शहरं
Join us  
Trending Stories
1
पत्राचाळ रहिवाशांना मोठा दिलासा! म्हाडा १० टक्के भाडेवाढ देणार; DCM एकनाथ शिंदेंचा निर्णय
2
दोन राज्यांत सत्तांतर! तिसऱ्या तामिळनाडूच्या एक्झिट पोलमध्ये काय? अभिनेता विजयची धमाकेदार एन्ट्री होण्याचे संकेत
3
'No more Mr. Nice Guy', बंदुकीसह फोटो पोस्ट करत डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला पुन्हा धमकी
4
आसाममध्ये भाजपा हॅटट्रिक करणार, काँग्रेस वनवास अद्यापही कायम; Exit Pollचे कल काय सांगतात?
5
“छत्रपती शिवाजी महाराजांची बदनामी मान्य आहे का? एकनाथ शिंदे गप्प का?”: हर्षवर्धन सपकाळ
6
Exit Poll: पश्चिम बंगालमध्ये ममता दीदींसोबतच खेला होणार; भाजपा... पाहा एक्झिट पोलचा सर्वात मोठा कल!
7
AI VS Humans : एआय की माणूस, कोण स्वस्त? दिग्गज टेक कंपनी NVIDIA सगळंच सांगितलं!
8
‘ही’ आहे पाकिस्तानची हायस्पीड ट्रेन, किती वेगाने जाते? वंदे भारत ट्रेनला देते का टक्कर? पाहा
9
केरळमध्ये 'लाल' किल्ला ढासळणार? एक्झिट पोलमध्ये काँग्रेसप्रणित UDF ची मोठी मुसंडी; विजयन यांची 'हॅट्ट्रिक' हुकणार!
10
विधानपरिषदेसाठी काँग्रेसही उमेदवार देणार? उद्धव ठाकरेंऐवजी अंबादास दानवेंच्या उमेदवारीमुळे चर्चांना उधाण
11
Top Marathi News LIVE Updates: नांदेडमध्ये तापमान ४४ अंशांवर; उष्णतेची तीव्र लाट
12
महाराष्ट्र माझा, मराठी माझी बोली भाषा! अमराठी चालकांसाठी परिवहन विभागाचा पुढाकार, पुस्तिकेचे प्रकाशन
13
१ महिन्यात २ अंगारक योग: संकष्ट-विनायक चतुर्थी ठरेल खास, गणपती बाप्पा शुभच करेल; काय करावे?
14
महाराष्ट्राचे AI धोरण जाहीर, हरित आयोग स्थापन, लंडन येथे अध्यासन केंद्र; मंत्रिमंडळाचे ७ मोठे निर्णय
15
महाराष्ट्राचे कृत्रिम बुद्धिमत्ता धोरण नेमके आहे तरी काय? AI मुळे किती नोकऱ्या मिळणार? वाचा
16
रोहितसह दुखापतीमुळे शतकवीरही OUT! MI कडून ओपनिंगचा नवा प्रयोग, मोठ्या बदलांसह मैदानात उतरला संघ
17
कितीही वाढूद्या, आम्ही खरेदी करणार...! १,५०,००० पार असूनही भारतात सोन्याची मागणी १० टक्क्यांनी वाढली
18
IPL मधील 'कमबॅक किंग' आहे Mumbai Indians! पाचवेळचा चॅम्पियन संघ Playoffs साठी किती वेळा ठरलाय पात्र?
19
सिगरेट शौकिनांना धक्का... गुंतवणूकदारांची चांदी...! १ मे पासून किमतीत १७ टक्क्यांपर्यंत वाढ; कंपन्यांचे शेअर्स मात्र सुसाट
20
लग्नाला नकार दिल्याच्या रागातून प्रेयसीसह तिच्या आईची हत्या; दुहेरी हत्याकांडाने विरार हादरले
Daily Top 2Weekly Top 5

संकेतस्थळ अपडेट होणार कधी?

By admin | Updated: June 22, 2015 04:30 IST

प्रवाशांसाठी ‘लाइफलाइन’ असलेल्या रेल्वेचे संकेतस्थळ मात्र अनेक महिन्यांपासून ‘अपडेट’ झालेले नाही. मध्य रेल्वेच्या पुणे विभागाच्या संकेतस्थळावरील ‘रेल्वे टेलिफोन

मंगेश पांडे, पिंपरीप्रवाशांसाठी ‘लाइफलाइन’ असलेल्या रेल्वेचे संकेतस्थळ मात्र अनेक महिन्यांपासून ‘अपडेट’ झालेले नाही. मध्य रेल्वेच्या पुणे विभागाच्या संकेतस्थळावरील ‘रेल्वे टेलिफोन डिरेक्टरी’च्या यादीत बदली आणि निवृत्त झालेल्या अधिकाऱ्यांची नावे आणि संपर्क क्रमांक आजही झळकत आहेत. यावरून संकेतस्थळाचे स्टेशन रेल्वेने अनेक महिन्यांपासून बदललेच नसल्याचे दिसून येते.सार्वजनिक प्रवासी वाहतूकव्यवस्थेत रेल्वेचा वाटा मोठा आहे. अनेक प्रवाशांना रेल्वेचा फायदा होत असून, देशात रेल्वेचे मोठे जाळे आहे. कमी वेळेत आणि कमी खर्चात होणारा रेल्वे प्रवास प्रवाशांनाही किफायतशीर ठरत आहे. मात्र, काही सोईसुविधा पुरविण्यात अद्यापही रेल्वे प्रशासन तत्पर नसल्याचे दिसून येते. याचाच एक भाग म्हणजे महिनोन् महिने रेल्वेच्या पुणे विभागाचे संकेतस्थळ ‘अपडेट’ झालेले नाही. रेल्वेचा प्रवास, मार्ग, किलोमीटर, वेळापत्रक, तसेच प्रशासकीय माहितीसह अधिकाऱ्यांचे पद आणि संपर्क क्रमांक रेल्वेच्या अधिकृत संकेतस्थळावर ‘अपलोड’ केली जाते. जेणेकरून प्रवाशांना काही अडचण आल्यास संकेतस्थळावरील माहितीचा उपयोग होऊ शकेल. संकेतस्थळामुळे राज्यातीलच नव्हे, तर देशाच्या कानाकोपऱ्यातील व्यक्तीलाही आवश्यक ती माहिती तत्काळ मिळू शकते. अनेकजण या सुविधेवर विसंबून असतात. मात्र, येथूनच अपुरी आणि चुकीची माहिती मिळाल्यास समोरची व्यक्तीही गोंधळून जाते. याचाच प्रत्यय सध्या पुणे रेल्वे विभागात अनुभवास येत आहे. संपर्क क्रमांक एकाचा आणि त्यापुढे नाव दुसऱ्याचेच दिसत आहे. संबंधित पदावरील अधिकाऱ्यास संकेतस्थळावर उपलब्ध असलेल्या क्रमांकावरून फोन लावल्यास दुसरेच अधिकारी बोलतात. यामुळे नागरिकांची गफलत होत आहे.