शहरं
Join us  
Trending Stories
1
बांगलादेशमध्ये हिंदूंवर होत असलेल्या अत्याचारावरून मुंबईपासून दिल्लीपर्यंत संताप, तीव्र आंदोलने
2
‘उद्धवसेनेसाठी मुंबई सोन्याची अंडी देणारी कोंबडी’,एकनाथ शिंदे यांची टीका  
3
कणकवलीचे नगराध्यक्ष संदेश पारकर यांनी घेतली एकनाथ शिंदेंची भेट, शिंदेसेनेत प्रवेश करणार? चर्चांना उधाण
4
अवजड ट्रक नियंत्रण सुटून कारवर उलटला, भीषण अपघातात पाच जणांचा मृत्यू 
5
पाकिस्तानला 'लॉटरी' लागली... १,३५,००,००,००,०००च्या बोलीवर PIA एअरलाईन्सचा सौदा पक्का !
6
IND W vs SL W : गोलंदाजीत शर्मा; फलंदाजीत वर्मा! दुसऱ्या टी-२० सामन्यातही लंकेसमोर टीम इंडियाचा डंका!
7
'भारताच्या दोन्ही शत्रूंकडे न्यूक्लिअर वेपन', CDS अनिल चौहान यांचे भविष्यातील युद्धाबाबत मोठे वक्तव्य
8
खरंच दारूच्या नशेत बेधुंद होते इंग्लंड क्रिकेटपटू? ECB नं चौकशीची तयारी दाखवली, पण...
9
ठाकरे बंधूंच्या युतीचा मुहुर्त ठरला, बुधवारी होणार घोषणा, अधिकृत कार्यक्रम पत्रिका समोर
10
उल्हासनगर: शिंदेसेनेत 'जुने विरुद्ध नवे' संघर्ष; तरुणांना संधी देण्याची युवासेनेची मागणी
11
IND W vs SL W : 'शर्माजी की बेटी' वैष्णवीसह श्री चरणीनं घेतली श्रीलंकेच्या बॅटर्सची फिरकी!
12
चिनी शस्त्रास्त्रे विकून पाकिस्तान मिळवतोय पैसे; लिबियाशी केला ४ अब्ज डॉलर्सचा लष्करी करार
13
T20I पदार्पणात वर्ल्ड रेकॉर्ड! या पठ्ठ्यानं पहिल्याच षटकात ५ विकेट्स घेत फिरवली मॅच
14
"नरेंद्र मोदींपेक्षा देवेंद्र फडणवीस जास्त फेकाफेकी करतात’’, हर्षवर्धन सपकाळ यांची बोचरी टीका
15
Jemimah Rodrigues: मुंबईकर जेमीला DC कडून मोठं सरप्राइज! फोटोशूटला गेली आणि दिल्लीची कॅप्टन झाली!
16
ज्ञानपीठ पुरस्काराने सन्मानित साहित्यिक विनोद कुमार शुक्ल यांचे निधन, पीएम मोदींनी वाहिली श्रद्धांजली
17
लेकीला शाळेत सोडण्यासाठी आलेल्या वडिलांचा गेटवर अचानक मृत्यू; Video पाहून पाणावतील डोळे
18
गोल्डन बॉय नीरज चोप्राने सपत्निक घेतली पंतप्रधान मोदींची भेट, खास फोटो सोशल मीडियावर पोस्ट
19
मुंबईतील एवढ्या वॉर्डात मुस्लिम मतदार निर्णायक, काँग्रेस उद्धवसेनेसह 'या' पक्षांची मुस्लिम मतांवर नजर
20
फास्ट फूड बनलं सायलेंट किलर; चाऊमीन, पिझ्झा-बर्गरमुळे आतड्यांना छिद्र; १६ वर्षीय मुलीचा मृत्यू
Daily Top 2Weekly Top 5

'मी कोण, तुम्ही कोण, तुमची जात कोणती' ही दरी समाजात आजही कायम: नंदेश उमप

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 1, 2020 08:20 IST

अण्णा भाऊ वाचायला सोपा आहे पण झिरपायला अवघड आहे .

ठळक मुद्देनंदेश उमप यांना अण्णाभाऊ साठे पुरस्कार प्रदान

पुणे: तुम्ही कोण, मी कोण, तुमची जात कोणती ही दरी समाजात आजही आहे. तुम्ही भावगीत गाता‌, लोकसंगीत गाता की शास्त्रीय संगीत गाता यावरून विशिष्ट दृष्टीने तुमच्याकडे पाहिले जाते. हे प्रकार मी भोगले आहेत. अण्णा भाऊ साठे यांना मानणारे लोक डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना मानत नाहीत आणि  बाबासाहेबांना मानणारे अण्णांना मानत नाहीत. हा काय प्रकार आहे ? असा सवाल प्रसिद्ध शाहीर नंदेश उमप यांनी उपस्थित केला.

या महान व्यक्तिमत्त्वांना आपण बंदिस्त केले आहे. ज्यांनी महाराष्ट्र घडवला अशा शाहिरांना, साहित्यिकांना आणि १०५ हुतात्म्यांना आपण विसरलो आहोत. लोकशाहीर अण्णा भाऊ साठेंना विसरलो आहोत. अशाने महाराष्ट्र 'महाराष्ट्र' राहणार नाही अशी खंतही त्यांनी व्यक्त केली.   

    संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीत डफलीवर थाप मारून समस्त मराठी बांधवांना बुलंद आवाजात ललकारी देणारी ' माझी मैना गावाकडं राहिली' ही छक्कड सादर करून नंदेश उमप यांनी अण्णाभाऊ साठे यांना मानवंदना दिली. उद्या ( 1 ऑगस्ट) अण्णाभाऊ साठे यांच्या जन्मशताब्दी वर्षांची सांगता होत आहे. त्यानिमित्त संवाद पुणे आणि समर्थ युवा फाैऊडेशन यांच्या वतीने नंदेश उमप यांना सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलगुरू नितीन करमळकर यांच्या हस्ते ' अण्णाभाऊ साठे  पुरस्कार' देऊन सन्मनित करण्यात आले.त्यानंतर प्रसिद्ध निवेदक मिलिंद कुलकर्णी यांनी नंदेश उमप यांचा लोककलेतील प्रवास गप्पांमधून उलगडला.    पुरस्कार प्रदान समारंभाप्रसंगी अध्यक्षस्थानी स्थायी समितीचे अध्यक्ष हेमंत रासने, प्रमुख पाहुणे म्हणून आमदार सुनील कांबळे, उपमहापाैर सरस्वती शेडगे, सचिन ईटकर, तसेच राजेश पांडे , सुनील महाजन आणि निकिता मोघे उपस्थित होते.    पुण्यगरीत अण्णांच्या नावाने पुरस्कार मिळाला याचा आनंद आहे.पुणेरी पगडीचा मोठा मान आणि आशीर्वाद मिळाला आहे.  या पुरस्काराने जबाबदारी अधिक वाढली आहे. महामानव आणि शाहिरांनी चळवळीची दोरी हातात दिली आहे ती पुढे घेऊन जाण्याचा नक्की प्रयत्न करेन अशी भावना नंदेश उमप यांनी व्यक्त केली.    अण्णाभाऊ साठे यांचे अजरामर 'महाराष्ट्र गीत' सादर करून उमप यांनी अण्णाभाऊंना मानवंदना दिली. खरंतर अण्णाभाऊ समाजायला वेळ लागणार आहे.  मी त्यांना साहित्यरत्न म्हणणण्यापूर्वी स्वातंत्रसैनिक मानतो ' ये आझादी झुठी है देश की जनता भूखी' है असे ते सडेतोडपणे म्हणायचे.  'माझी मैना'  किंवा बंगाली पोवाडा मध्ये अण्णांचे वेगळे दर्शन घडते. त्यांच्या व्यक्तिमत्वाच्या विविध पैलूंचा अभ्यास करायला हवा. अण्णा वाचायला सोपा आहे पण झिरपायला अवघड आहे याकडे त्यांनी लक्ष वेधले. अण्णाभाऊ साठे आणि शाहीर विठ्ठल उमप यांच्यातील ऋणानुबंध देखील त्यांनी आठवणींमधून उलगडले.    नितीन करमळकर म्हणाले, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांनी अडीअडचणींचा सामना करीत आयुष्याला दिशा दिली. ते फारशे शिकलेले नसूनही, त्यांनी  विपुल ग्रंथसंपदा निर्माण केली. सामान्यांचं जगणं लेखनातून मांडले. त्यामुळे केवळ त्यांच्या साहित्याचे वाचन न होता ते लेखन जगता आलं पाहिजे. ......चौकटचार महिन्यांनी सभागृहात रसिकांनी सांस्कृतिक कार्यक्रमाचा आनंद लुटला      कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे गेल्या चार महिन्यांपासून सांस्कृतिक विश्व ठप्प झाले होते..मैफिली सुन्या सुन्या झाल्या होत्या. शहराच्या दैनंदिन जगण्यातील ताजेपणा हरवला होता. मात्र शुक्रवारी पहिल्यांदाच रसिकांनी सभागृहात जाऊन लाईव्ह कार्यक्रमाची अनुभूती घेतली. सोशल डिस्टन्सिंगचा नियम पाळत, सभागृहात प्रवेश करणाऱ्या लोकांच्या शरीराचे तापमान चेक करीत  संयोजकांनी कार्यक्रमाचे शिवधनुष्य यशस्वीरीत्या पेलले.  इतर रसिकांसाठी हा कार्यक्रम फेसबुक पेजवर लाईव्ह सादर झाला...... 

टॅग्स :Puneपुणेnitin karmalkarनितीन करमळकरPune universityपुणे विद्यापीठ