शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
4
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
5
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
6
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
7
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
8
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
9
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
10
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
11
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
12
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
13
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
14
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
15
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
16
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
17
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
18
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
19
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
20
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
Daily Top 2Weekly Top 5

३४ गावांकरिता पाणीपुरवठा योजना तयार करताना २१ टीएमसी पाणी उपलब्ध करून द्या

By राजू हिंगे | Updated: June 11, 2025 12:30 IST

- महाराष्ट्र विधान परिषदेचे सभापती प्रा. राम शिंदे यांचे आदेश

पुणे : महानगरपालिकेने शहरातील पाणीपुरवठा योग्य प्रमाणात होण्यासाठी २०१८ मध्ये समान पाणीपुरवठा योजना आणूनदेखील अद्याप कात्रज, कोंढवा, येवलेवाडी, पिसोळी या विभागात अपुऱ्या प्रमाणात पाणीपुरवठा होत आहे. शहरात अनेक ठिकाणी अपुऱ्या पाणीपुरवठ्यामुळे नागरिकांना आंदोलन करावे लागत आहे. ही बाब गंभीर असून, पुणे महापालिका हद्दीत नव्याने समाविष्ट झालेल्या गावांना तातडीने योग्य प्रमाणात पाणीपुरवठा होईल या दृष्टीने कार्यवाही करण्यात यावी, असे निर्देश महाराष्ट्र विधान परिषदेचे सभापती प्रा. राम शिंदे यांनी दिले.

विधान परिषदेचे सदस्य आमदार योगेश टिळेकर यांनी अर्थसंकल्पीय अधिवेशन २०२५मध्ये ‘लक्षवेधी’ च्या माध्यमातून या प्रश्नाकडे लक्ष वेधले होते. यासंदर्भात सदस्यांनी मागणी केल्यानंतर सभापती राम शिंदे यांनी बैठक घेण्याचे आश्वासन दिले होते. त्यानुसार ही बैठक झाली. विधान परिषदेचे सदस्य आमदार योगेश टिळेकर, विधानमंडळाचे सचिव डॉ. विलास आठवले, पुणे महानगरपालिका आयुक्त नवल किशोर राम, अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त ओमप्रकाश दिवटे, उपसचिव नगरविकास प्रियंका छापवाले उपस्थित होते.

सद्यस्थितीत पुणे पालिकेला १४ टीएमसी पाणी देण्याचा करार करण्यात आला आहे. नवीन ३४ गावांकरिता पाणीपुरवठा योजना तयार करताना २१ टीएमसी उपलब्ध करून देण्याचा करार करावा. सन २०१८ मध्ये सुरू झालेली ही पाणीपुरवठा योजना अद्याप अपुरी असून, गांभीर्याने नियोजन करून लवकरात लवकर हा पाणीप्रश्न सोडवावा, असे निदेश प्रा. राम शिंदे यांनी दिले.

टॅग्स :PuneपुणेMaharashtraमहाराष्ट्रpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडRam Shindeराम शिंदे