शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

...तर ‘मविआ’ चे १९० ते २०० आमदार, ३४ ते ३६ खासदार निवडून येतील - सुप्रिया सुळे

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 27, 2023 14:49 IST

सुप्रिया सुळे यांनी मात्र राज्यातील विधानसभा आणि लोकसभेच्या एका सर्व्हेबाबत माहिती दिली

बारामती : एकीकडे भाजप बारामती लोकसभा मतदारसंघ घेरण्याची राजकीय रणनीती आखत असताना खासदार सुप्रिया सुळे यांनी मात्र राज्यातील विधानसभा आणि लोकसभेच्या एका सर्व्हेबाबत माहिती दिली. त्यानुसार आज जर महाराष्ट्रात निवडणुका लागल्या तर महाविकास आघाडीचे १९० ते २०० आमदार आणि ३४ ते ३६ खासदार निवडून येतील, असा सर्व्हे समोर आल्याची माहिती खासदार सुप्रिया सुळे यांनी बारामती येथे बोलताना दिली.

खासदार सुप्रिया सुळे आज बारामती दौऱ्यात शहरातील आमराई परिसरातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर वसाहत येथील घरकुलाची पाहणी करत माहिती घेतली. यावेळी बोलताना सुळे यांनी महत्वाचे राजकीय वक्तव्य केले आहे. यावेळी ज्येष्ठ नगरसेवक किरण गुजर, स्थानिक नगरसेवक बिरजू मांढरे, राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष जय पाटील, तालुकाध्यक्ष संभाजी होळकर, नगराध्यक्षा पौर्णिमा तावरे, माळेगांव कारखान्याचे संचालक योगेश जगताप, वनिता बनकर आदी उपस्थित होते.

सुळे म्हणाल्या, पुण्यासारख्या ठिकाणी सध्या सुरक्षितेचा प्रश्न निर्माण झाला आहे. कोयता आणि गँग हे माहित आहे. पण कोयता गँग हा शब्द काय आपल्याला माहित नाही. महिला रस्त्यात थांबून मला सांगतात. आमच्या मुली शाळा कॉलेजला जातात आम्हाला काळजी वाटते. तुम्ही गृहमंत्र्यांची भेट घ्या व यावर चर्चा करा,असे त्या महिला सांगतात. सध्या उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे गृह खात्याची जबाबदारी आहे. गृहमंत्री म्हणून त्यांच्या कामाला फारसे यश आलेले दिसत नसल्याचे सुळे म्हणाल्या. कारण महाराष्ट्र शासनाचा अहवाल असे सांगतो की, गेल्या सहा महिन्यात महाराष्ट्रात गुन्हेगारी वाढली आहे. ही अतिशय गंभीर आहे बाब असल्याचे देखील सुळे यांनी सांगितले.

अनेक जण असे आरोप करतात की सर्व निधी बारामतीला नेला जातो. यावर बोलताना सुळे म्हणाल्या की, बारामतीला तर निधी दिलाच आहे, तो बारामतीकरांचा अधिकार आहे. मात्र इतर तालुक्यांना उपाशी ठेवून बारामतीला निधी दिल्याचे मला मान्य नाही. सासवड जेजुरीचे उदाहरण यावेळी सुळे यांनी दिले. जेजुरी मंदिर आणि परिसर विकसित करण्यासाठी साडेचारशे कोटींचा निधी दिला आहे. सासवड शहराला अडीचशे कोटी दिला आहे. सर्वत्र सर्वांगीण विकास कसा होईल याकडे ‘अजितदादां’नी  सातत्य ठेवल्याचे खासदार सुळे म्हणाल्या.

टॅग्स :PuneपुणेSupriya Suleसुप्रिया सुळेPoliticsराजकारणNCPराष्ट्रवादी काँग्रेसMahavikas Aghadiमहाविकास आघाडी