जुन्नरमधून ‘सफेद’ द्राक्षे युरोपला
By Admin | Updated: February 22, 2015 22:49 IST2015-02-22T22:49:02+5:302015-02-22T22:49:02+5:30
जुन्नर तालुक्यातून काळ्या द्राक्षांपाठोपाठ सफेद द्राक्षांची आता युरोपियन देशांमध्ये निर्यात सुरूझाली आहे. जुन्नर तालुक्यात ८५० हेक्टर वर द्राक्षबागा आहेत.

जुन्नरमधून ‘सफेद’ द्राक्षे युरोपला
आळे फाटा : जुन्नर तालुक्यातून काळ्या द्राक्षांपाठोपाठ सफेद द्राक्षांची आता युरोपियन देशांमध्ये निर्यात सुरूझाली आहे.
जुन्नर तालुक्यात ८५० हेक्टर वर द्राक्षबागा आहेत. येथील काळ्या व सफेद द्राक्षांची अरब; तसेच युरोपियन देशामध्ये निर्यात होते.
काळ्या जातीची शरद सीडलेस, जम्बो व सफेद जातीची थोम्सुन सीडलेस, गणेश ही द्राक्षे या तालुक्यात उत्पादित होतात. या वर्षी तालुक्यातून ६९२ शेतकऱ्यांनी आपल्या ४३८ बागांची निर्यातीकरिता कृषी विभागाकडे नोंदणी केली होती.
जुन्नर तालुक्यातून जानेवारी महिन्यात काळ्या जातीच्या द्राक्षांच्या निर्यातीस सुरुवात झाली आहे, तसेच या वर्षी ही द्राक्षे श्रीलंका व चीन या देशांमध्येसुद्धा निर्यात होऊ लागली आहेत, तर फेब्रुवारी महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यापासून सफेद द्राक्षे ही निर्यात होऊ लागली आहेत. मार्च महिन्याच्या अखेरपर्यंत या दोन्ही द्राक्षांची निर्यात सुरू राहणार आहे.
देशामध्येही या द्राक्षांना चांगली मागणी आहे, तरीही या वर्षी निर्यात चांगली होण्याचा कृषी विभागाचा अंदाज आहे.
जवळपास १२०० टन द्राक्षे निर्यात होण्याचा कृषी विभागाचा अंदाज आहे. यामुळे शेतकरीवर्गाला चांगले उत्पन्न मिळणार आहे. (वार्ताहर)