शहरं
Join us  
Trending Stories
1
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
2
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
3
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
4
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
5
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
6
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
7
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
8
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
9
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
10
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
11
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
12
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
13
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
14
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
15
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
16
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
17
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
18
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
19
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
20
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
Daily Top 2Weekly Top 5

कुठं करावं काम; बँकेच्या ३८ पैकी तब्बल ३२ कर्मचाऱ्यांना इलेक्शन ड्युटी

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 13, 2024 07:39 IST

बँक कर्मचाऱ्यांना अन्य कामासाठी नेमताना रिझर्व्ह बँकेची परवानगी आवश्यक असते.

लोकमत न्यूज नेटवर्कपुणे : लोकसभा निवडणुकीच्या कामकाजासाठी पिंपरी-चिंचवड सहकारी बँकेच्या ३८ पैकी ३२ कर्मचाऱ्यांना नियुक्ती देण्यात आली  आहे. बँकेची सेवा ही अत्यावश्यक असल्याने यातील काही जण निवडणुकीच्या प्रशिक्षणाला उपस्थित राहिले नाहीत. त्यामुळे चिंचवड विधानसभा मतदारसंघाचे सहायक निवडणूक निर्णय अधिकारी विठ्ठल जोशी यांनी या कर्मचाऱ्यांना कारणे दाखवा नोटीस बजावल्या आहेत. त्यामुळे निवडणुकीचे कामकाज करावे की बँकेचे? असा प्रश्न या बॅंकेच्या कर्मचाऱ्यांना पडला आहे.

बँक कर्मचाऱ्यांना अन्य कामासाठी नेमताना रिझर्व्ह बँकेची परवानगी आवश्यक असते. निवडणुकीच्या कामकाजाची नियुक्ती मिळण्याची ही पहिलीच वेळ आहे. कर्मचारी निवडणुकीच्या कामासाठी गेल्यास बँक कशी चालवायची? असा प्रश्न आहे. याचा विचार व्हावा. अन्यथा  कायदेशीर मार्गाने लढू.    - शिरीष देशपांडे, अध्यक्ष,     पिंपरी-चिंचवड सहकारी बँक

इतर विभाग, आस्थापनांचे कर्मचारी घेण्याचा अधिकार जिल्हा निवडणूक अधिकाऱ्यांचा असतो. संबंधितांच्या कामावर परिणाम होऊ नये ही बाब लक्षात घेऊन कर्मचारी घेतले जातात. एका आस्थापनांचे किती टक्के कर्मचारी घ्यायचे याचे काही नियम नाहीत.     - मनोहर पारकर,     उपमुख्य निवडणूक अधिकारी 

टॅग्स :Electionनिवडणूकpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडlok sabha election 2024लोकसभा निवडणूक २०२४