शहरं
Join us  
Trending Stories
1
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचा कार्यक्रम ठरला; कधी होणार महापालिका निवडणुका?
2
VIDEO: उत्तरकाशीमध्ये ढगफुटी; १४ सेकंदात सगळं गाव उद्ध्वस्त, घरांसह अनेकजण ढिगाऱ्याखाली गाडले गेले
3
७०, ५०, ४० की ३५ किलो; ट्रेनमध्ये किती सामान घेऊन जाऊ शकता? अन्यथा मोठा दंड होऊ शकतो
4
खिशातून एक रुपयाही न भरता शेतकऱ्यांना मिळेल वार्षिक ३६,००० पेन्शन, योजनेचा कसा घ्यायचा फायदा?
5
"न्यायपालिकेला राजकीय आखाडा बनवण्याचा प्रकार नाही का?", आरती साठेंच्या न्यायमूर्तीपदी नियुक्तीला रोहित पवारांचा विरोध
6
Mumbai: कबुतरखान्यावरून आदित्य ठाकरेंची देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदेंवर टीका
7
"ढगफुटीमुळे हॉटेल्स, लॉज, बाजारपेठा, गाव उद्ध्वस्त..."; प्रत्यक्षदर्शींनी सांगितला भयंकर अनुभव
8
ट्रम्प यांच्या वक्तव्याने भारतीय गुंतवणूकदारांना २ लाख कोटींचा फटका; फक्त 'या' क्षेत्रात झाली वाढ
9
बिहारनंतर आता या राज्यातही होणार मतदार याद्यांचं पुनरीक्षण, निवडणूक आयोगाने दिले आदेश   
10
कॅनडात खलिस्तान्यांच्या कुरापती सुरुच; 'रिपब्लिक ऑफ खलिस्तान' नावाने उभारले बनावट दूतावास
11
मंत्रिमंडळ बैठकीत ७ मोठे निर्णय; स्टार्टअप उद्योजगता धोरण जाहीर, समृद्धी फ्रेट कॉरिडॉर मंजूर
12
मराठीशी पंगा महागात! निशिकांत दुबेंच्या अडचणी वाढण्याची शक्यता; मनसेकडून याचिका दाखल
13
VIDEO: दोन बैलांमध्ये भांडण, स्कूटीवाल्या मुलीला बसली जोरदार धडक, ती रस्त्यावर पडली अन् मग...
14
टाटा ग्रुपचा मोठा धमाका! शेअर बाजारात येणार आणखी एका कंपनीचा IPO, गुंतवणूकदार मालामाल होणार?
15
२०,५००% रिटर्न! बिहारच्या या कंपनीनं ५ वर्षांत ₹१ लाखांचे केले ₹२ कोटी, तुमच्याकडे आहे का?
16
Amit Shah: विक्रमी अमित शाह! 'अशी' कामगिरी करणारे पहिलेच गृहमंत्री, अडवाणींनाही टाकले मागे
17
बिहारमध्ये डोमिसाईल पॉलिसी मंजूर; शिक्षक भरतीमध्ये ८५ टक्के बिहारींनाच नोकरी मिळणार
18
पाकिस्तानातील प्रत्येक सहावा व्यक्ती भिकारी; परदेशात पसरलं नेटवर्क, दरवर्षी ११७ ट्रिलियन कमाई
19
सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय; घटस्फोटानंतर 12 कोटी रुपये अन् BMW कार मागणाऱ्या पत्नीला काय मिळाले?
20
युजवेंद्र चहलने घटस्फोटावर उघडपणे विधान केल्यानंतर Ex-पत्नी धनश्रीची पोस्ट, म्हणाली- शांतता...

पीएमपीच्या अकार्यक्षम सेवेचे उत्तरदायित्व कोणाकडे..? प्रवाशांचा सवाल

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 26, 2019 07:00 IST

कोट्यवधी रूपयांची मदत दरवर्षी होत असूनही पीएमपी ही प्रवासी सेवा प्रवाशांना तापदायकच ठरते आहे.

ठळक मुद्देप्रवाशांचा सवाल: बेपर्वाई, बेजबाबदारपणा,हितसंबंधांची जपणूक

पुणे : कोट्यवधी रूपयांची मदत दरवर्षी होत असूनही पीएमपी ही प्रवासी सेवा प्रवाशांना तापदायकच ठरते आहे. नागरिकांच्या कराचा पैसा खर्च होत असलेल्या या सार्वजनिक प्रवासी सेवेचे उत्तरदायित्व आहे तरी कोणाकडे? असा उद्विग्न सवाल प्रवाशांचे प्रतिनिधित्व करणाऱ्यांनी '' लोकमत'' च्या व्यासपीठावर गुरूवारी उपस्थित केला. पुण्याच्या वाहतूक कोंडीवर उपाय सुचवण्यासाठी म्हणून ' लोकमत' ने गेल्या काही दिवसांपासून सुरू केलेल्या चर्चासत्रात पीएमपीवरचे आक्षेप व अपेक्षा यावर चर्चा झाली. बहुतेकांनी या सेवेबद्दल अनेक आक्षेप नोंदवत ह्यजबाबदारी निश्चित केल्याशिवाय त्यांच्याकडून अपेक्षा करण्यात काहीच अर्थ नाही, असे रोखठोक मतही ऐकवले.प्रवासी सेवा मंचचे अध्यक्ष जुगल राठी तसेच संजय शितोळे, निळकंठ मांढरे, आशा शिंदे, विपूल पाटील, रुपेश केसेकर, सतीश चितळे यात सहभागी झाले होते. ' पीएमटी'चे विलिनीकरण करण्याचा उद्देशच व्यावसायिक पद्धतीने कामकाज होऊन प्रवाशांना उत्तम व कार्यक्षम सेवा मिळावी असा होता. मात्र तसे काम होत नसल्याने हा उद्देश सफल झाला नसल्याचे मत या सर्वांनी नोंदवले. वेगवेगळ्या मुद्द्यांवर त्यांनी आक्षेप घेतले असले तरीही ही सेवा चांगली होणे शहरातील वाहतूक सुरळीत होण्यासाठी उपयुक्त ठरणार असल्याचे मतही त्यांनी व्यक्त केले. चुकीची धोरणे, अभ्यासाचा अभाव, दृष्टिकोन प्रवासी केंद्रीत असण्याऐवजी वैयक्तिक हितसंबध सांभाळणारा असणे अशी विविध कारणे त्यांनी सांगितले.शहरातील वाहतूकीच्यागर्दीत फेऱ्या मारणे सुलभ व्हावे यासाठी २२ व ३२ आसनांच्या लहान बस घेण्यात आल्या व त्यालगेचच शहराभोवताली असणाऱ्या उपनगरांमध्ये त्या पाठवण्यात आल्या. हा निर्णय कोणी घेतला, कशासाठी घेतला, याचे उत्तर कोणीही अधिकारी देत नाहीत. बस थांब्यांसाठी स्वतंत्र विभाग असूनही थांब्यांवर कसलीही व्यवस्था का नाही? बसमधील प्रवाशांच्या सुरक्षेची काळजी घेतली जात नाही. वाहक, चालक प्रवाशांबरोबर उद्धटपणे बोलतात, मुठभर असणाऱ्या प्रवाशांसाठी दीड कोटी रूपयांची एक याप्रमाणे वातानुकुलीत बस खरेदी करण्यात येतात व त्याचा आर्थिक बोजा प्रवासाचे दुसरे कोणतेही साधन नाही म्हणून पीएमपी वापरणाऱ्या गरीब प्रवाशावर टाकण्यात येतो अशी अनेक निरिक्षण व गंभीर आक्षेप या चर्चेत नोंदवण्यात आले.या सर्व प्रश्नांची उत्तरे देण्यास पीएमपी मधील कोणीही बांधील नाही. प्रवासी नावाच्या एका मोठ्या जनसमुदायाबरोबर रोज संबध येणाऱ्या संस्थेत आपण काम करतो आहोत याचे भानच वरिष्ठांपासून कनिष्ठांपर्यंत एकालाही नाही. त्यामुळेच या सेवेचे किंवा त्यामधील वेगवेगळ्या घटकांचे उत्तरदायित्व त्यात्या घटकांशी संबधित अधिकारी, कर्मचारी यांच्यावर निश्चित केले पाहिजे. कामात चुक झाली की विचारणा होणार, चौकशी होणार, कारवाई होणार असे वाटल्याशिवाय या सेवेत कसलीही सुधारणा होणार नाही, तोपर्यंत वेगवेगळ्या माध्यमातून या सेवेच्या चुका समोर आणणे भाग आहे असे या प्रवाशांनी स्पष्ट केले. त्याचबरोबर ही सेवा सुधारली तर पुण्यातील वाहतूकीची सध्याची समस्या किमान काही टक्क्यांनी तरी कमी होईल अशी खात्रीही त्यांनी व्यक्त केली. 

टॅग्स :PuneपुणेPMPMLपीएमपीएमएलpassengerप्रवासीPune Municipal Corporationपुणे महानगरपालिका