शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
2
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
3
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
4
राहुरीत शरद पवार गटाचा उमेदवार ठरला, गोविंद मोकाटे निवडणूक लढवणार, प्राजक्त तनपुरेंची माघार?
5
७ दिवसांत दुप्पट झाला 'हा' शेअर; १००% पेक्षा अधिक वाढली किंमत, IPL टीमची मालक आहे कंपनी
6
इराण-इस्रायल संघर्षाचा भारतीय PMI वर परिणाम! सर्व्हिस सेक्टरची गती मंदावली; महागाईने कंबरडे मोडणार?
7
सलग तीन पराभवनानंतर CSK साठी गुड न्यूज, धोनी आणि ब्रेव्हिस ‘या’ सामन्यातून करणार पुनरागमन 
8
Petrol Price In US: ट्रम्प यांच्या निर्णयाचा अमेरिकेच्या लोकांनाच फटका; पेट्रोलच्या दरात जून २०२२ नंतरची सर्वात मोठी वाढ
9
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
10
बंगळुरू-चेन्नई लढतीत पाण्याच्या बाटलीवरून वाद, RCBचा कर्णधार पंचावर भडकला, नेमकं घडलं काय?
11
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
12
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
13
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
14
गोरेगावात तुफान राडा, पोलिसांची थेट बुलडोझर कारवाई; सोमय्या घटनास्थळी 'हनुमान चालीसा' पठण करणार
15
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
16
हात-पाय गमावले, जिद्द सोडली नाही; 18 वर्षीय पायल नागने वर्ल्ड पॅरा आर्चरी सीरिजमध्ये जिंकले 'गोल्ड'
17
राष्ट्रवादी काँग्रेस विलीनीकरणाच्या चर्चांना पूर्णविराम! खासदार अमर काळे यांनी स्पष्ट केली भूमिका; विलीनीकरणाचा विषय आता बंद?
18
"तू फक्त माझाच आहेस, पत्नीला घटस्फोट दे"; प्रेयसीचा हट्ट, कंटाळून शिक्षकाने केली आत्महत्या
19
Ashok Kharat : राजकारण तापलं! भोंदू अशोक खरातचे कॉल डिटेल्स कसे काय बाहेर आले?
20
Reliance Industries च्या शेअर्समध्ये जोरदार घसरण, गुंतवणूकदारांना ३५ हजार कोटींचा फटका; कारण काय?
Daily Top 2Weekly Top 5

रस्त्याच्या कामासाठी टक्केवारी मागणारा ‘तो’ सरपंच कोण? अजित पवारांचा भरसभेत गौप्यस्फोट

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 20, 2021 20:00 IST

चुकीचे प्रकार सहन केले जाणार नाहीत; अजित पवारांचा निर्वाणीचा इशारा

प्रशांत ननावरे -

बारामती :  बारामती तालुक्यातील जिरायती भागातील एका सरपंचाने परवा एका ठेकेदाराकडे फोन करीत रस्त्याच्या कामासाठी टक्केवारीची मागणी केल्याचा गौप्यस्फोट उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केला आहे. तो सरपंच कोण, अशी चर्चा भर सभेत रंगली.

बारामती येथील एका संस्थेच्या सर्वसाधारण सभेत पवार बोलत होते.यावेळी उपमुख्यमंत्री पवार म्हणाले,बारामतीसह जिल्ह्यात विविध विकासकामे आणण्याचा माझा प्रयत्न असतो.मुख्यमंत्री देखील विकासकामांना विरोध करत नाहीत.मात्र,कार्यकर्त्यांनी परीसरातील कामे दर्जेदार होतील,याकडे लक्ष देणे आवश्यक आहे,असे सांगताना पवार यांनी तालुक्यातील सरपंचाने ठेकेदाराकडेच टक्केवारी मागितल्याचा किस्सा सांगितला.

यावेळी पवार यांनी सरपंचाबाबत सांगितले की , सरपंचाने परिसरातील रस्त्याच्या कामासाठी त्या अजितदादाकडे पन्नास हेलपाटे मारले.त्यावेळी ते काम मंजुर झाले.मात्र,तु आमच्याकडे काहीच लक्ष देत नाहीस,असे सांगत टक्केवारीची मागणी केली. यावेळी काही लाख रुपयांची मागणी त्या सरपंचाने ठेकेदाराकडे मागितल्याचा गौप्यस्फोट उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केला.

उपविभागीय पोलीस अधिकाऱ्यांना संबंधितांना उचलण्याची सूचना दिली,तर गावात त्याची काय किंमत राहिल,असा सवाल पवार यांनी केला. मी छातीठोकपणे सांगतो १९६७ पासून आजपर्यंत विकासाची कामे करताना येथील खासदार ,आमदारांनी पाच पैसे कोणत्या कामातील बाजुला घेतले नाहीत. उलट पदरचे करोड रुपये दिले. सीएसआरचा फंडविकास कामांसाठी दिला.आजच्या काळात आमची नावे घेवुन असे प्रकार करता,माझ्याकडे काम आल्यावर मी मार्गी लावतोच,मी जे बोलतो ते मी करतो. कोणी हेलपाटे मारण्याची गरज नाही. मात्र, आमच्या नावाचा वापर करत खुशाल खोटे सांगता.तुम्हाला काय मिळाले पाहिजे, देवळात वाजवायची घंटा का,असा उपरोधिक टोला उपमुख्यमंत्री पवार यांनी संबधित सरपंचाला लगावला, असे प्रकार पुन्हा माझ्या कानावर आल्यास माझा सर्वांना निर्वाणीचा इशारा आहे.

चुकीचे प्रकार सहन केले जाणार नाहीत. तो सरपंच राष्ट्रवादी काँग्रेसबरोबर किती दिवसांपासून आहे.त्याच्या किती पिढ्या आमच्याबरोबर आहे,याचा विचार करणार नाही.ठेकेदाराने संभाषण ऐकविल्यावर मला टाळता येईना,नाकारता येईना.त्या ठेकेदाराने त्या संभाषणाची क्लीप मला ऐकवली. भ्रष्टाचाराला प्रवृत्त करणे हा गुन्हा आहे. भविष्यात काळजी घ्या,असा इशारा उपमुख्यमंत्री पवार यांनी दिला.

टॅग्स :BaramatiबारामतीAjit Pawarअजित पवारsarpanchसरपंचfraudधोकेबाजी