पाटील इस्टेटचा भाई कोण यावरुन तरुणावर कोयत्याने वार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 26, 2020 04:26 IST2020-11-26T04:26:08+5:302020-11-26T04:26:08+5:30

\Sलोकमत न्यूज नेटवर्क पुणे : पाटील इस्टेटचा भाई कोण यावरुन दोघांमध्ये जोरदार हाणामारी होऊन कोयत्याने एकमेकांवर वार करण्यात आले़ ...

Who is the brother of Patil Estate? | पाटील इस्टेटचा भाई कोण यावरुन तरुणावर कोयत्याने वार

पाटील इस्टेटचा भाई कोण यावरुन तरुणावर कोयत्याने वार

\Sलोकमत न्यूज नेटवर्क

पुणे : पाटील इस्टेटचा भाई कोण यावरुन दोघांमध्ये जोरदार हाणामारी होऊन कोयत्याने एकमेकांवर वार करण्यात आले़ याप्रकरणी खडकी पोलिसांनी तिघांना अटक केली आहे़ दोघांनी परस्परविरोधी तक्रारी केल्या आहेत़

याप्रकरणी आकाश हनवते (वय २५, रा़ पाटील इस्टेट) यांनी फिर्याद दिली आहे़ त्यावरुन पोलिसांनी अक्षय परशुराम पवार (वय २६) याच्यासह एका महिलेला अटक केली आहे़ आकाश हा २२ नोव्हेंबरला सायंकाळी घराच्या मागील गल्लीत गाडी पार्क करीत असताना पूर्वी झालेल्या भांडणावरुन अक्षय याने ‘तुला लय माज आला, तुझा माज उतरवतो, तुझी विकेट काढतो’, असे म्हणून मी या पाटील इस्टेटचा दादा आहे. कोण मध्ये येतो़ ते मी बघतो असे म्हणून हातातील कोयता हवेत फिरवून दहशत पसरविली. महिलेने आकाशला मागून पकडले़ अक्षय याने कोयत्याने गळ्यावर, कपाळावर वार करुन जखमी केले़ पोलिसांनी खुनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल केला आहे.

अक्षय पवार याने दिलेल्या फिर्यादीवरुन पोलिसांनी आकाश हनवते याला अटक केली आहे़ अक्षय पवार याच्या फिर्यादीनुसार, तो जीमला जात असताना आकाश हातात कोयता घेऊन आला व मी इथला भाई आहे़ कोण माझ्यासमोर येतो, त्याला मी तोडून टाकतो, असे म्हणला़ त्यावर अक्षय याने तू हातात कोयता घेऊन हवेत का फिरवतो, शिव्या का देतो, असे विचारल्याने त्याने अक्षयच्या मांडीवर, हातावर कोयत्याने वार करुन गंभीर जखमी केले़ तसेच त्याच्या आई व बहिणीला शिवीगाळ करुन मारहाण केली.

Web Title: Who is the brother of Patil Estate?