शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
3
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
4
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
5
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
6
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
7
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
8
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
9
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
10
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
11
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
12
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
13
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
14
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
15
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
16
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
17
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
18
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
19
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
20
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
Daily Top 2Weekly Top 5

मी कृषिमंत्री असताना लोकसभेत कांद्याच्या माळा घालून फिरणारे भाजपवाले कुठं आहेत? शरद पवारांचा सवाल

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 10, 2023 15:00 IST

कृषी प्रधान देशात सध्या शेतकरी वर्ग मोठ्या संकटामधून जात असताना त्यांना सरकारने आधार द्यावा

टाकळी हाजी : मी कृषी मंत्री असताना कांद्याचे भाव वाढले म्हणून लोकसभेत कांद्याच्या माळा घालुन फिरणारे भाजप वाले आता कांद्याच्या किमंती मातीमोल झाल्या असताना कुठे आहेत. असा सवाल माजी कृषी मंत्री शरद पवार यांनी केला.

निघोज ता पारनेर येथे बाबासाहेब कवाद निघोज नागरी सहकारी पतसंस्थेच्या नामकरण समारंभ तसेच आमदार निलेश लंके प्रतिष्ठानच्या वतीने सात हजार मुला मुलीना मोफत सायकल वाटपाचा कार्यक्रम शरद पवार यांच्या हस्ते झाले. त्यावेळेस पवार यांनी केंद्र सरकारच्या शेती विरोधी धोरणावर सडकुन टिका केली. या वेळी माजी मंत्री दिलीपराव वळसे पाटील, आमदार निलेश लंके, माजी आमदार पोपटराव गावडे, माजी आमदार दादाभाऊ कळमकर, अशोक सावंत, घनश्याम शेलार, निघोज नागरी पतसंस्थेचे अध्यक्ष वसंत कवाद, जीएस महानगर बॅकेचे अध्यक्ष सुमनताई शेळके यांच्यासह मोठ्या प्रमानात पदाधिकारी उपस्थित होते . 

या वेळी शरद पवार म्हणाले की, कृषी प्रधान देशात सध्या शेतकरी वर्ग मोठ्या संकटामधून जात आहे. त्यांना सरकारने आधार देण्याची गरज आहे मात्र शासन कृषी क्षेत्राकडे दुर्लक्ष करीत असुन, संस्थानिकाच्या ताब्यातुन घेत एकसंघ देशाची निर्मिती झाली. मात्र पुन्हा ठराविक उद्योगपती निर्माण करून त्यांच्या रुपाने सरकार संस्थानिक निर्माण करतय का असा सवाल त्यांनी व्यक्त केला. कांद्याला एकरी ७० हजार रुपये उत्पादन खर्च होतो मात्र कांदा विकुन हातात तेवढेही मिळत नाही मग खर्च व घेतलेले कर्ज शेतकऱ्यांनी कुठून भरायचा हा प्रश्न निर्माण झाला आहे. या संदर्भात दिल्लीत केंद्रीय कृषी मंत्री यांची भेट घेऊन कांदा प्रश्नी लक्ष वेधणार असल्यांची ग्वाही शरद पवार यांनी उपस्थितांना देताच शेतकऱ्यांनी टाळ्याचा कडकडाट केला.

टॅग्स :PuneपुणेSharad Pawarशरद पवारPoliticsराजकारणFarmerशेतकरीGovernmentसरकार