छोडो’ अशी घोषणा देणारा मोर्चा काढण्यात आला होता. त्याच रात्री देशात इंदिरा गांधी यांनी आणीबाणी लागू केली. त्यासाठी त्यांनी तत्काळ मध्यरात्री तत्कालीन राष्ट्रपती यांची स्वाक्षरी घेतली. त्यांनी सकाळी मंत्रिमंडळाची बैठक घेतली. जयप्रकाश नारायण कुठे आहेत? हे विचारल्यानंतर त्यांनी कारागृहात आहेत आणि सुरक्षित आहेत, इतकाच संदेश दिला. आणीबाणी लागू झाल्यावर नागरिकांचे घटनात्मक मूलभूत अधिकार रद्द झाले. अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर घाला घातल्याने वृत्तपत्रे व प्रसारमाध्यमांवर सेन्सॉरशिप लागू झाली. भूमिगत असतानाच मला २ ऑक्टोबर १९७५ रोजी अटक झाली. येरवडा कारागृहात आम्ही चारशे राजबंदी अटकेत होतो. अखेर १९७७ मध्ये अचानक लोकसभेच्या निवडणुका घोषित झाल्या अन् आम्ही तुरुंगातून सुटलो. कालांतराने इंदिरा गांधी यांना त्यांची चूक लक्षात आली. त्यांनी विदेशातील वृत्तपत्रांना मुलाखत देताना ही चूक मान्य केली होती.- कुमार सप्तर्षी, युकांद्रचे संस्थापक 

१९७५ मध्ये आणीबाणी जाहीर झाली. त्याचवर्षी स्त्री मुक्ती वर्ष जाहीर झाले. मी तेव्हा महाविद्यालयात प्राध्यापक म्हणून शिकवत होते. आम्ही बरेच जाहीर कार्यक्रम घेत होते. पण, आम्हाला अधिकृत जाहीरपणे कुणी सांगितले नव्हते की कार्यक्रम घेऊ नका. आम्ही कार्यक्रम करू शकत होतो. त्यावेळी सरकारी कर्मचाऱ्यांमध्ये एक शिथिलता आली होती. त्यांना शिस्त लागावी असे आदेश होते, तेव्हा विनोबा भावे यांनी अनुशासन पर्व असे म्हटले. त्यावेळी आमच्या प्राध्यापकांच्या मागण्या होत्या. त्यासाठी प्राध्यापकांनी अर्ज केले होते. पण, आमच्या अर्जाला सहा महिने शिक्षण खात्याने कोणतीही दाद दिली नाही. पण, आणीबाणीनंतर साचून राहिलेल्या कामांना गती दिली. शिथिल यंत्रणेला एक शिस्त आली. सरकारच्या विरोधात बोलण्याचे विषय नसतील, तर आडकाठी केली जात नसे.  -  डाॅ. तारा भवाळकर, साहित्य संमेलनाध्यक्ष 

टॅग्स :PuneपुणेMaharashtraमहाराष्ट्रElectionनिवडणूक 2024Muncipal Corporationनगर पालिकाpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवड