संकेतस्थळ अपडेट होणार कधी?

By Admin | Updated: June 22, 2015 04:30 IST2015-06-22T04:30:30+5:302015-06-22T04:30:30+5:30

प्रवाशांसाठी ‘लाइफलाइन’ असलेल्या रेल्वेचे संकेतस्थळ मात्र अनेक महिन्यांपासून ‘अपडेट’ झालेले नाही. मध्य रेल्वेच्या पुणे विभागाच्या संकेतस्थळावरील ‘रेल्वे टेलिफोन

When will the website be updated? | संकेतस्थळ अपडेट होणार कधी?

संकेतस्थळ अपडेट होणार कधी?

मंगेश पांडे, पिंपरी
प्रवाशांसाठी ‘लाइफलाइन’ असलेल्या रेल्वेचे संकेतस्थळ मात्र अनेक महिन्यांपासून ‘अपडेट’ झालेले नाही. मध्य रेल्वेच्या पुणे विभागाच्या संकेतस्थळावरील ‘रेल्वे टेलिफोन डिरेक्टरी’च्या यादीत बदली आणि निवृत्त झालेल्या अधिकाऱ्यांची नावे आणि संपर्क क्रमांक आजही झळकत आहेत. यावरून संकेतस्थळाचे स्टेशन रेल्वेने अनेक महिन्यांपासून बदललेच नसल्याचे दिसून येते.
सार्वजनिक प्रवासी वाहतूकव्यवस्थेत रेल्वेचा वाटा मोठा आहे. अनेक प्रवाशांना रेल्वेचा फायदा होत असून, देशात रेल्वेचे मोठे जाळे आहे. कमी वेळेत आणि कमी खर्चात होणारा रेल्वे प्रवास प्रवाशांनाही किफायतशीर ठरत आहे. मात्र, काही सोईसुविधा पुरविण्यात अद्यापही रेल्वे प्रशासन तत्पर नसल्याचे दिसून येते. याचाच एक भाग म्हणजे महिनोन् महिने रेल्वेच्या पुणे विभागाचे संकेतस्थळ ‘अपडेट’ झालेले नाही. रेल्वेचा प्रवास, मार्ग, किलोमीटर, वेळापत्रक, तसेच प्रशासकीय माहितीसह अधिकाऱ्यांचे पद आणि संपर्क क्रमांक रेल्वेच्या अधिकृत संकेतस्थळावर ‘अपलोड’ केली जाते. जेणेकरून प्रवाशांना काही अडचण आल्यास संकेतस्थळावरील माहितीचा उपयोग होऊ शकेल.
संकेतस्थळामुळे राज्यातीलच नव्हे, तर देशाच्या कानाकोपऱ्यातील व्यक्तीलाही आवश्यक ती माहिती तत्काळ मिळू शकते. अनेकजण या सुविधेवर विसंबून असतात. मात्र, येथूनच अपुरी आणि चुकीची माहिती मिळाल्यास समोरची व्यक्तीही गोंधळून जाते. याचाच प्रत्यय सध्या पुणे रेल्वे विभागात अनुभवास येत आहे. संपर्क क्रमांक एकाचा आणि त्यापुढे नाव दुसऱ्याचेच दिसत आहे. संबंधित पदावरील अधिकाऱ्यास संकेतस्थळावर उपलब्ध असलेल्या क्रमांकावरून फोन लावल्यास दुसरेच अधिकारी बोलतात. यामुळे नागरिकांची गफलत होत आहे.

Web Title: When will the website be updated?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.