काँगे्रस तालुकाध्यक्षपदी कोण?
By Admin | Updated: October 30, 2015 00:14 IST2015-10-30T00:14:16+5:302015-10-30T00:14:16+5:30
कॉँग्रेस तालुकाध्यक्ष पदासाठी जोरदार हालचाली सुरू झाल्या आहेत. आगामी जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुका डोळ्यांसमोर ठेवून अध्यक्षपदाच्या नियुक्तीचा निर्णय घेताना

काँगे्रस तालुकाध्यक्षपदी कोण?
उर्से : कॉँग्रेस तालुकाध्यक्ष पदासाठी जोरदार हालचाली सुरू झाल्या आहेत. आगामी जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुका डोळ्यांसमोर ठेवून अध्यक्षपदाच्या नियुक्तीचा निर्णय घेताना पक्षश्रेष्ठींची कसोटी लागणार आहे. वजनदार, हुशार व प्रखर नेतृत्व करून संघटना मजबूत करणाऱ्या कार्यकर्त्याची निवड करावी, अशी मागणी कार्यकर्ते करीत आहेत.
कॉँग्रेस पक्षाला मावळ तालुक्यात २० वर्षांत सत्तेवर येता आले नाही. गावागावांत पक्ष संघटनाही मजबूत करता आल्या नाहीत. पक्ष संघटना तालुक्यात नेमकी कोठे कमी पडत आहे याचा आणि इतर बाबींचा आढावा पक्षश्रेष्ठी बारकाईने घेत आहेत. केवळ नावापुरत्या नव्हे, पक्षाची ताकत वाढविणाऱ्या तरुण कार्यकर्त्यांचा शोध सुरू असल्याचे सूत्रांनी सांगितले. बाळकृष्ण पोटवडे , खंडू तिकोणे, यशवंत मोहोळ, रोहिदास वाळुंज, सहदेव आरडे, विलास विकारी आदींची नावे या पदासाठी चर्चेत आहेत.
तालुक्यात एकेकाळी कॉँग्रेसची मोठी ताकत मातब्बर नेते आणि निष्ठांवत कार्यकर्त्यांच्या दमदार फळीमुळे होती. मात्र, १६ वर्षांपूर्वी स्थापन झालेल्या राष्ट्रवादी कॉँग्रेसबरोबर अनेक नेते, कार्यकर्ते गेले. त्यामुळे कॉँग्रेसमध्ये खूप मोठी पोकळी निर्माण झाली. (वार्ताहर)