नियोजनाचा ‘पडदा’ उघडणार कधी?

By Admin | Updated: November 12, 2014 00:12 IST2014-11-12T00:12:45+5:302014-11-12T00:12:45+5:30

गेल्या अनेक वर्षापासून राज्याच्या सांस्कृतिक कार्य संचालनालयाच्या वतीने राज्य नाटय़ हौशी स्पर्धेचे विभागवार आयोजन केले जाते.

When the 'screen' of planning is open? | नियोजनाचा ‘पडदा’ उघडणार कधी?

नियोजनाचा ‘पडदा’ उघडणार कधी?

पुणो : गेल्या अनेक वर्षापासून राज्याच्या सांस्कृतिक कार्य संचालनालयाच्या वतीने राज्य नाटय़ हौशी स्पर्धेचे विभागवार आयोजन केले जाते. बुधवारपासून या स्पर्धेच्या प्राथमिक फेरीला पुण्यातील भरत नाटय़ मंदिर येथे प्रारंभ होत आहे. स्पर्धेचे नियोजन शासनस्तरावर होत असले, तरी उरकून टाकण्याचा उपक्रम अशीच परिस्थिती गेल्या काही वर्षापासून दिसत आहे.
या स्पर्धेची विशेष प्रसिद्धीच  न झाल्यामुळे स्पर्धा मंगळवारपासून  सुरू होत आहे, असे कानावर पडल्यामुळे  काही रसिकांनी नाटय़गृहाकडे धावही  घेतली; मात्र त्यांच्या पदरी निराशाच पडली. नाटय़ परिषद पुणो शाखेचे पदाधिकारीही त्याला अपवाद ठरले नाही, हे विशेष. 
स्पर्धेच्या प्रारंभापूर्वीच अशाप्रकारचा सांस्कृतिक संचालनालयाचा भोंगळ कारभार सर्वासमोर आला आहे. दर वर्षी आमंत्रणपत्रिका सोडा, पण स्पर्धेची  साधी वाच्यताही केली जात नसल्यामुळे अशा स्पर्धा ख:या नाटय़ रसिकांर्पयत पोहोचतच नाहीत, ही वस्तुस्थिती आहे. केवळ उपक्रम म्हणून या स्पर्धाकडे शासनस्तरावर पाहिले जात असल्यामुळे चांगल्या उपक्रमाचे   तीनतेरा वाजत आहेत.  
ज्या भागात ही स्पर्धा घेतली जाते तेथील रंगकर्मी आणि नाटय़ परिषद शाखांच्या समन्वयातून या स्पर्धेचे नियोजन करण्यात यावे, अशी मागणी गेल्या अनेक वर्षापासून नाटय़ परिषदेकडून केली जात आहे. स्थानिक स्तरावर अशा नाटय़ स्पर्धाची प्रसिद्धीही करता येणो शक्य आहे. रंगकर्मीनाही स्पर्धेला आमंत्रित करता येऊ शकते, ही त्यामागील भावना आहे. मात्र, या मागणीलाच  शासनाकडून वाटाण्याच्या अक्षता दाखविल्या जात आहेत. स्पर्धेच्या प्राथमिक फेरीला बुधवारपासून सुरूवात होत असली, तरी स्पर्धेचे उद्घाटन होणार आहे का, प्रमुख पाहुणो कोण आहेत, याविषयीही अद्याप  अनभिज्ञताच आहे. (प्रतिनिधी)
 
4राज्य नाटय़ स्पर्धातूनच कलाकार घडण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. या हौशी नाटय़ स्पर्धानी अनेक उत्तम कलाकार प्रायोगिक आणि व्यावसायिक रंगभूमींना दिले आहेत, असे असूनही अशा स्पर्धाना शासन स्तरावर दुय्यम वागणूक दिली जात आहे. अशा स्पर्धाना प्रेक्षकच मिळत  नसल्याने एका बंद नाटय़गृहात ‘बिन पैशांचा तमाशा’ केवळ सुरू असल्याचे जाणवते. पूर्वी सामाजिक कल्याण विभागाच्या सहकार्यातून या स्पर्धा राज्याच्या विविध भागांमध्ये भरविल्या जात असत. यंदा मुंबई वगळता इतरत्र प्रत्येक भागासाठी स्वतंत्र समन्वयक नेमून ही स्पर्धा घेतली जात आहे.
 
राज्य नाटय़ स्पर्धेसाठी स्वतंत्र समन्वयक पुणो सेंटरसाठी नेमला आहे. मात्र, त्यांच्याविषयी कोणतीच माहिती नाही. आमच्यासाठीही ते अजून गुलदस्तातच आहे. स्पर्धेच्या प्रत्यक्ष दिवशीच ते कोण आहेत हे कळेल.
- दीपक रेगे, प्रमुख कार्यवाह, नाटय़ परिषद पुणो शाखा
 
दोन वर्षापूर्वी राज्य नाटय़ हौशी स्पर्धेच्या पुण्यातील नियोजनासाठी नाटय़ परिषदेने सहकार्य केले होते. मात्र, यंदा शासनाकडून कोणतीच विचारणा झालेली नाही.
- सुरेश देशमुख, अध्यक्ष, नाटय़ परिषद, पुणो शाखा
 

 

Web Title: When the 'screen' of planning is open?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.