शहरं
Join us  
Trending Stories
1
आता पाण्याच्या थेंबा-थेंबासाठी तरसणार पाकिस्तान! पहलगामनंतर भारताचे 'वॉटर स्ट्राइक'; सिंधू जल करार स्थगित
2
अटारी चेकपोस्ट बंद, पाक नागरिकांचे व्हिसा रद्द, ४८ तासात देश सोडण्याचे आदेश; भारताची कठोर भूमिका
3
"तुम्ही हर-हर महादेव म्हणत संघटित तर होऊ शकत नाही, मग अल्लाह हू अकबर म्हणत..."; मनोज मुंतशिर भडकले
4
पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांची माहिती देणाऱ्यांना 'इतक्या' लाखांचे बक्षीस; काश्मीर पोलिसांची घोषणा
5
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताच्या बाजूने उभे राहिले हे मुस्लीम देश, काय म्हणतोय पाकिस्तान?
6
दुर्गम भाग, सुरक्षा व्यवस्था नाही...दहशतवाद्यांनी हल्ल्यासाठी पहलगाम का निवडले?
7
पहलगाम हल्ल्यानंतर PM मोदींच्या नेतृत्वात CCSची अडीच तास बैठक, पाकिस्तानला मोठा दणका
8
पहलगाम हल्ला: पाकिस्तानी क्रिकेटरनेच काढली पाकिस्तानची लक्तरं, म्हणाला- लाज वाटते...
9
"तू बाहर आ..."; दहशतवाद्यांनी आयत म्हणायला सांगितली, मग व्यावसायिकावर गोळ्या झाडल्या, मुलीनं सांगितला भयावह प्रसंग
10
पहलगाम हल्ल्यानंतर काश्मीरमध्ये मोठी कारवाई; 1500 लोकांना घेतले ताब्यात, चौकशी सुरू...
11
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली
12
बिल क्लिंटन भारतात येण्यापूर्वी झाली होती ३६ शीखांची हत्या; २५ वर्षांनी पहलगाममध्येही तेच घडलं
13
Pahalgam Terror Attack : सुट्टी घेऊन अमेरिकेहून काश्मीर फिरण्यासाठी आला अन् दहशतवादी हल्ल्यात जीव गमावला
14
पहलगाम हल्यामुळे काश्मीरच्या अर्थव्यवस्थेला फटका; पर्यटकांनी रद्द केल्या बुकिंग्स...
15
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...
16
कुलगाममध्ये मोठी चकमक सुरु; पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या टीआरएफच्या कमांडरला घेरले
17
"निष्पाप भारतीयांना मारणं हाच पाकिस्तानचा राष्ट्रीय खेळ, आता..."; भारतीय क्रिकेटरला राग अनावर
18
“पंतप्रधानांनी खंबीर भूमिका घ्यावी, २६चा बदला २६०ने घेतला पाहिजे”; शिंदेसेनेचे नेते संतापले
19
"हे सरकार हिंदुत्वाबद्दल बोलतंय, त्यामुळे मुस्लिमांना कमकुवत झाल्यासारखं वाटतंय"; 'पहलगाम'बाबत रॉबर्ट वाड्रा यांचं विधान चर्चेत
20
"यांचा सामना कसा करायचा? भारताला चांगलं ठाऊक, आम्हीही सोबत...!"; पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या खास मित्राचं आश्वासन

अंगावर दाहकतेचा काटा......जेव्हा उलगडली कंजारभाट समाजातील अमानवी क्रौर्याची कहाणी...  

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 22, 2019 19:59 IST

मी हे केले नाही असे तो म्हटला तर उकळत्या तेलात नाण टाकून त्याला काढायला सांगितले जाते ती एकप्रकारे त्याची परीक्षा असते. ते नाणे बाहेर काढताना त्याचे हात भाजले तर तो दोषी समजला जातो आणि भाजला नाही तर दोषी नाही असा अजब तर्क लढविला जातो..

ठळक मुद्देसमाजाच्या पुस्तिकेमध्ये शिक्षांचा उल्लेख ; तरूण-तरूणींना अघोरी शिक्षा....

पुणे : कंजारभाट समाजातील मुला-मुलींमध्ये लग्नापूर्वी शारीरिक संबंध झाल्यास त्याचे प्रायश्चित करण्यासाठी त्यांना अघोरी शिक्षेला सामोरे जावे लागते. मुलीच्या शुध्दीकरणासाठी दुर्गम भागात नेले जाते. तिला पांढरा कपडा गुंडाळायला दिला जातो. पिठाचे गरम गोळे तिच्यासमोर टाकले जातात आणि तिने त्याच्यावर चालायचे असते. तिला मागून समाजातील माणसांकडून दगड मारले जातात...या अमानवीय क्रौर्याची अंगावर काटा आणणारी कहाणी कंजारभाट समाजातील या प्रथेविरूद्ध आवाज उठविल्यामुळे बहिष्कृत झालेला तरूण सिद्धार्थ इंद्रेकर याने कथन केली. कंजारभाट समाजातील तरूणींना लग्नापूर्वी द्याव्या लागणा-या कौमार्य चाचणीनंतर समाजातीलच तरूण-तरूणींमध्ये लग्नापूर्वी शारीरिक संबंध आल्यास त्या तरूण-तरूणींना सामोरे जावे लागणा-या अमानुष शिक्षेचा वृत्तांत त्याने शुक्रवारी पत्रकारांसमोर मांडला.  समाजातील तरूण-तरूणींनी अशा कोणत्याही स्वरूपाचा गुन्हा केला तर काय शिक्षा द्यायची याबाबत कंजारभाट सहन्समल भांतू घटना समिती नावाची पुस्तिका तयार करण्यात आली आहे. विशेष म्हणजे ही पुस्तिका तयार करणारे सुशिक्षित लोकच आहेत. या गुन्ह्यातील प्रायश्चित म्हणून तरूणीबरोबरच तरूणाचेही शुद्धधीकरण केले जाते.मी हे केले नाही असे तो म्हटला तर उकळत्या तेलात नाण टाकून त्याला काढायला सांगितले जाते ती एकप्रकारे त्याची परीक्षा असते. ते नाणे बाहेर काढताना त्याचे हात भाजले तर तो दोषी समजला जातो आणि भाजला नाही तर दोषी नाही असा अजब तर्क लढविला जातो...या अमानुष शिक्षेबाबत सिद्धांत सांगत होता. कंजारभाट समाजातील प्रथेला समाजतीलच अनेक तरूण-तरूणांनी विरोध केला आणि त्याविरूद्ध आवाज उठविण्यासाठी समाजतीलच विवेक तमायचीकर या तरूणाने दीड वर्षांपूर्वी स्टॉप द व्हीरिच्युअल नावाचा व्हॉटसअप ग्रुप तयार केला आहे.  सुरूवातीला या ग्रुपमध्ये १००जणांचा समावेश होता. मात्र जातपंचायतीच्या दबावामुळे कुटुंबांनी तरूण-तरूणींना या ग्रुपमधून बाहेर पडण्यास भाग पाडले आहे. आता ४० जणच त्या ग्रुपमध्ये आहेत. जातपंचायतीच्या कौमार्य चाचणीची पहिली तक्रार मी केली होती. पुरावे गोळा केले आणि ते पोलिसांना दिले. जातपंचायतीविरूद्ध २०तक्रारी समोर आल्या असल्याचे तो म्हणाला. -----------------------------------------------------------------------------------------------------

 

टॅग्स :PuneपुणेMaharashtra Andhashraddha Nirmulan Samitiमहाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मुलन समिती