शाहिरी असो वा कीर्तन ही भागवत प्राप्तीची साधने:यशोधन साखरे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 13, 2021 04:26 IST2021-01-13T04:26:22+5:302021-01-13T04:26:22+5:30
आळंदी : शाहिरी असो वा कीर्तन ही दोन्हीही भागवत प्राप्तीची साधने आहेत असा विचार ह.भ.प. यशोधन महाराज साखरे यांनी ...

शाहिरी असो वा कीर्तन ही भागवत प्राप्तीची साधने:यशोधन साखरे
आळंदी : शाहिरी असो वा कीर्तन ही दोन्हीही भागवत प्राप्तीची साधने आहेत असा विचार ह.भ.प. यशोधन महाराज साखरे यांनी व्यक्त केला. तीर्थक्षेत्र आळंदी देवाची (ता.खेड) येथे लोकमान्य टिळक स्मृती शताब्दी व लोकशाहीर अण्णाभाऊ साठे जन्मशताब्दी वर्षानिमित्त शाहीर हिंगे लोककला प्रबोधिनी पुणे यांचे वतीने
आयोजित केलेल्या ''शाहिरी व लोककला संमेलन''च्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते.
याप्रसंगी श्रीसंत कबीर मठाचे प्रमुख चैतन्य महाराज कबीर, भाजपा आध्यात्मिक आघाडीचे पश्चिम महाराष्ट्र संयोजक संजय घुंडरे पाटील, आळंदी नगरपरिषदेचे माजी नगरसेवक अशोक उमरगेकर, कासार धर्मशाळेचे अध्यक्ष मोहन कोळपकर, प्रबोधिनीचे अध्यक्ष शाहीर हेमंतराजे मावळे, ज्ञानेश्वर शिक्षण संस्थेचे सचिव अजित वडगावकर, देवस्थानचे व्यवस्थापक ज्ञानेश्वर वीर आदी मान्यवर उपस्थित होते.
शाहिरी व लोककलेला उर्जितावस्था प्राप्त करून या कलेला जुने वैभव प्राप्त करून देण्यासाठी शाहीर हिंगे लोककला प्रबोधिनी कार्यरत आहे. लोककलावंतांना व लोककलेला समाजामध्ये प्रतिष्ठा मिळवून देण्यासाठी या विषयावर चिंतन, मनन व्हावे याउद्देशाने शाहिरी व लोककला संमेलन घेण्यात आले असल्याची माहिती उद्घाटनप्रसंगी प्रबोधिनीचे अध्यक्ष शाहीर हेमंतराजे मावळे यांनी दिली. सूत्रसंचालन संगीता मावळे यांनी केले.
संमेलनात चंद्रशेखर कोष्टी यांनी ''वऱ्हाड निघालंय लंडनला'' हे एकपात्री नाटक, बालशाहीर सक्षम जाधव यांनी शाहिरी तर निर्झरा उगले हिने लोकशाहीर अण्णा भाऊ साठे लिखित महाराष्ट्राची परंपरा हा पोवाडा सादर केला. दुसऱ्या सत्रात अभय महाराज नलगे यांनी वारकरी कीर्तन केले. तर प्रख्यात तबलावादक संजय करंदीकर यांनी ''महाराष्ट्रातील लोकसंस्कृतीतील तालवाद्ये'' या विषयावर सप्रयोग व्याख्यान दिले.
तीर्थक्षेत्र आळंदीत शाहिरी व लोककला संमेलनात पोवाडे सादर करताना कलावंत.