शहरं
Join us  
Trending Stories
1
'हे लोक चुकून आले तर बिहारमध्ये दहशत माजवतील', चिराग पासवान यांचा निशाणा कुणावर?
2
देशभरात एअर इंडियाचा सर्व्हर डाउन, दिल्ली विमानतळावर प्रवाशांच्या लांबच लांब रांगा; मॅन्युअली पद्धतीने चेक-इन
3
ISI नं का घडवला मुंबईवर हल्ला?; पाकिस्तानी राष्ट्रपती जरदारीच्या प्रवक्त्याचा मोठा दावा
4
IND A vs SA A : पंत कॅप्टन्सीसह कमबॅक करणार! रोहित-विराट मात्र 'या' वनडे मालिकेपासून दूरच राहणार?
5
"...तोपर्यंत सरकार तुमच्यासमोर गुडघ्यावर येणार नाही"; कर्जमाफी घेण्यासाठी उद्धव ठाकरेंचा शेतकऱ्यांना सल्ला
6
मारुतीने आज जो इतिहास घडवला, टाटालाही झेपणार नाही; ४२ वर्षांत ३ कोटी कार विकल्या...
7
फक्त २९ पैशांचा शेअर थेट १०० रुपयांवर! १ लाखाच्या गुंतवणुकीतून झाला '३.४४ कोटींचा' नफा
8
जगातील अवघ्या ३ लोकांकडे आहे 'ही' कार! डिझाईन पाहून प्रेमात पडाल अन् किंमत ऐकून हैराण व्हाल!
9
१७ वर्षे एकाच कंपनीत काम केले, अचानक काढून टाकले, कर्मचाऱ्याने लाखमोलाचा दिला सल्ला, पोस्ट व्हायरल
10
मोदी सरकारचा मोठा निर्णय; ऑपरेशन सिंदूरनंतर पहिल्यांदाच पाकिस्तानात गेले 2100 भारतीय, कारण काय?
11
भाजी विक्रेत्याने जिंकली तब्बल ११ कोटींची लॉटरी; टॅक्स भरून हातात किती पैसे येणार?
12
चेज मास्टर विराट कोहलीचे व्यवसायिक साम्राज्य माहितीये का? क्रिकेटपेक्षा इथून करतो सर्वाधिक कमाई
13
Student Death: स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या सागरने आईच्या साडीनेच संपवले आयुष्य; एका तरुणीमुळे...
14
गुगल क्रोम वापरणाऱ्यांना मोठा धोका; हॅकर्सचं लक्ष तुमच्यावरच! सुरक्षित राहण्यासाठी 'ही' गोष्ट आताच करा
15
Shocking: गंमत म्हणून विवाहित महिलेनं डीएनए चाचणी केली, सासराच निघाला बाप!
16
देव तारी त्याला कोण मारी! भीषण रेल्वे अपघातात ढिगाऱ्याजवळ जिवंत सापडला चिमुकला, पण...
17
भाजपाची महिला पदाधिकारी, नेत्यांना पुरवायची मुली; बिहार निवडणुकीत वरिष्ठांनी दिली जबाबदारी
18
श्रीदेवीचा सुपरहिट सिनेमा 'मॉम'च्या सीक्वेलमध्ये दिसणार 'ही' अभिनेत्री, सेटवरील फोटो लीक
19
लाडकी बहीण अन् काय काय...! वर्षात १२ राज्यांनी महिलांना वाटले तब्बल १.६८ लाख कोटी रुपये
20
तो, ती आणि प्रेमाची बहार! पांड्यानं शेअर केला गर्लफ्रेंडसोबतचा खास व्हिडिओ

पुणे- सोलापूर महामार्गावरील कवडीपाट टोलनाक्यावरच महिलेची प्रसूती

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 27, 2019 16:55 IST

काही काळासाठी का होईना हा पण तिन्ही पोलिसदादा व त्यांचा सहकारी ट्रॅफिक वॉर्डन त्या नवजात अर्भकासाठी 'मामा' बनले तर महिलेसाठी भाऊ...

ठळक मुद्देतप्तरतेने उपचार केल्याने महिला व नवजात बालक सुखरूप....

पंढरीनाथ नामुगडे- 

पुणे : पुणे-सोलापूर महामार्गावर कदमवाकवस्ती(ता.हवेली) हद्दीतील कवडीपाट टोलनाक्याजवळ वाहतूक सुरळीत करण्यासाठी वाहतूक शाखेच्या पोलिस कर्मचाऱ्यांसह त्यांच्या सहकाऱ्यांची दुपारी वाहतूक नियमन करत असताना दमछाक सुरु होती. मात्र, लोणी काळभोर येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात एक गर्भवती महिलेला नेट असताना तिला टोलनाक्याजवळच जोऱ्याच्या प्रसूती कळा सुरु झाल्या. पोलीस कर्मचाऱ्यांनी आपले सामाजिक बांधिलकी जपत महिलेला टोलनाक्याजवळील एका हॉटेलमध्ये नेले..तिथे त्या महिलेने एका बाळाला जन्म दिला..  

     लोणी काळभोर येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात जात असताना अचानक प्रसूती कळा सुरू झाल्याने महिलेने कवडीपाट(ता.हवेली)येथील टोल नाक्याजवळ  असलेल्या छोट्या हॉटेलमध्ये मुलाला जन्म दिल्याची घटना घडली.यावेळी लोणी काळभोर पोलीस ठाण्याचे वाहतूक ड्युटी करीत असलेले कर्मचारी,रिक्षा चालक व महिला नागरिकांच्या मदतीने महिलेला सुखरूप लोणी काळभोर प्राथमिक आरोग्य केंद्रात पोहचवण्यास यश आले.आणि तेथील डॉ. जाधव यांनी तप्तरतेने उपचार केल्याने महिला व नवजात बालक सुखरूप झाले.या कार्यामुळे परिसरातील सर्व क्षेत्रातुन लोणी काळभोर पोलिसांचे कौतुक होत आहे.

कवडीपाट(ता.हवेली)येथील टोल नाक्याजवळ असलेल्या छोट्या हॉटेलमध्ये मुलाला जन्म दिल्याची घटना घडली. चौघांनीही समोरचे दृश्य पाहून आपल्या वागण्यात बदल केला. माणूसकीच्या संवेदना कामापेक्षाही अधिक महत्वाच्या मानल्या. जेव्हा त्यांच्यासमोरच एक गर्भवती महिला रस्त्यातच प्रसूत झाली. काही काळासाठी का होईना हा पण तिन्ही पोलिसदादा व त्यांचा सहकारी ट्रॅफिक वॉर्डन त्या नवजात अर्भकासाठी 'मामा' बनले तर महिलेसाठी भाऊ.. आणि हे सुखद चित्र कवडीपाट परिसरातील शेकडो लोकांनी आपल्या डोळ्यात साठवले व जमलेल्या लोकांनी पोलिसांना धन्यवाद दिले.पोलीस हवालदार रनमोडे,पो.ना.संदीप देवकर,पो.ना.संतोष शिंदे व ट्रॅफिक वॉर्डन दादा लोंढे हे ते अशी मदतकार्यात मोलाची भूमिका निभावणाऱ्या चौघा जणांची नावे आहेत..        

काही दिवसांपूर्वी अशाच प्रकारे लोणी स्टेशन परिसरात पुणे सोलापूर महामार्गावर अशीच एका महिलेची प्रसूती झाली होती.त्यावेळी देखील यातील संदीप देवकर व इतर पोलीस कर्मचाऱ्यांनी त्या महिलेची प्रसूतीसाठी मदत करून समाजात एक चांगला संदेश दिला होता.पोलिसांनीच त्या बाळ-बाळांतीनीला रिक्षात घालून जवळच्या रुग्णालयात नेले.तिथे तिच्यावर तातडीने वैद्यकीय उपचार झाले आणि बाळ बाळंतीण सुखरूप राहिल्या.एखाद्या चित्रपटाच कथानक शोभावी अशी घटना आज वास्तवात घडली. खाकी वर्दीतील बदनाम झालेले पोलिसांमध्ये ड्युटीच्या पलिकडील संवेदनशील माणुसकी अशी घटना आज घडलेल्या घटनेमुळे अधोेरेखीत झाली.

टॅग्स :Loni Kalbhorलोणी काळभोरtollplazaटोलनाकाpregnant womanगर्भवती महिला