शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईतील उत्तर भारतीयांना OBC आरक्षण मिळणार?: शिंदेसेनेचे नेते संजय निरुपम यांनी दिले संकेत
2
"हिंदू वेळीच एकवटला नाही तर भारतात गल्लोगल्ली बांगलादेशसारखा..."; धीरेंद्र शास्त्रींचा इशारा
3
धक्कातंत्र! कार्यालयाबाहेर निष्ठावंतांची घोषणाबाजी; आतमध्ये ५ बड्या नेत्यांचा भाजपात प्रवेश
4
ना पोस्ट, ना लाइक, ना कमेंट...; आता जवानांना केवळ इंस्टाग्राम बघण्याचीच परवानगी
5
गुंतवणूकदारांनो लक्ष द्या! नवीन वर्षात शेअर बाजाराला १५ दिवस सुट्टी; एनएसईकडून कॅलेंडर प्रसिद्ध
6
नाताळाला गालबोट; महाराष्ट्र, केरळसह काही राज्यांत तोडफोड अन् झटापटीच्या घटना...
7
“मी खरा वाघ आहे, त्यांच्यासारखा कागदी नाही”; रावसाहेब दानवेंचे ठाकरे बंधूंना प्रत्युत्तर
8
टीव्ही अभिनेत्याला झालेली खुलेआम मारहाण; म्हणाला, "तो अजूनही मोकाट...", मुंबई आता असुरक्षित?
9
कर्क राशीसाठी नवीन वर्ष 2026 कसं असेल? स्वप्नपूर्ती आणि मानसन्मानाचे वर्ष; पण आरोग्याबाबत राहा सतर्क!
10
शेख हसीना यांना परत बांग्लादेशात न पाठवून भारताने..; शशी थरुर यांचे मोठे वक्तव्य
11
गृहकर्ज घेण्याचा विचार करताय? कोणती बँक देतेय सर्वात स्वस्त होम लोन? पाहा संपूर्ण यादी
12
वैभव सूर्यवंशी पहिल्या सामन्यात बनला 'नंबर १'; रोहित शर्मा, विराट कोहलीला टाकलं मागे
13
एसबीआयमध्ये मॅनेजर असल्याचं सांगून तरुणीला जाळ्यात ओढलं; भेटायला बोलावलं अन् लुटून झाला पसार!
14
Pune Crime: शेजारी राहणाऱ्या तरुणीसोबत प्रेमसंबंध, तिच्यासह नांदेडमधून पळाला; पण पुण्यात झाली हत्या
15
ठाकरे बंधू एकत्र आल्याचा जल्लोष केला अन् दुसऱ्याच दिवशी नाशिकमधील मनसे नेत्याचा राजीनामा
16
मिथुन राशीसाठी नवीन वर्ष 2026 कसं असेल? आधी संघर्ष, नंतर मोठे यश; 'जबाबदारी' ठरेल प्रगतीचा मूलमंत्र!
17
“भाजपाने मराठी माणसासाठी काय केले? ठाकरे आहेत म्हणून तुम्ही राज्याचे CM आहात”: संजय राऊत
18
“याद राखा, मराठीचा अपमान केला तर ‘नहीं बटोगे... तो भी पिटोगे’”; मनसेने दिला थेट इशारा
19
हीच ती वेळ! शशी थरुर म्हणाले; सचिनसारखी प्रतिभा असलेल्या वैभव सूर्यवंशीला टीम इंडियात संधी द्या
Daily Top 2Weekly Top 5

निराधार वृध्द महिलेच्या मनाची श्रीमंती कुठं अन् खोटं बोलून दोन दोन पाकिटं हडपणारी माणसं कुठं 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 7, 2020 17:35 IST

जिथे सगळ्यांनी मिळून खाऊ ऐवजी सगळ्यांचं मलाच कस खाता येईल असा विचार करणारी लोक पाहायला मिळतात तिथेच या '' माऊली'' सारखी माणसं पण असतातच की..

ठळक मुद्देधनकवडीतील कार्यकर्त्यांचा अनुभव: वृद्धेच्या मनाची दिसली श्रीमंती

पुणे: अनेक लोक खोटे बोलून चक्क दोन दोन पाकिटं घ्यायची तिथे ही आजी फक्त एकच पाकिट व तेही भाजीचेच घेऊन जायची. बळेबळे द्यायचा प्रयत्न केला तर तिचे एक वाक्य अगदी ठरलेलं  ‘नको,आणखी कोणाला तरी ते द्या मला एवढं पुरे आहे बाकी मी घरी बनवेल..’जेवणाची पाकिटं घेणार्यांच्या ७०० ते ८०० जणांच्या गदीर्तील ती एक वृद्धा! फक्त भाजी घ्यायची, घ्याहो आजी असा कितीही आग्रह केला तरी फक्त भाजीच घ्यायची. त्यामुळेच सर्व कार्यकर्त्यांच्या बरोबर लक्षात राहिलेली.अनेक लोक खोटे बोलून चक्क दोन दोन पाकिटं घ्यायची तिथे ही आजी फक्त एकच पाकिट व तेही भाजीचेच घेऊन जायची. बळेबळे द्यायचा प्रयत्न केला तर तिचे एक वाक्य अगदी ठरलेलं‘नको,आणखी कोणाला तरी ते द्या मला एवढं पुरे आहे बाकी मी घरी बनवेल..’धनकवडीत काही कार्यकर्ते एकत्र येऊन परिसरातील निराधार, निराश्रितांना रोज अन्नदान करतात. मंगळवारी या आजीने एक अनोखी कृती करत या कार्यकर्त्यांच्या डोळ्यात पाणीच आणले. तिच्याजवळ असूनअसून असे कितीसे पैसे असणार? होती ती सगळी शिल्लक तिने एकत्र केली आणि त्याची ५ किलो तुरीची डाळ घेऊन ती तुमच्या अन्नदानात माझा गरीबाचा खारीचा वाटा असे म्हणत या कार्यकर्त्यांच्या हवाली केली.जिथे सगळ्यांनी मिळून खाऊ ऐवजी सगळ्यांचं मलाच कस खाता येईल असा विचार करणारी लोक पाहायला मिळतात तिथे या माऊलीने, जिला दोन वेळच  जेवण बनवून खाण शक्य नाहीये ती स्वत:च्या घासातला घास दुसऱ्यांना देण्याचा विचार करती आहे हे पाहून कार्यकर्त्यांना आभाळ ठेंगणे झाले. खरे सांगायचे तर सर्वजण नि: शब्द झाले.दानशूर व्यक्तींकडून मदत म्हणून आलेली कित्येक शे किलोची पोती खांद्यावर उचलून गोडाउन मधे ठेवणाऱ्या कार्यकर्त्यांना आजीची ही ५ किलोची तूरडाळ ऊचलणे अवघड झाले, कारण ती फक्त दोन किलोची पिशवी नव्हती, तर त्यात 2000 टनाहून अधिक भरेल एवढं प्रेम होते. असेच काम करा रे बाळांनो म्हणत तिने सगळ्यांच्या गालावर तळहात फिरवत स्वत:च्या कानशिलावर बोटे वाकवली तेव्हा ती कडकट करत एकाचवेळी वाजली व त्या आजीमध्ये शिगोशीग भरलेली माया सगळ्यांच्या प्रत्ययास आली.कोणाला असं वाटत असेल की मी अमुक एवढा श्रीमंत आहे आणि माझ्याकडे एवढी संपत्ती आहे तर त्या सगळ्यांची सर्वांची श्रीमंती एका पारड्यात आणि या माऊलीची श्रीमंती एका पारड्यात ठेवा. बघा या माऊलीचंच पारडं नेहमी जड राहील. 

टॅग्स :PuneपुणेDhankawadiधनकवडीWomenमहिलाCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस